Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation News: ‘…तोपर्यंत मनोज जरांगेंसह सर्वांना गुंडाळण्यात आलं होतं….; ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदेंचा गौप्यस्फोट

मराठा समाजातील मुलामुलींसाठी पदवीपर्यंत शिक्षण मोफत राहील आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन आर्थिक तरतूद जाहीर करणारा स्वतंत्र GR एका आठवड्यात काढतील

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 03, 2025 | 04:42 PM
Sensational revelation by senior lawyer Asim Sarode regarding Maratha reservation

Sensational revelation by senior lawyer Asim Sarode regarding Maratha reservation

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटसह  इतर मागण्या मान्य
  • मागण्या मान्य पण अनेक महत्त्वाच्या मागण्या पुढे ढकलल्या
  • कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवणे सोपी गोष्ट असणार नाही.

Asim Sarode On Maratha Resrvation News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर मंगळवारी यश मिळाले. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे सांगत गावातील, नात्यातील आणि कुळातील लोकांची चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) सरकार लवकरच काढणार असून त्याचा मसुदा अभ्यासकांनाही मान्य आहे.उपोषण सोडताना जरांगे यांनी “जिंकलो रे राजाहो” अशी घोषणा केली. मात्र, हे आंदोलन खरोखर विजय ठरले की तहात हरले, असा प्रश्न कायदे तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची आणि उपोषण सोडण्यामागील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. सरकारने काही मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असली तरी अनेक महत्त्वाच्या मागण्या पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिणामी, आंदोलनातून काय साध्य झाले आणि काय प्रलंबित राहिले, हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर यासंदर्भात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

BCCI कडून Virat Kohli ला झुकते माप? लंडनमध्ये पास केली फिटनेस टेस्ट; भारतीय क्रिकेट जगतात गोंधळ

वाचा काय म्हटलं आहे असीम सरोदेंनी

“मनोजदादा जरांगे यांना अपेक्षित असलेले झालेले नाहीये असे स्पष्ट दिसतेय. मनोजदादाच्या जवळच्या लोकांचे फोन मला अगदीच शेवटच्या क्षणी आले. सरकारी प्रतिनिधींना काय सांगावे याबद्दल काय वाटते असे विचारण्यात आले. मी त्यांना टाईप करून msg पाठवले पण तोपर्यंत सगळ्यांना गुंडाळण्यात आले होते. आरक्षण हा विकास, उन्नतीचा एकमेव मार्ग आहे असा सामान्य लोकांचा भ्रम करून देणारे राजकारण चुकीचे आहे हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागेल.

मी मनोजदादा जरांगे यांच्यापर्यंत हे पोहोचविण्याचा प्रयत्न केला कि, हैद्राबाद गॅझेटिअर स्विकार करतांना सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासाठी असा आदेश पारीत करावा की ज्या मराठा समाजातील व्यक्ती त्यांच्या कुटुंबाच्या ‘कुणबी-मराठा’ नोंदी गॅझेट नुसार व्हेरिफिकेशन साठी अर्ज करतील त्या अर्जांवर सात दिवसात निर्णय घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल. त्याबाबत कार्यवाहीची पद्धती वेगळे सरकारी परिपत्रक काढून जाहीर करावी. कार्यवाहीची पद्धती कशी असेल याचे परिपत्रक सुद्धा आजच काढायला सांगावे असे मी सुचविले होते. पण जातपडताळणी कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून 90 दिवसात करणार असे सरकारने नक्की केले. म्हणजेच कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवणे सोपी गोष्ट असणार नाही.

मराठा समाजातील मुलामुलींसाठी पदवीपर्यंत शिक्षण मोफत राहील आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन आर्थिक तरतूद जाहीर करणारा स्वतंत्र GR एका आठवड्यात काढतील. ( निवडणुकांच्या वेळी अमाप पैसा उधळणाऱ्या व लाडकी बहीण अशी फसवी योजना निवडणूक जिंकण्यासाठी सुरु करून जनतेचा करोडो रुपयांचा निधी त्यासाठी वापरणाऱ्या सरकारकडून अशी शिक्षणावर खर्च करण्याची मागणी मान्य करून घ्यायला हवी होती).

मराठा समाजातील शिक्षित मुलामुलींना त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार नोकऱ्या देण्यासंदर्भात स्पष्ट तरतूद असलेला GR काढावा. कोणकोणत्या विभागात आणि कोणकोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध असतील त्याची माहिती असावी.त्यात मराठा समजतील युवकांना नोकऱ्या देण्यासंदर्भातील प्रक्रिया नमूद करावी. नियत साफ आणि स्वच्छ ठेऊन GR काढलेले आहेत का?, त्यांची अंमलबजावणी लोकांच्या कल्याणासाठी बिना अडथळा शासनातर्फे करण्यात येईल का? या प्रश्नांसह आंदोलन संपले. GR संपूर्ण वाचून ते लवकरच कळेल.

Beed Railway : आता बीड येणार रेल्वेच्या नकाशावर, कधी सुरु होणार ? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

सरळ भाषा न वापरता विविध अर्थ निघतील अशी भाषा वापरून मुद्दाम क्लिष्टता किंवा मोघमपणा ठेवला का हे सुद्धा कळेल. मला इतकेच वाटते की आंदोलनकर्त्यांची फसवणूक करणारी कृती सरकारने केली असेल तर ते अत्यंत चुकीचे ठरेल. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत सुद्धा स्पष्टता घ्यायला पाहिजे होती की मराठा समाजातील ज्या कुटुंबांची नोंद ‘कुणबी-मराठा’ अशी नसेल त्या मराठा समाजातील कुटुंबांबाबत आरक्षणाची मर्यादा 50 टक्के पेक्षा जास्त वाढवून त्यांना आरक्षणाचे फायदे मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या मुख्य सचिवांना दोन दिवसात मागणीपत्र लिहावे आणि त्याची कॉपी मनोजदादा जरांगे पाटील यांना राज्य सरकारने द्यावी. कारण GR च्या माध्यमातून काहीतरी अर्धवट देण्याची, अपूर्ण काहीतरी करून मागण्या मान्य केल्याची नाटकी नीती वापरली गेली कि काय अशी प्राथमिक शंका घ्यायला जागा आहे.

हैद्राबाद गॅझेटिअर राज्य सरकारने खरे तर आधीच स्विकारले होते आता केवळ कार्यपद्धती काय असेल याचे आदेश काढले आहेत. ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण ही मागणी मान्य होण्यासारखी नव्हतीच त्यामुळे त्यावर काहीही निर्णय झालेला नाही. ओबीसी प्रवर्गातील आत्ता असलेल्या व्यक्तींना बाधा न पोहोचता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळविण्यात कायदेशीर अडचणी दूर होतील का यावर काहीही चर्चा नाही किंवा तोडगा नाही असे चित्र स्पष्ट झालेले आहे.
शेवटी पुन्हा सांगतो की आरक्षणाने सगळे प्रश्न संपतात असा सार्वत्रिक गैरसमज पसरविण्यात आलेला आहे. समजा संपूर्ण, सरसकट आरक्षण दिले तरीही….नोकऱ्या कुठे आहेत?, रोजगार कुठे आहेत?. दर्जेदार, मोफत शिक्षण ही रचनात्मक मागणी नेहमीच लक्षात ठेवावी लागेल.”

 

 

Web Title: Maratha resrvation news sensational revelation by senior lawyer asim sarode regarding maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maratha Reservation: “जीआरबाबत ज्यांना शंका त्यांनी…”; जरांगे पाटलांच्या भेटीदरम्यान काय म्हणाले विखे पाटील?
1

Maratha Reservation: “जीआरबाबत ज्यांना शंका त्यांनी…”; जरांगे पाटलांच्या भेटीदरम्यान काय म्हणाले विखे पाटील?

Jarange Patil On Fadnavis: ‘फडणवीसांना ‘वर्षा’वर धुवून…’; जरांगे पाटलांनी सोडली पातळी, नव्या वादाला फुटणार तोंड
2

Jarange Patil On Fadnavis: ‘फडणवीसांना ‘वर्षा’वर धुवून…’; जरांगे पाटलांनी सोडली पातळी, नव्या वादाला फुटणार तोंड

मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसी समाज आक्रमक; ‘या’ तारखेला बारामतीत एल्गार मेळावा
3

मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसी समाज आक्रमक; ‘या’ तारखेला बारामतीत एल्गार मेळावा

Kalyan : कल्याणमध्ये मराठा आरक्षण जीआर विरोधात ओबीसी समाजाचे साखळी उपोषण
4

Kalyan : कल्याणमध्ये मराठा आरक्षण जीआर विरोधात ओबीसी समाजाचे साखळी उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.