Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर..; काय सांगतात नियम अन् राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात महायुती सरकारचा शपथग्रहन सोहळा २ डिसेंबरला होणार आहे. हे जवळपास निश्चित झालं आहे. पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल? याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 29, 2024 | 06:33 PM
७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर; काय सांगतात नियम अन् राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात? वाचा सविस्तर

७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर; काय सांगतात नियम अन् राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात महायुती सरकारचा शपथग्रहण सोहळा डिसेंबरच्या पिहल्या आठवड्यात होणार आहे. हे जवळपास निश्चित झालं आहे. पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल? याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम असून कोणाचंही नाव अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाला लागल्यापासून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा महायुतीतील तिन्ही पक्ष आणि भाजपचं हाय कमांड ठरवतील, असं वारंवार सांगण्यात येत आहे. गुरुवारी रात्री दिल्लीत रात्री उशिरापर्यंत हाय व्होल्टेज ४ बैठका झाल्या, तरीही मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला. दरम्यान निकाला जाहीर होऊन ६ दिवस उलटले आहेत. तर विधानसभेची मुदत संपून ३ दिवस, अशा परिस्थितीत किती दिवसात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणं अनिवार्य आहे आणि जर असं नाही घडलं तर काय होऊ शकतं, जाणून घेऊया…

मुख्यमंत्रिपदाबाबत बातम्या वाचण्यासाठी इथे क्लि करा

कोणत्याही राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर १ ते ७ दिवसांच्या आत मुख्यमंत्रिपदाचं नाव घोषित केले जातं आणि शपथग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. जर कोणतीही पक्ष सरकार बनवण्याचा दावा करत नसेल, तर अशा परिस्थितीत राज्यपाल सर्वाधिक मते जिंकणाऱ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकत. जर सर्वाधिक मते मिळवणारा राजकीय पत्रही सरकार स्थापन करण्यात अयशस्वी ठरला, तर राज्यपाल दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी देतात.

राज्यपालांच्याकडे कोणते अधिकार आहेत?

जर राज्यात सरकार स्थापन करण्यात अडचणी येत असतील तर राज्यापाल राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शिफारस करू शकतात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५६ मध्ये, राष्ट्रपती राजवट कधी लागू केली जाऊ शकते, याबाबत तरतूद आहे. राष्ट्रपती, राज्यपालांकडून अहवाल प्राप्त केल्यानंतर खात्री करून राज्यात सरकार संविधानाच्या तरतुदींनुसार चालवता येणार नाही, अशी स्थिती आहे का, याची पडताळणी तरतात. पहिल्या टप्प्यात ६ महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकतो मात्र ही मुदत ३ वर्षांपर्यंतही वाढवली जाऊ शकते.

राजकारणाबाबत बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्राच्या प्रकरणात सध्यातरी अशी परिस्थिती नाही. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. त्यात आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की महाराष्ट्रात सर्वात चर्चेत असलेले एकनाथ शिंदे हे पु्न्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसतात की देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रिपदाची माळ पडते की नवा चेहरा समोर येऊ शकतो. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर तर, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री बनवलं जाऊ शकत, अशी चर्चा आहे.

Web Title: Mahayuti cm oath ceremony how many days mandatory oath as cm what is powers have governor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 05:03 PM

Topics:  

  • Maharashtra CM
  • maharashtra election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.