Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : भविष्यात शेतीच देशाला तारणार ; जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांचं वक्तव्य

भविष्यात जमिनीच आपल्याला जगाचा महासत्ता बनवू शकते, असं स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 27, 2026 | 01:02 PM
Karjat News : भविष्यात शेतीच देशाला तारणार ; जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांचं वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:
  • भविष्यात शेतीच देशाला तारणार
  • जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी यांचं वक्तव्य
कर्जत/संतोष पेरणे :  भविष्यात जमिनीच आपल्याला जगाचा महासत्ता बनवू शकते,त्यामुळे जमिनीवर काम करण्याची गरज असून जमिनीचे क्षेत्र कमी होत असताना आपले नेते जगातील तिसरी चौथी आर्थिक महासत्ता बनण्याची गोष्टी करीत आहे.पण ज्या ठिकाणी आपण आर्थिक स्तोत्र आहेत, त्या जमिनीमध्ये काम करण्याची गरज आहे. देशाचे पाण्याचे मंत्री सी आर पाटील यांना पाण्याची कमतरता किती कमी आहे याची कल्पना नाही आणि त्यामुळे जमीन आणि पाणी हे कमी पडत आहेत. हे ध्यानात न घेता मोठ्या घोषणा करणार असतील तर आर्थिक महासत्ता जे स्वप्नच राहील असे स्पष्ट मत ग्लोबल विकास ट्रस्टचे मयांक गांधी यांनी मांडले.गांधी हे नेरळ जवळील सगुणबाग येथे एसआरटी शेतकरी सन्मान सोहळ्यात उपस्थित होते.

स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांच्या जयंती निमित्त सगुणा रुरल फाउंडेशन यांचा वतीने एसआरटी पद्धतीनं शेती करणाऱ्या महाराष्ट्र राज्य आणि अन्य राज्यातील शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन कर्जत तालुक्यातील मालेगाव येथील सगुणाबाग येथे करण्यात आले होते. या सोहळ्याला ग्लोबल विकास ट्रस्टचे प्रमुख मयांक गांधी, कंट्रोल इंडिया युनियन च्या चिन्मयी देऊळगावकर,तसेच राज्याचे कृषी संचालक अंकुश माने,विभागीय सह संचालक आमले,कृषी रत्न शेतकरी शेखर भडसावळे,तसेच अनुराधा भडसावळे आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी राज्यभरातून शेतकरी या सन्मान सोहळ्यात सहभागी झाले होते,त्यात महाराष्ट्र राज्यातील 33 जिल्ह्यातील आणि शेजारच्या तेलंगणा,आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकरी सहभागी झाले होते.या सोहळ्यात राज्यातील आणि राज्य बाहेरील 33 शेतकऱ्यांना एसआरटी मध्ये उत्कृष्ट प्रकारे शेती करणाऱ्या सन्मानित करण्यात आले.तर राज्यात 17 ठिकाणी शेती शाळा करणाऱ्या 17शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.या सोहळ्याचे प्रास्ताविक करताना शेखर भडसावळे यांनी तर सूत्रसंचलन दिपाली केळकर यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजनात सगुणा रुरल फाउंडेशनचे अनुराधा भडसावळे तसेच अनिल निवळकर,परशुराम आगिवले, संध्या देवस्थळे,शरद वागळे, प्रमोद शिंदे, निलेश मानकर यांनी केले होते.

Matheran News : देव तारी त्याला कोण मारी; पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्… अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

ग्लोबल विकास ट्रस्ट चे प्रमुख मयांक गांधी यांनी यावेळी बोलताना आम्ही पाच हजार गावामध्ये काम करीत असून आमच्या या संस्थेत 30 हजार शेतकरी काम करीत आहेत.आर्थिक उलाढाल 38 हजार वर्षाला होती तर ती आता तीन लाख 90 वर पोहचली आहे.नीती आयोग कडून दखल घेतली गेली आहे.शेती मध्ये काम करून शेतकऱ्यांना बदलण्याची प्रक्रिया आता आम्ही गावांमध्ये जाऊन करीत आहोत.सर्वांना एकत्र घेऊन गावे एकत्र येत शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याची गरज आहे,लहान शेतकऱ्यांना एकत्र घेऊन मोठे आणि वेगळे विचार करून सर्वांनी एकत्र येऊन मोठी उद्दिष्ट समोर ठेवली पाहिजेत आणि बदलली पाहीजेत.आम्ही गावे एकत्र येऊन शेतीमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय.परळी मध्ये या आणि आम्ही तेथे काय बदलले आहे हे पाहता येईल.पालघर मध्ये करीत असून पारंपरिक शेती मधून उच्च पातळीच्या शेतीकडे जाण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला.देशात विविध 23 ठिकाणी गावांना एकत्र करून समूह शेतीचे माध्यमातून अधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत,आमच्या चळवळीत सहभागी होऊन बळ द्या असे आवाहन मयांक गांधी यांनी केले.

अंकुश माने.. कृषी संचालक,कृषी आयुक्तालय पुणे एसआरटी तंत्र हे फळझाडामध्ये एसआरटी हे तंत्र शेतकरी पुरस्कार प्राप्त करून देत नाहीतर एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार मिळवून देणारे शेतकरी आहेत.आपले तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहचवण्याचे कार्य शेखर भडसावळे यांच्या माध्यमातून सुरू असून पर्यावरण पुरक असे तंत्रज्ञान असल्याने शेतकऱ्यांना हे फायदेशीर असेच आहे. ए आय आणि शेती अशी स्पर्धा नसणार आहे,हे नवीन तंत्रज्ञान शेतीसाठी पूरक आहे.

एसआरटी पुरस्कार प्राप्त शेतकरी..
केशव गिराम..परभणी
परशुराम आगिवले.. कर्जत रायगड
गोपाल झगडे..रत्नागिरी
रामचंद्र पुंड..छत्रपती संभाजीनगर,
दीपक जोशी..जालना
मीरा काळे..अहिल्यानगर, निलेश पानसरे..नाशिक,
शंकर गायकवाड.. नाशिक
डॉ गणेश पोटे… जालना
प्रकाश खोब्रागडे.. चंद्रपूर,
दिनकर काळे..यवतमाळ,
उमेश पोहदरे,
अरुण तांडेल,रामचंद्र हाबळे.. कर्जत रायगड
डॉ एस डी सोमवंशी.. जालना, किशोर उत्तमचंद्र जैन..जालना वामन कडाळी..बीड
शिवाजी बादाडे, विलास झुंजारराव.. शहापूर ठाणे
उषा देवरे.. जळगाव
सुरेश नरवडे.. संभाजीनगर ,
स्वप्नील महाजन.. बुलढाणा, अभिनंदन सौंदते.. कोल्हापूर, विद्याधर शिंदे.. सातारा, राजाभाऊ देशमुख.. वर्धा, पंकज देसले.. नंदुरबार
महारू जाधव.. नाशिक,
किर्ती नगरे.. नाशिक,
दत्तात्रय जंगले .. लातूर
गुजरात राज्यातील धरमपूर येथील गोविंद धूम,
तेलंगणा राज्यातील सैदापूर जिल्ह्यातील भगवान रेड्डी,हैदराबाद राज्यातील वेंकटराव मलेला, आंध्र प्रदेश राज्यातील नागेंद्र रेड्डी असे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Web Title: Karjat news agriculture will save the country in the future statement of senior social activist mayank gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : प्रस्तावित शिलार धरण हद्दपार करणारच; आक्रमक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा निर्धार
1

Karjat News : प्रस्तावित शिलार धरण हद्दपार करणारच; आक्रमक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा निर्धार

Matheran News :  देव तारी त्याला कोण मारी; पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्… अंगाचा थरकाप उडवणारा अपघात
2

Matheran News : देव तारी त्याला कोण मारी; पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्… अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल
3

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Karjat News: कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चोरीला गेलेले साडेसात लाखांचे सोने तक्रारदाराला मिळवून दिले परत
4

Karjat News: कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चोरीला गेलेले साडेसात लाखांचे सोने तक्रारदाराला मिळवून दिले परत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.