Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather Alert: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

जळगाव, धुळे, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात मुळधार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेनागरिकांनी विशेषतः मोकळ्या परिसरात असताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 17, 2026 | 08:35 AM
Weather Update : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले...

Weather Update : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले...

Follow Us
Follow Us:
  • सातारा, कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी या ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा.
  • घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता.
  • जळगाव, धुळे, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि लातूरमध्ये विजांसह पावसाचा अंदाज.
Maharashtra Weather Alert: राज्यात सध्या काही भागांत पावसाने विश्रांती घेतली असली तरी, काही ठिकाणी पावसाचा जोर अद्याप कायम आहे. खास बाब म्हणाजे श्रावण मास सुरू झाल्यामुळे राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. गेल्या आठवडाभरात पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पण आता पुन्हा एकदा हवामान विभागाने आज राज्यातील पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

BWF World Championships 2026: दिल्लीत रंगणार ‘शटल वॉर’! जगातील दिग्गज भिडणार,

‘या’ जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज

दुसरीकडे जळगाव, धुळे, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात मुळधार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेनागरिकांनी विशेषतः मोकळ्या परिसरात असताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

उर्वरित राज्यात श्रावण सरी

याशिवाय राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक श्रावण सरी बरसण्याची शक्यता आहे. तर, काही भागांत ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी ऊन असे चित्र पाहायला मिळणार आहे. एकीकडे काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी अनेक भागांत पावसाचा जोर कमी असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत हे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यालाच लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किमीमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुलीच्या लग्नावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या सुप्रिया सुळे; आरएसएस संबंधित कुटुंबीयांबरोबर कसे जुळले सूत?

मराठवाड्यात आज काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल, असे चित्र नाही. स्थानिक पातळीवर ढगांची स्थिती आणि पावसाची तीव्रता बदलण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पुढील दोन दिवस राज्यात पावसाची स्थिती कशी राहणार?

१८ आणि १९ ऑगस्टलाही राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. यामध्ये कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहण्याची शक्यता  हवामान विभागाने वर्तवली आहे.  गेल्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस न पडल्याने आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात  या भागातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट किंवा जोरदार वारे सुरू असताना नागरिकांनी शक्यतो खुल्या जागेत जाणे टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय घाटमाथा  परिसरातून प्रवास करताना स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाने जारी केलेल्या  सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra weather yellow alert in pune satara kolhapur rain update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • Maharashtra Weather

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.