येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्र या! राज ठाकरेंनी दिले आदेश, काय घोषणा करणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज चांदिवलीत प्रचारसभा पार पडली. महेंद्र भानुशाली यांच्या प्रचार सभेत बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील पुढील राजकीय परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. तसेच राज्यातील राजकीय घडामोडींवरून राजकीय पक्ष आणि नेत्यांचे पुन्हा एकदा वाभाडे काढले. पैशाने विकले जाणाऱ्या नेत्यांना या निवडणुकीत निवडून देऊ नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.
2024 ची निवडणूक चेष्टेत घेऊ नका, कारण ज्या प्रकारच्या घडामोडी घडल्या आहेत. उद्या जर अशाच प्रकारे गद्दारांना पाठिंबा मिळणार असेल तर त्याचा समज, असा होईल की मी जे करत आहे मी जे केलं आहे, ते बरोबरचं आहे. असं घडलं तर भविष्यातल्या महाराष्ट्राला केवळ देवच वाचवू शकतो. दुसरं कोणीही नाही वाचवू शकत नाही. सगळ्यांचा समज असा होणार आहे की, असेच पैसे घेऊन विकलं गेलं पाहिजे. आज त्या पक्षातून या पक्षात या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांना असं वाटेल की आपण काही जरी केलं तरी लोक आपल्याला मतदान करतात.
महेंद्र भानुशाली यांना चांदिवलीतून मनसेने उमेदवारी दिली आहे. भानुशाली यांचा प्रचार करताना राज ठाकरे यांनी विरोधी पक्षांच्या उमदेवारांचाही समाचार घेतला. दिलीप लांडे हे आधी मनसेचे नगरसेवक होते, त्यांनी मनसेतून बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावरून राज ठाकरेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आमचा महिंद्रा येथे उभा आहे. येथे अजून दोन लांडे उभे आहेत. दोन का एक लांडे उभे आहेत. त्यांच्यासाठी गद्दार आणि हरामखोर हे शब्द कमी असल्याचा टोला त्यांनी लगावला.
लांडे नगरसेवक बनल्यानंतर महानगरपालिकेत स्टँडिंग कमिटीमध्ये चार चार वर्ष बसले. दुसऱ्यांना संधी देण्याचा विचार केला तर लांडे मनसेतून शिवसेनेत गेले. त्यावरून बोलताना राज ठाकरे म्हणाले, दुसऱ्याला संधी देण्यासाठी त्यांना थोडं थांबवलं तर ते शिवसेनेत विकले गेले. ज्यावेळी ते विकले गेले त्यावेळी अमित ठाकरे आजारी होता, तरीही यांनी पक्षाशी गद्दारी केली, असं राज ठाकरे म्हणाले.
त्यामुळे अशा माणासांना तुम्हा पुन्हा निवडणून देणार का. संपूर्ण राज्यात हे असं घाणेरडं राजकारण सुरू आहे. पक्ष माहिती नाही, विचार माहिती नाहीत. पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात जात आहेत. सत्तेसाठी काहीही करायला हे नेते तयार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने सावध झालं पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे.