फोटो सौजन्य- istock
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थैमान घातलेल्या पावसाचा जोर आता काहीसा ओसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. तर काही नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं. नदी नाले देखील ओसंडून वाहत होते. पण आता पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज राज्यातील बहुंताश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यात आज संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेदेखील वाचा- सहलीसाठी आलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; गाडीचा झाला चक्काचूर
आज कोकण, मध्य महाराष्ट्र, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज कोकण, मध्य महाराष्ट्र, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि विदर्भाला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर मराठवड्यात आज तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेदेखील वाचा- झारखंडमध्ये रेल्वे अपघात; 18 डबे रुळावरून घसरले, 2 मृत्यू, 20 जण जखमी
आज ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यांना पुढील 4 ते 5 दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्या रायगडमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ आणि कोकणात पुढील काही दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३१ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस पुणे आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.