Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना दिलासा ! वीज दरात होणार मोठी कपात

औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांसाठी ‘टाईम ऑफ डे’ (TOD) सवलत कायम ठेवण्यात आली आहे. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान १५ टक्के, तर ऑक्टोबर ते मार्चदरम्यान २५ टक्के सवलत मिळणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2026 | 02:45 PM
Pune News : शहरात ओव्हरहेड केबलचा विषय जोरात चर्चेत; तोडगा काढण्यासाठी अनेक पर्याय समोर

Pune News : शहरात ओव्हरहेड केबलचा विषय जोरात चर्चेत; तोडगा काढण्यासाठी अनेक पर्याय समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने जाहीर केला असून, २०३० पर्यंत दरवर्षी १ एप्रिलला वीजदर टप्प्याटप्प्याने कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरणच्या २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीतील बहुवार्षिक वीजदर याचिकेला आयोगाने मंजुरी देत सर्व प्रवर्गातील ग्राहकांना दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

महावितरणच्या वीजदर प्रस्तावावर यापूर्वी विविध स्तरांवर कायदेशीर घडामोडी घडल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर आधीचा आदेश रद्द केला होता, तर सर्वोच्च न्यायालयानेही सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून नव्याने निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयोगाने जनसुनावण्या घेऊन आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करत अंतिम आदेश दिला असून, यामुळे वीजदरांबाबत २०३० पर्यंतची स्पष्टता निर्माण झाली आहे.

घरगुती ग्राहकांना अधिक दिलासा

१ एप्रिल २०२६ पासून आदेशाच्या दुसऱ्या वर्षाची अंमलबजावणी सुरू होत असून, वीजदरात आणखी कपात होणार आहे. महिना १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर ७.३१ रुपयांवरून ७.१० रुपये प्रति युनिट इतका कमी होणार आहे. पाच वर्षांत या वर्गासाठी सुमारे २६ टक्के कपात होणार आहे. १०० ते ३०० युनिट वापरासाठी दर १३.१७ रुपयांवरून १२.९४ रुपये होणार आहे. स्मार्ट मीटरधारक घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या कालावधीत प्रति युनिट सवलत ८० पैशांवरून वाढवून ८५ पैसे करण्यात आली आहे.

उद्योग व व्यावसायिकांना ‘टीओडी’चा लाभ कायम

औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांसाठी ‘टाईम ऑफ डे’ (TOD) सवलत कायम ठेवण्यात आली आहे. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान १५ टक्के, तर ऑक्टोबर ते मार्चदरम्यान २५ टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असून, पहिल्या पाळीत स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार आहे. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठी दर १०.७८ रुपयांवरून १०.७१ रुपये करण्यात आला आहे.

ई-वाहनांना प्रोत्साहन, सौरऊर्जेला संरक्षण

विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी २०२६-२७ साठी ९.५० रुपये प्रति युनिट दर निश्चित करण्यात आला असून, तो २०२८-२९ पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे ई-वाहन वापराला चालना मिळणार आहे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांना चार्जिंग सुविधा उभारण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांच्या सवलती कायम ठेवण्यात आल्या असून, नव्या दररचनेत त्यांना कोणताही फटका बसणार नाही.

दरवर्षी घट; ग्राहकांना दिलासा कायम

या आदेशानुसार २०२९-३० पर्यंत दरवर्षी १ एप्रिलला वीजदर आणखी कमी होत जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून उद्योग क्षेत्रापर्यंत सर्वांनाच दिलासा मिळणार असून, राज्याच्या अर्थचक्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Farmers News : कर्जमाफी घोषणेनंतरही सावकारी जाच; राज्यात ११ हजारांवर सावकार; तर ९ लाख शेतकरी अद्यापही सावकारांचे देणेकरी

Web Title: Major reduction in electricity rates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Light Bill

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.