Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: “गणेश मंडळ आणि भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय…”; मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2025 | 07:51 PM
Mangal Prabhat Lodha: “गणेश मंडळ आणि भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय…”; मंत्री मंगलप्रभात लोढा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबईत साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून, हा उत्सव अविस्मरणीय साजरा करणार आहोत तसेच गणेश मंडळ आणि भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेऊ असे, राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका डी विभाग कार्यालयात गणेश मंडळांसोबत समन्वय बैठक संपन्न झाली. या बैठकीला महापालिकेचे उपायुक्त मनीष वळंजू, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव गिरीश वालावलकर तसेच गणेश उत्सव मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. गणेश मूर्तींचे आगमन आणि विसर्जन यादरम्यान होणारी वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावरील बेवारस वाहने पार्किंग केलेल्या वाहनांना त्वरित हटवून रस्ते मोकळे करण्याच्या सूचनाही त्यांनी वाहतूक पोलिसांना केल्या. दरवर्षीप्रमाणे वन विंडो प्रणालीच्या माध्यमातून मंडळांना विविध प्रकारच्या ऑनलाइन परवानग्या देण्यास विलंब होऊ नये याची काळजी महापालिका अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, बसण्याची जागा, या सर्वच आवश्यक सोयींची पूर्तता करण्यासाठी प्रशासन तत्पर आहे असे ही त्यांनी सांगितले.

दक्षिण मुंबईत अविस्मरणीय होणार गणेशोत्सव

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले की, गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला असून, यावर्षीपासून अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका, बेस्ट प्रशासन आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने दक्षिण मुंबईत ताडदेव, गिरगाव, वाळकेश्र्वर, खेतवाडी आणि लमिग्टन रोड परिसरात वैविध्यपूर्ण सजावट करण्याचे सुद्धा नियोजन आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर समितीही स्थापन करण्यात येत आहे. न्यायालयाने दिलेले निर्देश आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करून हा उत्सव सर्वांनी मिळून जोरदार साजरा करावा असे आवाहनही मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केले.

Web Title: Mangalprabhat lodha said he will ensure that ganesh mandal and devotees do not face any inconvenience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 07:51 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai Ganesh Festival

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित 75 हजार युवक युवतींना…; काय म्हणाले मंत्री लोढा?
1

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित 75 हजार युवक युवतींना…; काय म्हणाले मंत्री लोढा?

गणेशोत्सवात मेट्रोला ‘अच्छे दिन’; दिवसाला तब्बल 3 लाखांहून अधिक भाविक करताहेत प्रवास
2

गणेशोत्सवात मेट्रोला ‘अच्छे दिन’; दिवसाला तब्बल 3 लाखांहून अधिक भाविक करताहेत प्रवास

Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी
3

Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी

Pune Ganesh Festival: गौरी विसर्जनानंतर पुण्यनगरीत गर्दीला उधाण; सलग सातव्या दिवशीही…
4

Pune Ganesh Festival: गौरी विसर्जनानंतर पुण्यनगरीत गर्दीला उधाण; सलग सातव्या दिवशीही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.