२४ तासांत वीज कोसळून २२ जणांचा मृत्यू
पश्चिम बंगाल, उत्तर तामिळनाडू आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील आणि लगतच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. आज राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत 14 आणि 15 नोव्हेंबरला वादळी वाऱ्यासह हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. वातावरणात बदल देखील जाणवू लागला आहे. सकाळी धुके आणि थंडी पडत असून दुपारच्या वेळेत मा्त्र ऊन जाणवतं. काही शहरांमध्ये थंडीत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झाले असून त्यामुळे पावसाची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा: “काेणता पक्ष, नेता यांच्याकडे बघून…”; शेतकरी मदतीवरून मुरलीधर मोहोळांची जयंत पाटलांवर टीका
मुंबईतील तापमानात घट झाली असून मंगळवारी किमान तापमान 20 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बुधवारी सकाळचे तापमानही २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले. गुरुवार ते रविवार तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा हळूहळू तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणावर परिणाम होऊन राज्यात पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील उर्वरित भागात आज हवामान कोरडे किंवा थंड राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील हवामान कोरडे राहण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश प्रामुख्याने निरभ्र आणि सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी आकाश प्रामुख्याने निरभ्र आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा: ‘भविष्यात महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो’; चांदिवलीच्या सभेत राज ठाकरेंनी राजकारण्यांचे काढले वाभाडे