Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित 75 हजार युवक युवतींना…; काय म्हणाले मंत्री लोढा?

कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात राज्यातील आयटीआयमध्ये रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2025 | 06:13 PM
Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित 75 हजार युवक युवतींना…; काय म्हणाले मंत्री लोढा?
Follow Us
Close
Follow Us:

युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार

स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा केला जाणार

राज्यातील ४१९ आयटीआयमध्ये अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार

मुंबई: देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस असून हा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या अनुषंगाने राज्यातल्या सुमारे ७५ हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. येत्या १७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा सुरु राहणार असून १ ऑक्टोबरला राज्यातील ४१९ आयटीआयमध्ये अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभाग युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक उद्योगांच्या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवत आहेत. तर कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात राज्यातील आयटीआयमध्ये रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम सुरु होत आहेत. कौशल्य विकासाद्वारे युवक व युवतींचे सक्षमीकरण हा यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र अनेकांना नियमित कार्यशाळेत जाऊन वेळेअभावी किंवा इतर कारणास्तव प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नाही, अशा होतकरू युवकांना आणि युवतींना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात अल्पकालीन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आयटीआयच्या नियमित वर्गाच्या व्यतिरिक्त इतर उपलब्ध वेळेत हे अभ्यासक्रम घेण्यात येतील.

राज्यातील आयटीआयमध्ये सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबतच अतिशय अल्पदरात युवक आणि युवतींना रोबोटिक, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकासासंदर्भात अत्याधुनिक अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. स्थानिक उद्योग आस्थापनांमध्ये रोजगारासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि प्रशिक्षण त्याच जिल्ह्यात मिळाल्याने तरुणांना आपला जिल्हा सोडून अन्य ठिकाणी रोजगारासाठी जावे लागणार नाही.

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण होणार; मंत्री लोढांनी केले ‘हे’ आवाहन

उद्योगांना पूरक स्वयंरोजगाराच्या संधी या अल्पकालीन अभ्याक्रमाच्या माध्यमाने तरुणांना उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे सध्या आयटीआयचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींकडून या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या https://admission.dvet.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात सुरु होत असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती तसेच प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. अल्पकालीन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर युवकांना रोजगाराच्या संधीबाबत आणि स्वयंरोजगाराची माहितीही संबंधित आयटीआय संस्थेत प्रशिक्षणार्थींना दिली जाणार आहे. उपलब्ध जागांचा विचार करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून युवकांनी त्वरित या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करावी असे आवाहनही मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

Web Title: Mangal prabhat lodha said pm modi 75th birthday 75 thousand youths provided employment oriented training

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • New employment
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Mumbai: अपुऱ्या सुविधांमुळे मंगलप्रभात लोढा संतप्त! छठ पूजेच्या ठिकाणी तत्काळ सुविधा पुरवण्याचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश
1

Mumbai: अपुऱ्या सुविधांमुळे मंगलप्रभात लोढा संतप्त! छठ पूजेच्या ठिकाणी तत्काळ सुविधा पुरवण्याचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश

Bihar Elections 2025: बिहार निवडणुकीमध्ये ‘OBC कार्ड’ ठरणार गेमचेंजर? PM मोदींनी स्वतःसह केला नितीश कुमार यांचा उल्लेख
2

Bihar Elections 2025: बिहार निवडणुकीमध्ये ‘OBC कार्ड’ ठरणार गेमचेंजर? PM मोदींनी स्वतःसह केला नितीश कुमार यांचा उल्लेख

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी
3

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी

‘मी मोदीजी अन् भाजपाचा भक्त…’, म्हणणाऱ्या महेश कोठारेंना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “रात्री तात्या विंचू…”
4

‘मी मोदीजी अन् भाजपाचा भक्त…’, म्हणणाऱ्या महेश कोठारेंना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “रात्री तात्या विंचू…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.