रायगडमध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी (फोटो- सोशल मिडिया)
राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्त्याचा आमदार थोरवेंना इशारा
भाजपा आणि आरपीआय बरोबर चर्चा सुरू
स्थानिक पातळावर यूता-आघाडाच राजकारण
कर्जत: कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी युती धर्म पाळला आणि त्यामुळे सुधाकर घारेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म देता आला नाही. त्यामुळे महेंद्र थोरवे, तुम्ही खा. सुनील तटकरे यांच्यामुळे आमदार झाला असून त्यांचे उपकार विसरू नका”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना मारला.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर आघाड्या आणि युती करण्याचे अधिकार आमच्या पक्षाने जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना दिले असल्याची माहिती भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा आणि आरपीआय बरोबर चर्चा सुरू
आमदार थोरवेवर बोलताना पुढे म्हणाले, निवडणूक झाली आणि आम्ही हरलो हे आम्ही मान्य केले आहे. सुनील तटकरे यांच्यामुळेच तुम्ही आमदार झाले आहेत. तटकरेंनी राज्यातील युती धर्म पाळला आणि त्यामुळे तुम्ही आमदार झाले. सुधाकर घारे नावाने तीन उमेदवार त्यांनी उभे केले. त्यातील दोन सुधाकर घारे यांची मते ही आमच्या कडून गेली आणि ते विजयी झाले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कायम सुनील तटकरे यांच्यावर टीकेची तोफ डागत आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी करणार नाही असे शिवसेना शिंदे गट सांगत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करीत देखील नाहीत. परंतु भाजप, आरपीआय बरोबर आमची चर्चा सुरू आहे आणि त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.”
Local Body Elections : स्वबळावर की एकत्र लढायचं? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भूमिका जाहीर
टीकाकारांनी त्यांच्या जीभेला आवर घालावा!
आम्हाला आमच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे है या सर्व निवडणुकीत लढण्यासाठी जे आदेश देतील, त्या आदेशाच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांच्या आमदार व खसदारांनी आमचे नेते सुनील तटकरे यांच्याविषयी बोलताना त्यांनी आपल्या जीभेवर आवर घालायला हवे किंवा त्यांना बोलायला लावणा-यांनी जीभ आवरायला सांगावे, असे आवाहन केले.
त्यांच्या पक्षाचा एक पोपट बोलतो…
आम्ही रायगड जिल्ह्यात आधा करण्यासाठी सर्वाधिकार जिल्हा अध्य-सुधाकर धारे यांना दिले आहेत. त्यामुन त्यांच्या पक्षाचा एक पोपट बोलतो, त्व पौपटाने स्वतःचा पगार किती बोलता किन याचा विचार करून बोलणाऱ्यांनी विचा करावा, असे आवाहन केले.






