अखेर जंजिरा किल्ला पुन्हा एकदा झाला सुरू
मुरुड जंजिरा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. या सतत पडणाऱ्या पावसामुळे व खराब हवामानामुळे जंजिरा किल्ला पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. हा किल्ला काही दिवस बंद होता. त्यामुळे पर्यटकांना किल्ला दर्शन न होताच परतावे लागत होते. परिणामी, पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी होती. मात्र, आता हवामान पूवर्वत झाल्याने जंजिरा दर्शनासाठी किल्ल्यावर जाणे शक्य झाले आहे.
पावसाळ्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव जंजिरा किल्ल्यावरील प्रवासी वाहतूक पुरातत्त्व खात्याकडून बंद ठेवली जाते. यंदा सतत पाऊस पडत राहिल्याने जॉजिरा जल वाहतुक संस्थेतील कर्मचारी व बोट मालकांचा रोजगार कमी झाल्याने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजपुरी बंदर, दिघी बंदर तसेच खोराबंदर येथून पर्यटकांना ऐतिहासिक जलदुर्ग पाहता येणार आहे. दिवाळीनंतर खरा मासळीचा हंगाम सुरु होतो. त्यामुळे सुरमाई, पापलेट, हलवा, रावस, शेवंड, कोळंबी आदी ताज्या मासळींवर खवय्यांना ताव मारण्याची खरी पर्वणी आहे.
हेदेखील वाचा : कुणाचीच हिंमत नाही या ठिकाणांना भेट देण्याची… चुकूनही इथे कोणी जात नाही; भारताच्याही एका ठिकाणचा समावेश
दरम्यान, याठिकाणचे निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक स्थळे, जंजिरा, पद्मदुर्ग किल्ले व गोड माडी हे पर्यटकांना आकर्षित करत असते. २६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर किल्ला बंद असल्याने दूरदूरच्या पर्यटकांची घोर निराशा होत होती. परंतु आता हवामान अनुकूल असल्याने जंजिरा पाहण्यासाठी पर्यटकांना जाता येणार आहे.
अरबी समुद्राच्या लहान बेटावर किल्ला
अरबी समुद्राच्या एका लहान बेटावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ९० फूट आहे. हा किल्ला इतका मजबूत आहे की, शत्रूंसाठी तो अजिंक्य किल्ला बनला. किल्ल्याची रचना फार अनोखी असून त्याला समुद्राच्या मध्यभागी बांधले गेले आहे, म्हणजेच किल्ल्याच्या चारही बाजूंनी आपल्याला फक्त पाणीच पाणी दिसून येणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा याला चांगला प्रतिसाद असतो. त्याच हा किल्ला काही दिवस बंद असल्याने अनेकांची नाराजी होती. मात्र, आता हा किल्ला सुरु झाला आहे.






