Marathi Breaking news updates: गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजधानी दिल्लीतही मुसळधार पाऊस होत आहे. दिल्लीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या महापुराचा फटका रेल्वेसेवेलाही बसला आहे. 50 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
05 Sep 2025 07:08 PM (IST)
काही दिवसांपूर्वी भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकीने त्यांची नवीन एसयूव्ही SUV Victoris लाँच केली आहे. कंपनीने या कारचा लूक अगदी फ्यूचरिस्टिक ठेवला आहे. ही नवीन एसयूव्ही लाँच झाल्याने Grand Vitara ला थेट आव्हान मिळणार आहे. अशातच ग्राहकांमध्ये या दोन्ही एसयूव्हींपैकी कोणती कार खरेदी करावी याबाबत गोंधळ होणार हे नक्की.
05 Sep 2025 06:55 PM (IST)
सर्वांना एकाच वेळी आनंदी ठेवता येत नाही. जरांगे समाधानी झाल्यावर भुजबळ संतापले. ज्येष्ठ ओबीसी नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटला मान्यता देणाऱ्या सरकारच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी ओबीसी कोट्यावर परिणाम झाला तर तो सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची बैठक बोलावली आणि त्यांचे मंत्री छगन भुजबळ यांना संयमाने वागण्यास सांगितले. त्यांनी त्यांना आश्वासन दिले की हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार नाही. त्यांनी भुजबळांना सांगितले की जर त्यांना काही आक्षेप असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करा.
05 Sep 2025 06:48 PM (IST)
कराड: Balasaheb Thorat: सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणे, ही त्यांची जबाबदारी आहे. आरक्षणाचा जीआर पाहिल्यानंतर संभ्रम व काळजी निर्माण होत आहे. न्याय द्यायचा असेल तर ओबीसींच्या कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्रपणे न्याय द्यावा, “गॅझेटच्या आधारे आरक्षण देता येत नाही. मात्र मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरक्षणाची गरज आहे,“ असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
05 Sep 2025 06:29 PM (IST)
Dronad Trump Big Statment: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सत्ताकाळात भारत आणि चीनसह जगातील अनेक देशांवर शुल्क (टॅरिफ) लादून आपली दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला. पण आता हा डाव अमेरिकेवरच उलटताना दिसत आहे. भारतावर २५% शुल्क वाढवून ५०% करण्याची धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच एक विधान केले आहे, ज्यामुळे त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाल्याचे दिसत आहे.
05 Sep 2025 06:18 PM (IST)
मुंबई: देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस असून हा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या अनुषंगाने राज्यातल्या सुमारे ७५ हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. येत्या १७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा सुरु राहणार असून १ ऑक्टोबरला राज्यातील ४१९ आयटीआयमध्ये अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.
05 Sep 2025 06:06 PM (IST)
भारतीय ऑटोमोबाईलमध्ये वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळेच तर अनेक विदेशी ऑटो कंपन्या भारतात धमाकेदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे सिट्रोएन. या फ्रेंच ऑटो कंपनीने मार्केटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने भारतात त्यांची नवीन कार लाँच केली आहे.
05 Sep 2025 06:00 PM (IST)
फ्रेंच कार उत्पादक कंपनी सिट्रोएनने भारतात त्यांची नवीन Citroen Basalt X लाँच केली आहे. ही कार मिड-स्पेक आणि टॉप-स्पेक ट्रिम्सवर आधारित आहे. जरी या कारचे एक्सटिरिअर डिझाइन नुकत्याच लाँच झालेल्या मॉडेलसारखीच असली तरी, याचे इंटिरिअर नवीन थीम आणि अनेक उत्तम फीचर्ससह सुसज्ज आहे.
05 Sep 2025 05:50 PM (IST)
देशात गेल्या काही वर्षांपासून हिंदू-मुस्लिम वाद उफाळला आहे. अनेकदा यावरून हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. पुढील काही दशकात भारतातही मुस्लिमांची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे. अशा चर्चा सुरू असतानाच एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. २५ वर्षांनंतर, जगभरातील हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकसंख्येत मोठा फरक दिसून येईल. सध्या, ख्रिश्चन लोकांव्यतिरिक्त, मुस्लिमांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे आणि हिंदू चौथ्या क्रमांकावर आहेत.
05 Sep 2025 05:29 PM (IST)
ईद-ए-मिलादच्या दिवशी श्रीनगरमधील हजरतबल दर्ग्यात गोंधळ उसळला. नुकत्याच झालेल्या नूतनीकरणानंतर बसवलेल्या संगमरवरावरून जमाव आक्रमक झाला. स्थानिकांनी मशिदीत पुतळा बसवल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आणि गुसाई जमावाने अशोक स्तंभ तोडला. त्यांचे म्हणणे आहे की, मशिदीत कोणतीही मूर्ती बसवली जाऊ शकत नाही. दोन दिवसांपूर्वीच वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. दर्शन अंद्राबी यांच्या हस्ते या नूतनीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले होते.
05 Sep 2025 05:17 PM (IST)
यामाहाने त्यांची लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक Yamaha R15 अपडेट केली आहे. कंपनीने ही बाईक आकर्षक नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट केली आहे. या अपडेटमुळे भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एंट्री-लेव्हल सुपरस्पोर्ट बाईकची विक्री आणखी वाढेल. R15 सिरीजमध्ये R15M, R15 व्हर्जन 4 आणि R15S समाविष्ट आहेत. या सर्व बाईक नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट केले गेले आहेत. ही बाईक मेटॅलिक ग्रे रंगात अपडेट केले गेले आहे, जे त्याच्या स्पोर्टी स्टाइलिंगसह प्रीमियम लूक देते. R15 आवृत्ती 4 मध्ये दोन प्रमुख अपडेट्स आहेत, जे बोल्ड मेटॅलिक ब्लॅकसह रिफ्रेश केलेले रेसिंग ब्लू रंग आणि नवीन ग्राफिक्स आहेत.
05 Sep 2025 05:07 PM (IST)
शाळेची बस मुलांना सुखरुप नेते असा पालकांचा कायम विश्वास असतो मात्र हाच विश्वास धुळीत जमा झाल्याची घटना भाईंदर परिसरात घडलेली आहे. बेबजाबदारपणाचा कळस घडल्याची धक्कादायक माहिती समोरआली आहे. मिरा-भाईंदरमध्ये निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारूच्या नशेत शाळेची बस चालवणाऱ्या चालकाला काशीमीरा वाहतूक विभागाने अटक केली आहे. या बसमध्ये पाच विद्यार्थी प्रवास करत होते. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बसने भाईंदर (पूर्व) येथील गोल्डन नेस्ट सर्कलजवळील डिव्हायडरवर जोरदार धडक दिली.
05 Sep 2025 05:05 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर 2025 रोजी मिझोराम दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच दौऱ्यात मिझोराममध्ये नवीन बैराबी-सैरंग रेल्वेचे उद्घाटन करणार आहेत. मिझोरामहून ते मणिपूरला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या वृत्तानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. ” जर पंतप्रधान मणिपूरला जात असतील तर ती मोठी गोष्ट आहे का, ते पंतप्रधान आहेत. हिंसाचारानंतर ते दोन-तीन वर्षांनी जात आहेत. जेव्हा मणिपूर जळत होते, हिंसाचार भडकत होता, तेव्हा त्यांना तिथे जाण्याची हिंमत झाली नाही. आता मोदीजींची पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली आहे, म्हणून ते पर्यटनासाठी तिथे जात आहेत.” अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.
05 Sep 2025 05:00 PM (IST)
अमरावतीची अंबा देवी ही विदर्भाची कुलस्वामीनी आहे तिच्या पावन भूमी मध्ये आयोजित कला प्रदर्शनाने सध्या सर्व कलारसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्री गणेशाला अगणित रूपांमध्ये साकारणारा रंगकर्मी म्हणून कलावंताकडे बघितले जातेआणि ते वास्तवपण आहे. सौंदर्याच्या वेलीवर सत्य साकारणारा रंगकर्मी म्हणून कलावंताकडे बघीतले जाते शिवाची फुले रंगवावीत सामाजिक, सांस्कृतीक मूल्यांची जोपासणारा कलावंत, सार्वजनिक मांगल्य सदैव जपणारा कलावंत हा नेहमी आपल्या कलाकृती मधून समाजातील सत्य प्रामाणिकपणे मांडण्याचा सदैव प्रयत्न करीत असतो.
05 Sep 2025 04:55 PM (IST)
दहिसरच्या मनोर शहरासह दहिसर तर्फे मनोर, टेन, टाकवहाल, मस्ताना का, कटाळे आदी परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद उत्साहात व शांततेत साजरी केली. मिरवणुकीत देशहित, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला.मिरवणुकीसाठी मार्गाची स्वच्छता राखण्यात आली तर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले. उत्सवानंतर मुस्लिम बांधवांनी रक्तदान शिबिर आयोजित करून समाजोपयोगी उपक्रमाला चालना दिली.
05 Sep 2025 04:50 PM (IST)
कोल्हापूर परिक्षेत्रात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे..अनंत चतुर्थी दिवशी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे ग्रामीण पाचही विभागात जवळपास १४ हजार सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे.. विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी परिक्षेत्रात ७०० वरिष्ठ अधिकारी आणि 9 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक तैनात या शिवाय एस आर पी एफ आणि होमगार्डच्या तब्बल ५० तुकड्या परिक्षेत्रात बंदोबस्तासाठी असणार आहेत.. इतकचं नाही तर विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातूनही नजर असेल अशी माहिती देखील विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी दिली आहे... गणेश आगमन मिरवणूक आणि गणेशोत्सव काळात आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या परिक्षेत्रातील 800 हून अधिक मंडळांवर कारवाई केल्याची माहिती सुधा यावेळेस विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे..
05 Sep 2025 04:45 PM (IST)
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील वडनेरगंगाई येथील शेतकऱ्यांना रस्त्याच्या समस्येमुळे अक्षरशः जीव मुठीत धरून शेतमालाची वाहतूक करावी लागत आहे. चिखलात गेलेल्या बाग रस्त्यामुळे मशागत करणेही कठीण झालं असून, ट्रॅक्टर ट्रॉलीपासून ते बैलगाड्यांचे अपघात होत आहेत. लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक एका महिन्या मध्ये निघणार आहे या सोयाबीन पिकाला घरी घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांन कडे लक्ष देऊन जर लवकर रस्त्याचं बांधकाम करून द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
05 Sep 2025 04:40 PM (IST)
वर्ध्यातील औंजळ बहुउद्देशीय संस्थेने यंदा गारीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करून आर्वी नाका परिसरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकाचे वास्तवदर्शी चित्रण साकारले आहे. मागील ११ वर्षांपासून ही संस्था विसर्जन टाळून गारीच्या मूर्तीची वर्षभर पूजा करते, ही त्यांची खासियत आहे. भव्य सेटअप, लाइटिंग, ढोल-ताशांचा गजर आणि चिमुकल्यांची रंगतदार सजावट यामुळे मंडपात खऱ्या आर्वी नाक्याचा अनुभव येतो. यंदाच्या थीममधून वाहतूक शिस्तीचा संदेश देत नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
05 Sep 2025 04:35 PM (IST)
कल्याण मध्ये मुख्य बाजारपेठेत 22 तासांपासून वीज पुरवठा खंडित आहे. वारंवार तक्रार करून देखील महावितरण विभागाकडून दुर्लक्ष केला जात आहे. याआधी ही कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोहम्मद अली चौक पर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना याच्या याच्या फटका बसत आहे. गेल्या वावीस तासांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने कल्याण मधील व्यापाऱ्यांनी महावितरणच्या भोंगलकाराबाराच्या नाराजी व्यक्त करीत निषेध व्यक्त केला आहे
05 Sep 2025 04:30 PM (IST)
गणेशोत्सवानिमित अहिल्यानगर शहरात विविध मंडळांनी देखावे तयार करण्यात आले आहे. या देखाव्यांना नगरकरांनी चांगलीच गर्दी केल्याचे पहायला मिळाले. माळीवाडा परिसर हा अनेक वर्षांपासून उत्कृष्ट देखाव्यांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. नगर शहराचे १२ ही मानाचे मंडळे याच परिसरातील असल्याने माळीवाडा, दिल्लीगेट, नालेगाव या भागात नेहमीच उत्कृष्ट देखावे सादर केले जातात. यावर्षी देखील माळीवाडा भागातील मानाचे असलेले माळीवाडा तरूण मंडळ, श्री कपिलेश्वर मित्र मंडळ, शिववरद मित्र मंडळ यांसह अनेक मंडळांनी सुंदर देखावे सादर केले आहेत. यावर्षी माळीवाडा तरुण मंडळाच्या महिला दहीहंडीला तर देखावे पाहण्यासाठी आलेल्या महिलांची विशेष आकर्षणाचे ठिकाण बनले आहे
05 Sep 2025 04:25 PM (IST)
आचरा-कणकवली मार्गावर श्रावण गावात पट्टेरी वाघाचा रात्रीच्या वेळचा मुक्तसंचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो पट्टेरी वाघ मार्गावरून जात असल्याचे दिसून येत आहे. हा वाघ वयाने लहान असल्याचे त्याच्या आकारमानावरून स्पष्ट होते. श्रावण, रामगड भागात घनदाट जंगल असून येथे वाघ, बिबट्यांचे वास्तव्य आहे. एकंदरीत मानवी वस्ती जवळ पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
05 Sep 2025 04:20 PM (IST)
अल्लाहचे नबी हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती संपूर्ण जगभरात ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे भव्य रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. देवरी शहरातील विविध भागांमधून ही रॅली भ्रमण करत निघाली. यावेळी मुस्लिम बांधवांनी आनंद साजरा केला. तर मुस्लीम बांधवांनी हातात तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.
05 Sep 2025 03:56 PM (IST)
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात लूकआउट सर्क्युलर जारी केला आहे.
05 Sep 2025 03:44 PM (IST)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक नवनवीन आणि मनोरंजक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी इथे अनेक नको नको ते प्रकार, स्टंट्स, जुगाड करू पाहतात पण प्रत्येक वेळेला त्यांचे हे पराक्रम यशस्वी होतातच असं नाही.
05 Sep 2025 03:20 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांना पोटधरून हसवणारा ‘साडे माडे तीन’ चित्रपट अजूनही लक्षात आहे. या चित्रपटाने त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे जो अजूनही या चित्रपटावर भरभरून प्रेम करतो.
05 Sep 2025 03:05 PM (IST)
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण,विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
05 Sep 2025 02:45 PM (IST)
टायगरचा ‘बागी ४’ चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलरने प्रदर्शित होता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. याचदरम्यान आता चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनी टायगर श्रॉफ पुन्हा परतला असल्याचे सांगितले आहे. चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टचे आणि कथेचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.
05 Sep 2025 02:36 PM (IST)
Bangladesh Hindu minority violence : लंडनमध्ये अलीकडेच एक गंभीर घटना समोर आली आहे. वोकिंग (Woking) परिसरातील रहिवाशांनी बांगलादेशातील वाढत्या हिंसाचार, राजकीय दडपशाही आणि धार्मिक अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांविरोधात ब्रिटनच्या संसदेत थेट आवाज उठवला आहे. त्यांनी एक औपचारिक याचिका दाखल करत बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर वांशिक-अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ही याचिका केवळ एका देशातील हिंसाचारावर नव्हे, तर दक्षिण आशियातील लोकशाही, मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्यावर वाढत असलेल्या धोक्याचे प्रतिक म्हणून पाहिली जात आहे.
05 Sep 2025 02:35 PM (IST)
Rohit Pawar on New GST Slabs : केंद्र सरकारकडून GST स्लॅबमध्ये सर्वात मोठी सुधारणा करण्यात आली आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी घेतलेल्या निर्णयात, कराचे सध्याचे चार स्लॅब कमी करून फक्त दोन करण्यात आले आहेत. आता 12% आणि 28% वाले स्लॅब बंद करण्यात आले असून फक्त 5% आणि 18% कर राहणार आहेत. या निर्णयाचे सत्ताधारी भाजप नेत्यांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. तर विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली. आधीपासून चुकीच्या जीएसटी स्लॅबमधून केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांची लूट केली असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
05 Sep 2025 02:35 PM (IST)
Gujarat Floods: देशभरात पावसाचा जोर वाढला आहे. दिल्ली, पंजाब राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राजधानी दिल्लीत यमुना नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. मात्र दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यमुना नदीची पाणी पातळी २०७.४८ वरून २०७.३१ पर्यंत खाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यास यमुनेचे पाणी पातळी झापाट्याने कमी होण्याची शक्यता आहे.
05 Sep 2025 02:34 PM (IST)
पुणे : मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत बेमुदत उपोषणाला बसले होते. सरकारने पाचव्या दिवशी त्यावर एक तोडगा काढला. त्यांच्या हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्यावर सरकारने सहमती दर्शवली. याविषयीचा एक शासन निर्णय घेण्यात आला. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांचे कमी उमेदवार निवडून आले, ते आपल्याला संधी मिळाली पाहिजे म्हणून लक्षच देऊन असतात. मुंबईत झालेल्या मराठा आंदोलनाबाबत विरोधकांनी आपल्याला राजकीय फायदा होईल का याचाही प्रयत्न केला. पण आता उत्तर मिळाल्यानंतर सगळे गपगार झाले आहेत,’’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
05 Sep 2025 02:18 PM (IST)
सलमान खानच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ शी प्रेक्षक जोडले गेले आहेत. हा शो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अशा परिस्थितीत, प्रेमकथा असो किंवा स्पर्धकांच्या मारामारी असो, प्रेक्षक आणि घरातील सदस्य देखील त्यात सामील होतात. सर्व स्पर्धकांबद्दल चाहत्यांचे ठाम मत आहे. बसीरला घरचा नवा कॅप्टन बनवण्यात आले आहे. त्यानंतर आता घरामध्ये वाद सुरु झाले आहेत. कुनिका आणि बसीर यांच्यामध्ये झालेला वाद हा आता अमाल मलिक आणि फरहाना यांच्यामध्ये भांडण झाले आहे.
05 Sep 2025 02:15 PM (IST)
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल २०२५ ची तारीख आली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोनपासून लॅपटॉपपर्यंत अनेक वस्तूंवर मोठी सूट दिली जाईल. सणासुदीचा हंगाम येणार आहे. अशा परिस्थितीत, सेलची मजा द्विगुणीत होते. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की Amazon वर एक मोठा ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेल देखील येणार आहे.
05 Sep 2025 02:09 PM (IST)
NASA Alert For US : जगभरातील हवामान बदल, समुद्राची वाढती पातळी आणि मानवनिर्मित हस्तक्षेप यामुळे संपूर्ण मानवजातीसमोर अभूतपूर्व संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) ने दिलेला ताज्या अभ्यासाचा इशारा जगाला हादरवणारा ठरत आहे. नासाने जाहीर केलेल्या उपग्रह-नकाशानुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या किनारी भागातील अनेक शहरे हळूहळू समुद्रात बुडत चालली आहेत.
05 Sep 2025 01:50 PM (IST)
चाहते कोणताही क्रिकेट विश्वचषक पाहण्यास उत्सुक असतात. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये तिकिटांसाठी गर्दी असते. चाहत्यांना कोणत्याही किंमतीत तिकिटे मिळवायची असतात, परंतु ३० सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या महिला विश्वचषक २०२५ मध्ये तिकिटे फक्त १०० रुपयांना उपलब्ध आहेत. भारतीय क्रिकेट परिषदेने स्वतः ही माहिती दिली आहे. अशा स्वस्त तिकिटे बुक करण्यासाठी वेळ देखील निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही ते कुठे आणि कधी बुक करू शकता ते जाणून घेऊया.
05 Sep 2025 01:40 PM (IST)
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. वसुंधरा राजे आणि मोहन भागवत यांच्यात तब्बल 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाले सांगण्यात आले आहे. दरम्यान, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
05 Sep 2025 01:35 PM (IST)
बगहा १ ब्लॉकचे पाटीलार पंचायत मुखिया यांचे पती आणि जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अभिषेक कुमार मिश्रा हे नितीश कुमार यांच्या जेडीयू सोडून आरजेडीमध्ये सामील झाले आहेत. आरजेडीचे प्रदेश अध्यक्ष मंगणी लाल मंडल यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. आरजेडीचे जिल्हा सरचिटणीस कमलेश दुबे यांनी ही माहिती दिली.
05 Sep 2025 01:25 PM (IST)
शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू आणि जैव-कीटकनाशके आणि खतांवरील जीएसटी दरात कपात केल्याने शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. अलिकडच्या काळात कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या किमतींमध्ये सर्वात वेगाने वाढ झाल्यामुळे शेतीचा खर्च वाढला आहे. कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) ताज्या आकडेवारीनुसार, मे २०२३ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) २.१ टक्क्यांनी वाढला आहे, तर कृषी निविष्ठांचा एकूण निर्देशांक २.८ टक्क्यांनी घसरला आहे. यापूर्वी, ऑक्टोबर २०२२ ते एप्रिल २०२३ दरम्यान, कृषी निविष्ठांचा घाऊक किंमत निर्देशांक ३.४ टक्क्यांनी वाढला होता, तर एकूण निर्देशांक २.६ टक्क्यांनी घसरला होता.
05 Sep 2025 01:24 PM (IST)
अनंत चतुर्दशीनिमित्त ३४ वाहनांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाली आहे. ही धमकी एका व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे मिळाली होती, त्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत. असे सांगण्यात येत आहे की, हा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाइन नंबरवर पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की ३४ वाहनांमध्ये बॉम्ब ठेवले आहेत आणि ४०० किलो आरडीएक्सच्या स्फोटामुळे संपूर्ण मुंबई शहर हादरेल.
05 Sep 2025 01:15 PM (IST)
बॉलीवूड इंडस्ट्रीमधील मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती मंडप लालबागचा राजा येथे ११ लाख रुपयांची देणगी दिली आहे. मात्र, यावेळी अभिनेते तिथे उपस्थित राहिले नाही. त्यांनी त्यांच्या टीममार्फत चेक दिला होता. आता त्यांचे सचिव सुधीर साळवी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते चेक हातात घेऊन पापाराझींसाठी पोज देताना दिसले. आता लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत आणि संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काहींनी त्याचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्यांना पंजाबच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे.
05 Sep 2025 01:05 PM (IST)
रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या संघर्षात हजारो निष्पाप जीव गमावले गेले, लाखो लोक विस्थापित झाले आणि संपूर्ण जगावर त्याचे पडसाद उमटले. “युद्धभूमीवर कोणताही उपाय सापडत नाही, निष्पापांचे प्राण जाणे अस्वीकार्य आहे”, अशा ठाम शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आपली भूमिका मांडली. गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) झालेल्या महासभेच्या चर्चेत भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर भाष्य केले. ‘युक्रेनच्या व्यापलेल्या प्रदेशातील परिस्थिती’ या अजेंड्यावर झालेल्या चर्चेत भारताने स्पष्ट केले की, संघर्षाचा परिणाम फक्त युरोपवर नाही, तर संपूर्ण जगावर होत आहे विशेषतः ग्लोबल साउथमधील देशांवर, जे आधीच आर्थिक अडचणीत आहेत.
05 Sep 2025 12:52 PM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तरुण महिला अधिकाऱ्यांना बेकायदेशीर वाळू उपसा करताना रोखताना धमकवले. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून यावरुन अजित पवारांवर चौफेर टीका केली जात आहे.
05 Sep 2025 12:50 PM (IST)
पुण्यामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर अर्धवट विसर्जित झालेल्या मुर्त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे करण्यांवर कायदेशीवर कारवाई केली जाणार आहे.
05 Sep 2025 12:48 PM (IST)
खासदार संजय राऊत म्हणाले की, “मुंबईत आल्यावर शिंदे यांना अमित शाह यांनी सगळ्यांना सांगितलं मुंबई महापलिकेचा महापौर भाजपचा व्हायला पाहिजे. तेव्हा शिंदे का नाही म्हणाले? महापौर शिवसेनचा बसणार मराठी बसणार? काय उखडायचं ते उखडा सत्ता ठाकरे बंदूचीच येणार आमचा भगवा बीएमसीवर फडकणार आणि आमचाचं महापौर बीएमसीमध्ये बसणार. हे मी शिंदेना सुद्धा सांगतो आणि त्या भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना पण सांगतो,” अशा कडक शब्दांत खासदार राऊत यांनी महायुतीला मुंबई पालिकेबाबत आव्हान दिले आहे.
05 Sep 2025 12:05 PM (IST)
ओणम हा केरळमधील प्रमुख सण असून, तो राजा महाबलीच्या वार्षिक परत येण्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. या दिवशी लोक घरे सजवतात, पारंपरिक नृत्य-गाणी करतात, खेळ खेळतात आणि खासकरून नौका शर्यती व बैलांच्या शर्यतींचे आयोजन केले जाते. हा सण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि पीक कापणीच्या हंगामात येतो. देशभरामध्ये ओमण सणाचा मोठा उत्साह दिसून येत आहे.
05 Sep 2025 12:00 PM (IST)
: पाकिस्तानकडून येणाऱ्या पुराच्या पाण्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि भारतीय बाजूच्या तटबंदीचे नुकसान झाल्यामुळे पंजाबमधील फिरोजपूर भारत-पाकिस्तान सीमेवरील अनेक किलोमीटर लांबीचे कुंपण पाण्याखाली गेले आहे.
#WATCH | Ferozepur, Punjab: Several kilometers of fencing on the India-Pakistan border submerged, as flood water coming from Pakistan crossed the International Border and damaged the embankment on the Indian side. pic.twitter.com/90ia1wlw4M
— ANI (@ANI) September 5, 2025
05 Sep 2025 11:50 AM (IST)
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे भारत दौऱ्यावर आले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ते आले आहेत. शेरिंग तोबगे आणि त्यांची पत्नी ओम ताशी डोमा अयोध्येत दाखल झाले आहेत.
#WATCH | Uttar Pradesh: Bhutan PM Tshering Tobgay and his spouse Aum Tashi Doma arrive in Ayodhya. pic.twitter.com/B7P15EYfxr
— ANI (@ANI) September 5, 2025
05 Sep 2025 11:40 AM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये अजित पवार हे एका महिला अधिकाऱ्यांंवर भडकले आहेत. बेकायदेशीर खडी उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांवर अजित पवार कारवाई थांबवण्यासाठी दबाव आणत असल्याचे दिसून येत आहे.
05 Sep 2025 11:30 AM (IST)
नेहमी शिक्षकाच्या भूमिकेमध्ये राहिलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिन. राधाकृष्णन यांनी देशाचे राजदूत, उप-राष्ट्रपती, राष्ट्रपती अशी पदं भूषवली. परदेशामध्ये शिक्षण घेत असताना ते अध्यापकप्रिय विद्यार्थी होते आणि पुढे शिक्षक झाल्यावर ते विद्यार्थीप्रिय अध्यापक बनले. वयाच्या केवळी विसाव्या वर्षी म्हणजेच 1908 साली इथिक्स ऑफ वेदान्त अॅंड मेटाफिजिक्स प्रसपोजिशन या विषयावर थिसिस लिहिला.आज त्यांचा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
05 Sep 2025 11:20 AM (IST)
जीएसटी सेक्शनमध्ये बदल करण्यात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "स्वतंत्र भारतात घेतला गेला हा आजवरचा सर्वात मोठा निर्णय आहे. जीएसटी ही आता अधिक सोपी कररचना बनली आहे. जीएसटी परिषदेने घेतलेले निर्णय म्हणजे दिवाळी आधीचा डबल धमाका आहे." अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.
05 Sep 2025 11:10 AM (IST)
मुंबईतील लालबागच्या दर्शनाच्या रांगामध्ये एक सामान्य माणसांसाठी तर व्हीआयपी लोकांसाठी वेगवेगळी रांग करण्यात येते. मात्र सामान्य लोक तासनतास रांगेमध्ये उभे असल्यामुळे मानवधिकार आयोगाने नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतर देखील व्हीआयपी दर्शन रांग सुरु आहे.