Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“रूग्णांना योग्य वेळेत उपचार मिळाले नाही तर…”, मंगलप्रभात लोढा यांचा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा

के. इ. एम रुग्णालयाचा कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पाहणी दौऱ्यादरम्यान रुगालयात केवळ नोंद करण्यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन ते तीन तास तात्कळत उभे राहावे लागत असल्याचे निदर्शनाला आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 10, 2025 | 06:29 PM
“रूग्णांना योग्य वेळेत उपचार मिळाले नाही तर…”, मंगलप्रभात लोढा यांचा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:
  • के. इ. एम रुग्णालयाचा गलथान आणि ढिसाळ कारभार
  • नातेवाईकांना दोन ते तीन तास तात्कळत उभे राहावे लागत
  • अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा

Manglaprabhat Lodha on KEM HOSPITAL : मुंबई महापालिकेच्या परळ येथील के. इ. एम रुग्णालयाचा कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज (10 नोव्हेंबर) पाहणी दौरा केला. यावेळी तिथल्या गलथान आणि ढिसाळ कारभाराबाबत रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांना जाब विचारला. पाहणी दौऱ्यादरम्यान रुगालयात केवळ नोंद करण्यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन ते तीन तास तात्कळत उभे राहावे लागत असल्याचे मंत्री लोढा यांच्या निदर्शनाला आले. त्यावेळी त्यांनी याबाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. मंत्री लोढा यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले असून पुढच्या आठवड्यापर्यंत रूग्णांना योग्य आणि वेळेत उपचार जर मिळाले नाहीत तर पुन्हा रुग्णालयाचा दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. गेल्या २५ वर्षात मुंबई पालिकेत सत्तेत असलेल्यांनी भ्रष्ट आणि बदलीची व्यवस्था उभी केली असून त्याचा सामान्य जनतेला आजही भुर्दंड बसत असल्याचे लोढा यांनी म्हटले आहे.

आम्ही तुमच्या जमिनीचे घोटाळे उघडकीस आणले तर…; जयकुमार गोरेंचा पवारांना इशारा

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या के. इ. एम रूग्णालयाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचा ढिसाळ आणि घोटाळेबाज कारभाराचा पाढाच वाचला. रुग्णांची नोंदणी करणारा विभाग अतिशय रुंद आहे, त्यात साधे पंखे ही नाहीत. एकाच जागेवर हजारोंच्या संख्येने लोक तिष्ठत असतात. जुनी इमारत दोन माळ्यांची तर नवी इमारत १३ माळ्यांची असून अनेकदा लिफ्ट बंद असते,अशा अवस्थेत रुग्णांना स्वतः संबंधित विभागात घेऊन जावे लागत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. खाजगी रक्त चाचण्या आणि इतर वैद्यकीय चाचण्या कंपन्यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याचा गंभीर आरोपही रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. साध्या साध्या रक्त चाचण्या करण्यासाठी ही खाजगी लॅबला पाठवलं जात असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच एमआरआय, सीटीस्कॅन, २ डी ईको, सोनोग्राफी या आवश्यक चाचण्यांसाठी रुग्णालयात ३ ते ६ महिन्यांचा वेटिंग पिरियड असल्याचेही सांगितले. एमआरआय टेस्टसाठी सध्या मार्च २०२६ पर्यंत वेटिंग, सीटीस्कॅनसाठी जानेवारी २०२६ पर्यंत वेटिंग सुरू आहे. सोनोग्राफीसाठी देखील हीच अवस्था असल्याचे दिसून आले आहे.

दलालीच्या विळख्यात रुग्णालय

बाहेरच्या चाचणी केंद्राची खळगी भरण्यासाठी वारंवार चाचण्यांसाठी रुग्णांना दलालांमार्फत खाजगी लॅब मध्ये पाठवलं जात असून याबाबतही मंत्री लोढा यांनी डीन डॉ. संगीता रावत यांना जाब विचारला. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात नोंदणी करण्यासाठी क्यू आर कोड आणि इतर संगणकीकरणाची यंत्रणा स्थापित करण्यासाठी पालिकेने तब्बल ५५६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असताना अजूनही व्यवस्था कार्यान्वित होत नसून हा भोंगळ कारभाराचा नमुना असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. याबाबत रावत यांना विचारणा करताच त्यांनी सोयीस्करपणे आवश्यक मनुष्यबळ नसल्याचे ढोबळ उत्तर दिले. यावेळी मंत्री लोढा यांनी निर्देश दिले की, ऑनलाईन प्रणाली वापरा किंवा अन्य सुविधाजनक व्यवस्था निर्माण करा, पण रुग्णाच्या नोंदीसाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ खर्च होता कामा नये.

Shivaji Park Pollution: शिवाजी पार्क प्रदूषण समस्या गंभीर! पालिका, रहिवासी आणि IIT तज्ज्ञांची संयुक्त बैठक

त्याचबरोबर वैद्यकीय व्यवस्थेत कश्याप्रकारे दलाली सुरु असल्याची माहितीही लोढा यांनी दिली. परदेशी वैद्यकीय शिक्षण घेऊन मुंबईत परतलेल्या डॉक्टरांना डे केअर सेंटरची नोंदणी करण्यासाठी खान नावाच्या व्यक्तीने तब्बल २५ लाख रुपये मागितले. ज्या पक्षाने गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली, त्यांनीच वैद्यकीय क्षेत्रातही दलालीची व्यवस्था उभारली असून त्यामुळेच सामान्य नागरिकांना त्यांचा अधिकार त्यांचे मिळत नाहीत. यासंदर्भात मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही निदर्शनाला हा प्रकार आणून देणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेतल्या तत्कालीन सत्ताधाऱ्यानी उभी केलेली दलालीची व्यवस्था दूरदर्शी आणि प्रागतिक विचारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात मोडीत काढली जाईल, असेही लोढा यांनी स्पष्ट केले.

Web Title: Manglaprabhat lodha warning to take strict action against officers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Shivaji Park Pollution: शिवाजी पार्क प्रदूषण समस्या गंभीर! पालिका, रहिवासी आणि IIT तज्ज्ञांची संयुक्त बैठक
2

Shivaji Park Pollution: शिवाजी पार्क प्रदूषण समस्या गंभीर! पालिका, रहिवासी आणि IIT तज्ज्ञांची संयुक्त बैठक

मोठी बातमी! MCA अध्यक्षपदाचा राजकीय तिढा सुटला; अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
3

मोठी बातमी! MCA अध्यक्षपदाचा राजकीय तिढा सुटला; अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड

Mumbai: आर्मी हेडक्वॉर्टरमधून कर्नलच्या केबिनची चोरी! पिस्तुल, काडतूसे आणि रोकड लंपास; गोव्यातून तिघांना अटक
4

Mumbai: आर्मी हेडक्वॉर्टरमधून कर्नलच्या केबिनची चोरी! पिस्तुल, काडतूसे आणि रोकड लंपास; गोव्यातून तिघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.