Winter Session Live : महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन हे कोणत्याही विरोधी पक्षनेत्याशिवाय होणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता राहिलेला नाही.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवर पडतो का, तसेच सरकारकडून काही नवीन घोषणा होतात का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
आमदार निवासस्थाने, रविभवन, नागभवन, हैदराबाद हाऊस, १६० खोल्या, विधानभवन आणि विधान परिषद इमारत सजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. नवीन फर्निचर, रंगरंगोटी आणि रस्ते सजविले आहेत.
अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य रविवारी दुपारपर्यंत नागपुरात दाखल होणार आहेत.
यंदाचं हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली असून 8 ते 14 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होणार आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक होती. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधी संदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे.