
IMD, Weather update, Winter Peak Months,
पुणे आणि नाशिकमध्येही तापमान ७ ते ८ अंशांपर्यंत खाली आले आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की उत्तर भारतातून वेगाने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. मध्य, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पाऱ्याची घसरण यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतातून वेगाने थंडगार वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत राज्यात थंडीची लाट पसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा किमान ७ ते १० अंशांपर्यंत पोहचला आहे. अहिल्यानगर मध्ये राज्यातील सर्वात कमी ६.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (Weather Update)
याशिवाय, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भात आणि शेजारच्या छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यांनाही थंडीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने संपूर्ण महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमान ५ अंशांपर्यंत घसरले आहे. विदर्भात ७ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच शेजारील छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश आणि तेलंगणा या प्रदेशांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने राज्यभर गारठ्याची तीव्रता जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमान ५ अंशांपर्यंत खाली आले असून, विदर्भात ७ ते ८ अंशांची नोंद होत आहे. त्यामुळे या भागांमध्ये पुढील काही दिवस शीतलहर कायम राहू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम असून हवामान विभागाने जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.
धुळे, निफाड आणि अहमदनगरच्या काही भागांत तापमान ४ अंशांपर्यंत खाली आल्याने नागरिकांनी रात्री बाहेर पडणे कमी केले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड लहरींचा प्रभाव कायम राहिल्याने पुढील काही आठवड्यांत थंडी आणखी वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, ला निनोच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे महिने राज्यासाठी सर्वाधिक थंड ठरण्याची शक्यता आहे.
भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष
नाशिकच्या निफामध्ये पारा 6.1 अंशापर्यंत खाली घसरला आहे. नाशिकचे तापमान ८ अंशांपर्यंत खाली गेल्याने थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. गेल्या दोन तीन दिवसांत तापमानात घट झाली असून पुढील दोन ते तीन दिवस ही थंडी कायम राहणार आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
पुढील दोन दिवस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी तापमान राहणार असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याने राज्यात थंडीचा कडाका आणखी तीव्र होणार आहे. हवामान विभागाने यासाठी १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा:- जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर
विदर्भ: गोंदिया,नागपूर
उत्तर महाराष्ट्र:- नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर
पश्चिम महाराष्ट्र:- पुणे, सोलापूर