
Rohit Patil News, MLA Rohit Patil, Farmer Relief Package,
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना जाहीर झालेले पॅकेज ही केवळ दाखवणूक आहे का, हे तपासण्याची वेळ आली आहे. भरपाई पूरक नाही, आणि शासनाचे धोरण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे अजूनही दिसत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन पॅकेजची वास्तविकता पारदर्शकपणे जनतेसमोर आणावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
अजूनही मदत थेट खात्यावर नाहीच
ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहोचलेली नाही. केवायसी प्रक्रियेतील त्रुटी, पडताळणीतील विलंब आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना खेटे मारावे लागत आहे. कृषी मंत्र्यांकडे केवायसी संदर्भातील ठोस मागणी करणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले. (Farmers Protest)
अधिवेशनाबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले, अधिवेशनाचे दिवस वाढायला हवे होते. राज्याचे कळीचे प्रश्न मांडण्यास वेळ मिळत नाही. लोकप्रतिनिधींना चर्चा करण्यासाठी पुरेशी संधी मिळाली असती, तर अधिक काम घडले असते. (Maharashtra Winter Session)
पाटील म्हणाले, ३१ हजार कोटींच्या पॅकेजची खुर्चीवर बसून घोषणा होते: पण प्रत्यक्ष मदत साडेसहा हजार कोटीपलीकडे जाणार नाही, अशीचा परिस्थिती आहे. त्यामुळे आकड्यांचा देखावा बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत काय पोहोचते, हे तपासले पाहिजे.