मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस रौद्र रुप धारण करत असल्याचं दिसून येत आहे. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीने पेटून उठलेल्या मराठ्यांनी मुंबईत येऊन तीव्र आंदोलन छेडलं आहे. मुंबई आणि नवी मुंबई येथे या आंदोलकांनी ठिकठकाणी रास्ता रोको देखील केला होता. अशातच आता नवी माहिती समोर आली आहे. आंदोलकांनी आता अर्थव्यवस्थेची इमारत म्हणजे शेअर मार्केटच्या इमारतीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. गेले काही दिवस आक्रमक झालेल्या मराठा समाजाने तीव्रपणे आंदोलन छेडलं असून आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे.
आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत काही आंदोलकांची घुसण्याचा प्रयत्न केल्याचं देखील समोर आलं आहे. याबाबतचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंदोलक जेव्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र आक्रमक आंदोलकांनी घोषणाबाजी सुरु केली. सुरक्षारक्षकांनी अडविल्यानंतर आंदोलकांनी एक मराठा लाख मराठी अशी घोषणाबाजी करण्यास देखीस सुरुवात केली.
आम्ही शेअर होल्डर आहोत त्यामुळे आम्हाला पूर्ण अधिकार आहे इमारतीमध्ये प्रवेश करण्याचा असं या आंदोलकांचं म्हणणं होतं. आम्ही देखील यात पैसे गुंतवले आहेत त्यामुळे आम्ही इमारत आतून पाहणार इथलं कामकाज पाहणं आमचा अधिकार आहे अशी भावना या आंदोलकांनी व्यक्त केली. मात्र सध्याच्या तापलेवल्या वातावरणाचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे य़ा सगळ्याचं प्रसंगावधान राखत आंदोलकांच्या घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. मात्र या सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून काही जण इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आहे. आता घडली तशी घटना पुन्हा घडूच शकते त्यामुळे असंतोष पसरवणाऱ्या या आंदोलकांवर गुन्हा दाखल केला जाईल का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.