विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Virat Kohli passes fitness test in England : भारताचा दिग्गज अनुभवी खेळाडू विराट कोहलीकडून नुकतीच त्याची फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करण्यात आली आहे, परंतु कोहलीची फिटनेस टेस्टवरुण आता भारतीय क्रिकेटमध्ये गोंधळ उडाला आहे. कारण त्याने इतर खेळाडूंप्रमाणे बेंगळुरूमध्ये नाही तर लंडनमध्ये फिटनेस टेस्ट दिली आहे. कोहलीने फिटनेस टेस्ट पास केली असली तरी, आता लंडनमध्ये फिटनेस टेस्ट देण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. बहुतेक भारतीय खेळाडूंनी फिटनेस टेस्टसाठी बेंगळुरू गाठले आणि तेथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आपली फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली. तर, कोहली मात्र लंडनमध्ये ही टेस्ट पास केली. कोहली सध्या त्याच्या कुटुंबासह लंडनला राहत आहे.
हेही वाचा : AFG vs PAK : अफगाणिस्तानचा पाकिस्तानला धोबीपछाड! आशिया कपपूर्वी ‘पठाण’ आर्मीने फोडली डरकाळी..
एका वृत्तानुसार, कोहलीकडून युनायटेड किंगडममध्ये फिटनेस टेस्ट देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळकडून विशेष परवानगी घेण्यात आली होती, तर संघातील बहुतेक इतर खेळाडू त्यांच्या फिटनेस टेस्टसाठी बेंगळुरू येथे गेले होते. विराट कोहलीकडून चाचणी उत्तीर्ण करण्यात आली असली तरी, लंडनमध्ये अनिवार्य फिटनेस टेस्टसाठी विशेष सूट देण्याबाबत आता वाद सुरू झाला आहे.
विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने फिटनेस टेस्ट भारताबाहेर दिली आहे. इतर कोणत्याही खेळाडुकडून अशाप्रकारची सूट मागण्यात आलेली नव्हती. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला विराटच्या टेस्ट प्रकरणाबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की कोहलीने बीसीसीआयला अशी सूट मागितली असणार आणि याबाबत परवानगी मागितली असणार. तथापि, अहवालात असे देखील म्हटले आहे की, अशीच सूट मागणाऱ्या इतर कोणत्याही खेळाडूला अशी सूट दिली जाणार की नाही, याबाबत माहीत नाही.
एका वृत्ताकडून दावा करण्यात आला आहे की, ज्या खेळाडूंनी फिटनेस टेस्ट दिली त्यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, जितेश शर्मा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, आवेश खान, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, रवी बिश्नोई, संजू सॅमसन, शिवम दुबे, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, मुकेश कुमार, हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, सरफराज खान, तिलक वर्मा, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, , शार्दुल ठाकूर, ध्रुव जुरेल वॉशिंग्टन सुंदर आणि यशस्वी जयस्वाल या खेळाडूंचा समावेश याहे.
हेही वाचा : ICC ODI Team Rankings : एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत अव्वल स्थानी, तर इंग्लंडवर ओढवली मोठी नामुष्की..
अहवालानुसार, या महिन्यामध्ये ज्या खेळाडूंची चाचणी घेण्यात येईल त्यामध्ये ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा स्टार खेळाडूंचा समावेश आहे. फिटनेस टेस्टचा दुसरा टप्पा देखील घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये केएल राहुल, आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांसारख्या खेळाडूंची चाचणी घेण्यात येणार आहे.