Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का ; माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समितिचे सभापति, गटनेते डेंजर झोन मध्ये

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये आजी-माजी दिग्गजांना फटका बसला आहे. माजी महापौर योगेश बहल, उपमहापौर केशव घोळवे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे यांची संधी गेली आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 29, 2022 | 04:20 PM
आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का ; माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समितिचे सभापति, गटनेते डेंजर झोन मध्ये
Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये आजी-माजी दिग्गजांना फटका बसला आहे. माजी महापौर योगेश बहल, उपमहापौर केशव घोळवे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे यांची संधी गेली आहे. तर, अनेकांना पुन्हा सभागृहात येण्याचा मार्ग आरक्षणातून खुला झाला आहे. आरक्षण सोडत निघताच इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

आगामी निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढण्यात आली. आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत काढलेल्या सोडतीला अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, उपायुक्त विठ्ठल जोशी, सचिन ढोले उपस्थित होते. नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी/ ओबीसीं) करिता ३७ आणि सर्वसाधारण महिलांच्या ३८ जागांसाठी सोडत काढण्यात आली. ओबीसींच्या २४ जागा थेटपणे नेमून दिल्या. १३ जागांसाठी सोडत काढली. त्यातील महिलांसाठीच्या ७ जागा थेटपणे दिल्या तर १२ जागांसाठी सोडत काढली. सर्वसाधारण महिलांसाठी ३१ जागा थेटपणे दिल्या. ७ जागांसाठी सोडत काढली.

या आरक्षण सोडतीमुळे मावळत्या महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नितीन काळजे, राहुल जाधव, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, विलास मडिगेरी, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर आदींना पुन्हा सभागृहात येण्याची संधी मिळाली आहे. तर, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, राहुल भोसले, भाजप नगरसेवक शैलेश मोरे, शितल शिंदे, शशिकांत कदम, भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, नम्रता लोंढे यांची संधी गेली आहे. आरक्षण सोडतीमुळे योगेश बाबर, अमित बाबर, जगदिश शेट्टी, उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी यांचीही संधी हुकली आहे.

अनेकांवर दुसरे प्रभाग शोधन्याची वेळ

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांना हक्कांचा मतदार असलेला प्रभाग सोडून दुस-या प्रभागातून लढावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे नाना काटे आणि भाजपचे बापू काटे यांना प्रभाग बदलावा लागेल किंवा आमने-सामने लढावे लागेल. सर्वसाधारण एकच जागा असल्याने प्रशांत शितोळे-अतुल शितोळे यांना आमने-सामने लढावे लागणार आहे. काही नगरसेवकांवर प्रभाग बदलण्याची वेळ येणार आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांना आमने-सामने लढावे लागणार आहे. सध्या एकाच पक्षात असलेल्या नगरसेवकांचा आमने-सामने होईल अशी परिस्थिती आहे. आरक्षण सोडतीत अनेक विद्यमान नगरसेवकांना धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी महिलांसाठी आरक्षण पडले आहे. हक्काचा मतदार असलेल्या प्रभागात आरक्षण पडल्याने अडचण झाली. बाजूच्या प्रभागात लढण्याचे धाडस करणे कठिण आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांच्यासह अनेक नगरसवेकांना सौभाग्यवती किंवा मातोश्रीला निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.

Web Title: Many veterans shocked in reservation draw nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2022 | 04:20 PM

Topics:  

  • Election
  • Pimpari
  • PimpriChinchwad
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.