फोटो सौजन्य - Ajit Pawar X अकाउंट
पुणे : आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्याने अनेक विषयांवर भाष्य केले आहे. अजित पवार यांनी त्याच्या वेषभूषेवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, मला व्यक्ती स्वातंत्र आहे, मी काय घालायचे हा माझा अधिकार आहे. मी माझ्या पैशाने घालतो ना तुमच्या कोणाच्या पैशाने तर घालत नाही. काही वेगळं तर केलं नाही आहे, सामान्य लोकं जसे घालतात तसेच घातले आहे असे ते म्हणाले.
लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला यावर अजित पवार म्हणाले की, विरोधक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. आधीही वेगवेगळ्या प्रकारच्या रोजना राबवल्या होत्या. याआधी आम्ही कर्जमाफी सुद्धा दिलेली होती, ती चालली होती. त्या त्या वेळेची परिस्थिती पाहून आम्हाला असं वाटलं की, आपल्या देशामध्ये काही राज्यांमध्ये काही चांगल्या रोजना राबवल्या जातात आणि त्या तिथल्या महिला अधिक उपयुक्त ठरतात, म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली. २००३ मध्ये सुद्धा वीजमाफीची योजना आणली होती. शिंदे साहेबानी ती जाहीर केली आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर ती विड्रॉ करण्यात आली हे माहिती आहे का? त्यांना असा प्रश्न अजित पवारांनी केला आहे.
ज्या पाच महत्वाच्या योजना आणल्या आहेत, ते गरिबांच्या भल्याकरिता आणल्या आहेत श्रीमंतांसाठी नाही आणल्या. ज्याचं २,५०,००० लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा भगिनींना आणलेलं आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा अर्थ भगिनींना ही योजना आवडलेली आहे. विरोधक आता या योजनेबद्दल काही न काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कारण उद्या जर ते म्हणाले की, ही योजना चांगली आहे तर त्यांना ही त्याचा फटका बसणार आहे.
विधानसभा तिसरी आघाडी यासंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले की, विधानसभा तिसरी आघाडी अशा प्रकारच्या बातम्या माझ्याही कानावर आला आमची देखील करमणूक होते हे ऐकून. या कानाने ऐकतो त्या कानाने सोडून देतो. महायुती भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार आहे असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.