Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालेगाव मनपावर ‘महिलाराज’! महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीनबानो, तर उपमहापौरपदी शान-ए-हिंद विजयी; शिवसेनेचा दारुण पराभव

मालेगाव मनपा निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या नसरीनबानो शेख महापौरपदी तर समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद उपमहापौरपदी विजयी झाल्या आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांचा २५ मतांनी पराभव.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 08, 2026 | 05:09 PM
महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीनबानो, तर उपमहापौरपदी शान-ए-हिंद विजयी (Photo Credit- X)

महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीनबानो, तर उपमहापौरपदी शान-ए-हिंद विजयी (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मालेगाव मनपावर ‘महिलाराज’! महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीनबानो,
  • पमहापौरपदी शान-ए-हिंद विजयी
  • शिवसेनेचा दारुण पराभव
Malegaon Mayor Election 2026: मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीनबानो खालीद शेख व उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए-हिंद या प्रत्येकी २५ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार लता घोडके व उपमहापौरपदाचे उमेदवार निलेश काकडे यांचा दारुण पराभव केला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे मनपावर इस्लाम व समाजवादी पार्टीचा झेंडा फडकला आहे. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर व उपमहापौर महिला विराजमान झाल्याने मनपावर आता महिलाराज आला आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकीत एमआयएमचे एकवीस व भाजपचे दोन अशा २३ नगरसेवकांनी तटस्थची भूमिका घेतली. इस्लाम-सपा व सेनेत महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक झाली. यात शिवसेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मनपाच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी शनिवार (दि. ७) रोजी सकाळी ११ वाजता मनपाच्या सभागृहात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या उपस्थितीत विशेष महासभा बोलविण्यात आली होती. प्रारंभी महापौर पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

२३ सदस्य तटस्थ

उपमहापौर पदासाठी आठ नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. माघारीच्या मुदतीत एमआयएमचे नगरसेवक हाफिज अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे मुस्तकीम डिग्निटी, शिवसेनेचे नरेंद्र सोनवणे यांनी माघार घेतली. उपमहापौरपदासाठी शान-ए-हिंद व सेनेचे निलेश काकडे यांच्यात सरळ सामना झाला. प्रारंभी शिवसेनेचे उमेदवार काकडे यांच्यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले त्यांना १८ मते मिळाली तर समाजवादी पार्टीच्या नगरसेविका शान-ए-हिंद यांना ४३ मते मते मिळाली. या निवडणुकीतही एमआयएम २१ व भाजपच्या २ अशा २३ नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली होती.

धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान; भूम–परांड्यात सर्वाधिक तर लोहाऱ्यात झाले सर्वात कमी मतदान

शिवसेनेच्या उमेदवार लता घोडके यांना केवळ १८ मते

मनपा सभागृहात ८४ नगरसेवक उपस्थित होते. यावेळी महापौरपदासाठी दाखल असलेल्या पाच नाम निर्देशन पत्रांची जिल्हाधिकारी प्रसाद यानी छाननी केली. या प्रक्रियेत पाचही अर्ज वैध ठरविण्यात आले. यानंतर ११.१० ते ११.२५ पर्यंत म्हणजेच पंधरा मिनिटे माधारीची दिली. या वेळेत इस्लाम पार्टीच्या ताहेरा शेख यानी माघार घेतली, परिणामी महापौर पदासाठी इस्लाम पार्टी व शिवसेनेत सरळ लढत झाली. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. प्रारंभी शिवसेनेच्या उमेदवार लता घोडके यांच्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यांना केवळ १८ मते पडली तर नसरीन बानू खालीद शेख यांना ४३ मते मिळाली. त्यांचा २५ मतांनी विजयी झाला. महापौर पदाच्या निवडणुकीत एमआयएमचे २१ व भाजपचे २ अशा २३ नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. तर कॉंग्रेसच्या तिघा नगरसेवकांनी इस्लाम व समाजवादी पार्टीला पाठिबा दिला होता. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मनपाच्या महापौरपदी नसरीन शेख यांची निवड झाल्याचे सभागृहात घोषित केले.

मनपा मालेगावच्या महापौर नसरीनबानो शेख म्हणाल्या, नागरिकांना तपास यंत्रणा व एसआयटीच्या माध्यमातून त्रास दिला गेला आहे. बनावट जन्म दाखलेप्रकरणी अनेकांना गोवण्यात आले. आता मनपाकडून कायदेशीर प्रक्रिया पार पाडू. शहर विकासासाठी कायम प्रयत्नशील राहू. शहरातील स्वछता, नागरी सुविधा सोडविल्या जातील, विशेष करून आरोग्य सुविधांवर भर दिला जाईल शहर अतिक्रमण मुक्त करू, इस्लाम व समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवक व मतदारांची आभारी आहे.

तसेच उपमहापौर शान ए हिंद म्हणाल्या, इतिहासात दोन अल्पसंख्यांक महिला महापौर उपमहापौरपदी विराजमान झाल्या आहेत. हा संविधानाचा विजय आहे. विकासासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील राहू, पूर्व व पश्चिम असा भेदभाव केला जाणार नाही. सगळ्यांना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करू.

Salman Khan : RSS ला आले ग्लॅमर? संघाच्या कार्यक्रमातील सलमान खानची उपस्थिती चर्चेत; मुस्लीमांबाबत राऊतांचा रोखठोक सवाल

Web Title: Malegaon municipal corporation mayor nasreen bano shekh shan e hind victory news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • malegoan news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.