Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation :गळ्यात भगवा रुमाल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोरी; मराठा आंदोलकांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव ?

मराठा समाजाच्या मागणीकडे सरकारे लक्ष द्यावं या उद्देशाने आक्रमक झालेला मराठा आंदोलक आज मुंबईच्या तीव्र आंदोलन छेडत आहे. याच आंदोलनाचा गैरफायदा घेत शहरात काही समाजकंटकांनी आंदोलकांची प्रतिमामलीन करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 01, 2025 | 02:40 PM
Maratha Reservation :गळ्यात भगवा रुमाल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोरी; मराठा आंदोलकांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव ?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन छेडलं आहे. मराठ्य़ांना आरक्षण मिळणार का याबाबत अद्यापतरी स्पष्ट भूमिका सरकारच्या वतीने घेण्यात आलेली नाही. मराठा समाजाच्या मागणीकडे सरकारे लक्ष द्यावं या उद्देशाने आक्रमक झालेला मराठा आंदोलक आज मुंबईच्या प्रत्येक गल्लीत तीव्र आंदोलन छेडत आहे. याच आंदोलनाचा गैरफायदा घेत शहरात काही समाजकंटकांनी आंदोलकांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारे मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात पांढरे कपडे आणि गळ्यात भगवा रुमाल असा एकंदरीतच त्यांचा पेहराव आहे. याचाच फायदा घेत शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याच देखील समोर आलं आहे. आंदोलनात सामील झालेल्या काही तरुणांनी फोर्ट परिसरात चोरी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आंदोलनातील काही तरुणांनी कपड्यांच्या दुकानात चोरी केल्याचं उघड झालं आहे.

पोलीसांनी प्राथमिक तपासानुसार, आंदोलनात सामील झालेल्या काही तरुणांनी कपड्याच्या दुकानाचं कुलुप तोडून घुसखोरी केली. त्यानंतर काही कपडे आणि 6 हजार रुपयांची रक्कम चोरली. ही घटना घडल्याचं दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. याबाबत दुकानदाराने पोलीसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीसांनी अज्ञात टवाळखोर तरुणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

Maratha Reservation : आम्ही शेअर होल्डर्स आहोत आम्हाला अधिकार…. ; मराठा आंदोलकांची शेअर मार्केटमध्ये घुसखोरी

एकीकडे सरकारने आरक्षण मिळवून द्यावं म्हणून आक्रमक झालेला मराठा समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. या आंदोलनाला समाजातील इतर घटक देखील पाठिंबा देत आहे. तर दुसरीकडे याच मराठा आंदोलकांची प्रतीमा मलीन करण्याचा त्यांना बदनाम करण्याचा प्रकार होत असल्याचं दिसून येत आहे. .या समाजकंटकांवर वेळीच योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे.

दरम्यान मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आजुपासून फक्त उपोषणच नाही तर पाण्याचा एक थेंबही घेणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आता हे आंदोलन आणखीनच चिघळत जात असल्याचं दिसून येत आहे. या सगळ्या आंदोलनाचा फटका काही प्रमाणात चाकरमान्यांना देखील भोगावा लागत असल्याने मुंबई मनपा हद्दीतील कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

Manoj Jarange News: फडणवीस, शिंदे, पवारांमध्ये वर्षा बंगल्यावर खलबतं, मराठा आरक्षणावर तोडगा निघणार

Web Title: Maratha reservation saffron scarf around the neck theft in the city in the backdrop of the agitation a plot to tarnish the image of maratha protesters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • Maratha Reservation
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Crime: भिवंडीत अमानुष कृत्य! 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या
1

Mumbai Crime: भिवंडीत अमानुष कृत्य! 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या

Mumbai Climate Week 2026: मोठी घोषणा! भारत फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘मुंबई क्लायमेट वीक’चे यजमानपद भूषवणार
2

Mumbai Climate Week 2026: मोठी घोषणा! भारत फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘मुंबई क्लायमेट वीक’चे यजमानपद भूषवणार

Devendra Fadnavis : फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन, मुख्यमंत्र्यांची घोषणा
3

Devendra Fadnavis : फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Mumbai: मुंबईत ६ अफगाण नागरिक गजाआड! पोलिसांनी केली अटक; बनावट कागदपत्रे जप्त
4

Mumbai: मुंबईत ६ अफगाण नागरिक गजाआड! पोलिसांनी केली अटक; बनावट कागदपत्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.