ट्रम्प टॉवरचे नाव बदलण्याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले की, ट्रम्पचे नाव हे केवळ व्यावसायिक भागीदारीमुळे देण्यात आले असून त्याचा कोणत्याही प्रकारच्या गौरवाशी संबंध नाही.
राज्य रक्त संक्रमण परिषदेची जबाबदारी राज्यातील रक्ताच्या उपलब्धतेवर देखरेख ठेवण्याची आहे. यासाठी मनुष्यबळ, रक्तसाठा, रक्तदात्यांच्या अद्ययावत याद्या आणि दुर्मीळ रक्तगट दात्यांचे नेटवर्क सतत सज्ज ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबईतील केईएम रुग्णालयाचे नाव बदलून 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक' रुग्णालय होणार आहे. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अवघ्या २५ आठवड्यांत आणि ६०० ग्रॅम वजनाने जन्मलेल्या बाळाने मृत्यूशी झुंज देत अखेर जीवनाची लढाई जिंकली. हे बाळ स्थिर होऊन केईएम रुग्णालयातून सुखरूप घरी परतले आहे.
व्हिडिओ-ईईजी’ तपासणी प्रणाली केईएम रुग्णालयात कार्यरत असून तिच्या मदतीने गेल्या २५ वर्षांत सुमारे ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
वध्यत्व ही लाखो दाम्पत्यासमोरील संवेदनशील समस्या असून सार्वजनिक रुग्णालयात अत्याधुनिक प्रजनन तंत्रज्ञान उपलब्ध होणे ही सामाजिक दृष्टीने महत्त्वाची पायरी मानली जाते.
मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाने शताब्दी वर्षानिमित्त एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे. विविध सामान्य आजारांवर आधारित ६७ रुग्णशिक्षण लघुपटांची निर्मिती कारण्यात आली आहे.
KEM Hospital: देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेला तरी अद्याप इंग्रजांच्या पाऊलखुणा पुसल्या गेल्या नाहीत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
रुग्णांच्या अडचणी सोडवून त्यांना सुविधा देण्याकरिता केईएममध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात दक्षता समिती स्थापन करण्यात येणार असून यात नागरिकांचा ही समावेश करण्यात येणार आहे.
के. इ. एम रुग्णालयाचा कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पाहणी दौऱ्यादरम्यान रुगालयात केवळ नोंद करण्यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन ते तीन तास तात्कळत उभे राहावे लागत असल्याचे निदर्शनाला आले.