मराठा आरक्षण दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लान? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. दरम्यान जरांगे पाटील यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांचं आंदोलन दडपण्यासाठी सरकार स्वत:चं आंदोलन उभे करणार आहे. सरकारचे दोन मंत्री या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची चर्चा झाल्याची माहिती एका मंत्र्याने दिली आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
Maharastra Kesari : ‘खुलासा करा अन्यथा गुन्हा दाखल करणार’; रोहित पवारांना 7 दिवसांचा अल्टिमेटम
महायुतीचं सरकार आणखी एक मराठा आंदोलन उभं करणार आहे. त्या आंदोलनात दोन मंत्री असणार आहेत. १२ ते १३ दिवस आमरण उपोषण करणार असल्याची माहिती आहे. त्यातील एका मंत्र्यांनी आपल्याला ही माहिती दिली. १४ दिवसानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. सरकारमधील मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस आरक्षणाचा मार्ग काढतील. हैद्राबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट लागू करतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, तिन्ही गॅझेट मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस लागू करतील अशी मला आशा आहे. शिंदे समितीकडे सात महिन्यांपासून गॅजेटचा विषय आहे. त्यामुळे त्याबाबत अभ्यास झाला आहे. १५ दिवसात सगळा अभ्यास होतो, असं जरांगे यांनी म्हटलं.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली होती. आता प्रत्येक गावात एका सेवकाची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती त्यांनी हिंगोलीत येथे दिली. नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी गावात एक मुलगा द्यावा लागेल असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आपण एकत्र आलो तर राहिलेले आरक्षण पण मिळेल. नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात एक सेवक द्यावा लागणार आहे. त्याला संपूर्ण गाव अडचणी सांगेल. त्यासाठी एक महिना आपण ते काम करत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.