'उद्धव ठाकरे शिंदेंना मुख्यमंत्री करणार होते, पण शरद पवारांनी...'; संजय राऊतांचा आणखी एक खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात संघर्ष सुरू आहे. खरी शिवसेना कोणाची हा जसा विषय चर्चेचा ठरला आहे तसाच महाविकास आघाडीसरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनाचं मुख्यमंत्री का केलं, शिंदेंना का नाही, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, काँग्रेसेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला, असा दावा केला आहे. शिदेंच्या या टीकेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे शिंदेंनाच मुख्यमंत्री करणार होते. भाजपने अडीच-अडीच वर्षाचा शब्द मानला नाही. तर पवारांनी शिंदे ज्युनिअर असून आमचे लोकं त्यांच्या हाताखाली करणार नाहीत असं म्हटलं होता. असा दावा राऊत यांनी केला आहे.
किल्ल्यावर एकही अतिक्रमण राहणार नाही; शिवजयंतीला मुख्यमंत्री फडणवीसांचा शिवनेरीवरुन शब्द
कामाख्य मंदिरामध्ये जाऊन चिंतन करावं
संजय राऊत पुढे म्हणाले की, ज्यांच्या दावणीला चोरलेला धनुष्यबाण बांधलेला आहे तो योग्य आहे का? रोज उठून दिल्लीत उठाबशा काढतात ते बाळासाहेब ठाकरेंना मान्य आहे का? एकनाथ शिंदेंना आत्मचिंतनाची गरज आहे, त्यांना जर आत्मचिंतनाला कामाख्य मंदिरामध्ये किंवा अन्य कुठे जावं आणि आत्मचिंतन करावं. मूळ शिवसेनेबाबत आपण जी विधाने करत आहोत, त्यात किती सत्य आहे? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी बांधली नाही. ज्यांच्यासोबत आज ते बसलेत त्यांनी शब्द पाळला नाही. त्या निर्णयामध्ये एकनाथ शिंदे देखील सामील होते, तो सर्वांचा निर्णय होता. त्यांनी कधीही विरोध केला नाही त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळतंय याच्यावरच होतं. शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यावेळेला मविआच्या नेत्यांनी सांगितलं की शिंदे ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा विचार होऊ शकला नाही. मविआ तयार करून सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदेंची होती, असं राऊतांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे विधीमंडळ पक्षाचे नेते झाले होते. पण महाविकास आघाडीत अजित पवार आणि ज्यांनी त्यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन सत्कार करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच सांगितलं की एकनाथ शिंदे ज्युनिअर आहेत. आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या हाताखाली काम करू शकणार नाहीत. तसं नसतं तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची विधी मंडळ पक्षाचा नेता होऊच दिलं नसतं. जर भाजपने ५०-५० टक्केचा शब्द पाळला असता तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते. असा दावाही त्यांनी केला आहे.