हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस शहरातील तापमानात सौम्य वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठवणाऱ्या थंडीपासून पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लास्टिक, रबर किंवा कचरा जाळून शेकोटी करून हवा प्रदुषण केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.
पुढील चार दिवस किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी (दि. १४) शहरात किमान तापमान हे १२.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.