Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा पोलिस दलात मोठे फेरबदल; सहा नवे निरीक्षक जिल्ह्यात दाखल, आयजींचे आदेश

सातारा जिल्ह्याला सहा पोलिस निरीक्षकांची नियुक्ती मिळाली आहे. पोलिस निरीक्षक आण्णा पवार यांची पुणे ग्रामीण येथून, तर महेश इंगळे आणि सतीश होडगर यांची कोल्हापूर येथून सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 02, 2026 | 01:54 PM
सातारा पोलिस दलात बदल्यांचा मोठा फेरबदल; सहा नवे निरीक्षक जिल्ह्यात दाखल, आयजींचे आदेश

सातारा पोलिस दलात बदल्यांचा मोठा फेरबदल; सहा नवे निरीक्षक जिल्ह्यात दाखल, आयजींचे आदेश

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा फेरबदल करण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या बदल्यांमुळे काही अनुभवी अधिकारी जिल्ह्याबाहेर गेले असले, तरी सातारा जिल्ह्याला सहा नव्या पोलिस निरीक्षकांची भर पडली आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदांवर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

जारी आदेशानुसार, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सुनील शेळके आणि संदीप जगताप यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची सांगली येथे नियुक्ती करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक दादाभाऊ पवार व वंदना श्रीसुंदर यांची पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली करण्यात आली आहे.

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल! नव्या जबाबदाऱ्यांसह कामगिरीकडे लागल्या सर्वांच्या नजरा

दरम्यान, या बदल्यांमध्ये सातारा जिल्ह्याला सहा पोलिस निरीक्षकांची नियुक्ती मिळाली आहे. पोलिस निरीक्षक आण्णा पवार यांची पुणे ग्रामीण येथून, तर महेश इंगळे आणि सतीश होडगर यांची कोल्हापूर येथून सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तसेच पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांची पुणे ग्रामीण येथून साताऱ्यात नियुक्ती झाली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे जिल्हा पोलिस दलाची प्रशासकीय व कार्यक्षम ताकद अधिक बळकट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अरुण देवकर यांना मुदतवाढ

याशिवाय, पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत यादव आणि अभिजीत चौधरी यांनाही एक वर्षाची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. पोलिस दलातील या बदल्यांमुळे जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजात नव्या जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीला चालना मिळणार असून, आगामी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या बदल्यांना महत्त्वाचे मानले जात आहे.

St Bus News : महाबळेश्वर एसटीचा ‘राम भरोसे’ प्रवास अखेर संपला! १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल

Web Title: Major reshuffle in satara police force six new inspectors arrive in the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Satara Police

संबंधित बातम्या

Khandala Ammonium Nitrate Truck Case: खंडाळ्यात तब्बल १०५ टन स्फोटक अमोनियम नायट्रेट जप्त; चालकांसह कंपनी अधिकाऱ्यांवर गुन्हा
1

Khandala Ammonium Nitrate Truck Case: खंडाळ्यात तब्बल १०५ टन स्फोटक अमोनियम नायट्रेट जप्त; चालकांसह कंपनी अधिकाऱ्यांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.