Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain alert: महाराष्ट्रावर नव्या संकटाची चाहूल! पुढचे २४ तास अतिमहत्त्वाचे!

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 08, 2025 | 09:37 AM
Maharashtra Rain alert:

Maharashtra Rain alert:

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यात हळूहळू थंडीला सुरूवात
  • पुढील २४ तासांत देशातील चार ते पाच राज्यांमध्ये हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता
  • धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

Maharashtra Rain alert: राज्यात हळूहळू थंडीला सुरूवात झाली असून   पहाटे गारठा आणि दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी उशीरा सुरू झाली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा उघडिप, कोरडे हवामान, निरभ्र आकाश आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने किमान तापमानात घट होत आहे.

खानदेशासह राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तापमान १४ अंशांच्या खाली आल्याने गारठा जाणवू लागला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन चक्रीवादळामुळे पुढील २४ तास हवामानातील घडामोडींसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

पर्यटकांसाठी खुशखबर ! जंजिरा किल्ला पुन्हा एकदा झाला सुरू; खराब हवामानामुळे ठेवला 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत देशातील चार ते पाच राज्यांमध्ये हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः केरळमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत वादळासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने  दिलेल्या माहितीनुसार, या भागांमध्ये पावसासोबतच जोरदार वारे आणि वादळी हवामानाचा अनुभव येऊ शकतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, संबंधित राज्य प्रशासनांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात सध्या गुलाबी थंडीचे आगमन झाले असून, पहाटेच्या वेळी गारवा आणि दुपारी हलका उकाडा जाणवू लागला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, काही भागांमध्ये अल्प पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहेत. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम असला तरी एकूण तापमानात हळूहळू घट होत असल्याचे निरीक्षणात आले आहे.

खुशखबर! Pune–Chhatrapati Sambhajinagar प्रवास होणार सुसाट;

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यात हलक्या थंडीचा गारठा वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशात पर्वतीय वाऱ्यांच्या प्रभावामुळे थंडी वाढण्याचे संकेत दिले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवार आणि रविवारपर्यंत उत्तर भारतात गारठा आणखी वाढेल. दरम्यान, दक्षिण भारतात पुढील २४ तासांत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तसेच अंदमान-निकोबार बेटांवर वादळासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे. त्यामुळे उत्तर भारतात गारठा आणि दक्षिणेत वादळी पावसाचे दोन टोकाचे हवामान अनुभवास येणार आहे.

Web Title: Maharashtra rain alert next 24 hours are very important heavy rain warning for these states including maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 09:12 AM

Topics:  

  • Weather Report Today

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.