Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप

marathi-breaking-news-today-live-updates- विसर्जन मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असून गर्दीच्या भागांत १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही मिरवणुकीवर लक्ष ठेवले जाईल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 06, 2025 | 02:48 PM
LIVE
Top Marathi News Today Live: गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप
Follow Us
Close
Follow Us:
  • 06 Sep 2025 02:48 PM (IST)

    06 Sep 2025 02:48 PM (IST)

    लाल किल्ल्याच्या परिसरातून हिरे, रत्नजडित १ कोटी रुपयांचा कलश चोरीला

    नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ला संकुलात मंगळवारी होणाऱ्या जैन धार्मिक विधीतून १ कोटी रुपयांचा कलश चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. व्यापारी सुधीर जैन दररोज पूजेसाठी कलश घेऊन येत असत. गेल्या मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या स्वागताच्या गोंधळात, कलश स्टेजवरून गायब झाल्याचे आढळले. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संशयिताच्या कारवाया सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत.

    वाचा सविस्तर 

  • 06 Sep 2025 02:40 PM (IST)

    06 Sep 2025 02:40 PM (IST)

    निवृत्ती घेताच अमित मिश्राचा 'या' दोन भारतीय माजी कर्णधारांवर केला हल्लाबोल.. 

    Amit Mishra’s sensational statement : भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज आणि आयपीएलमधील यशस्वी गोलंदाज   अमित मिश्राने  नुकतीच म्हणजे ४ सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो तब्बल  २५ वर्षे टीम इंडियासाठी खेळला असून या कालावधीत त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक छोट्या मोठ्या कामगिरी केल्या आहेत.

    अमित मिश्रा बद्दल एक वास्तव सांगायचे झाले तर तो टीम इंडियासाठी सातत्याने खेळू शकला नाही. २५ वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत तो बहुतेक वेळा टीम इंडियाचा भाग राहिलेला नाही. तो महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूंच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून खूप वेळा खेळला आहे. आता अशातच त्याने टीम इंडियाबाबत एक मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. अमित मिश्राकडून भारतीय संघातील राजकारणाबाबत मोठे खुलासे करण्यात आले आहेत.

    वाचा सविस्तर

  • 06 Sep 2025 02:39 PM (IST)

    06 Sep 2025 02:39 PM (IST)

    मोटार ट्रान्सपोर्ट क्षेत्रात घडवा करिअर!

    इंटेलिजन्स ब्युरो (IB) अंतर्गत गृह मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आलेली सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) / एक्झिक्युटिव्ह पदांची भरती २०२५ ही देशातील तरुणांसाठी एक मोठी आणि महत्वाची रोजगारसंधी ठरत आहे. भारतातील नामांकित गुप्तचर यंत्रणा असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी मिळवणे हे अनेकांसाठी अभिमानास्पद मानले जाते. त्यामुळेच या भरतीची संधी तरुणांसाठी सुवर्णक्षण ठरू शकते.

    वाचा सविस्तर 

  • 06 Sep 2025 02:16 PM (IST)

    06 Sep 2025 02:16 PM (IST)

    प्रवासी थोडक्यात बचावले! Indigo ची 'ही' फ्लाईट चक्क 2 तास...; मध्यरात्री नेमके घडले तरी काय?

    Indigo Flight Emergency Landing:  कोचीवरुन अबुधाबीला जाणारे इंडिगोचे विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पुन्हा काही काळाने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले आहे. दरम्यान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीला जाण्यासाठी indigoच्या फ्लाईटने उड्डाण केले. मात्र विमानात गडबड झाल्याने हे विमान पुन्हा कोची विमानतळावर उतरवण्यात आले आहे.

  • 06 Sep 2025 02:00 PM (IST)

    06 Sep 2025 02:00 PM (IST)

    Lok Adalat मध्ये सहभागी ऑनलाइन अपॉइंटमेंट कशी घेता येईल

    पोर्टलवर जा: NALSA च्या ऑफिशियल वेबसाइट (https://nalsa.gov.in) किंवा स्टेट लीगल सर्विसेज अथॉरिटी (जसे दिल्लीसाठी https://dslsa.org) ला भेट द्या

    लोक न्यायालय निवडा: तुमच्या केसनुसार तारीख आणि ठिकाणाची निवड करा.

    केस डिटेल्स द्या: वादाचा प्रकार आणि सहाय्यक कागदपत्रे सबमिट करा

    स्लॉट बुक करा: टाइम स्लॉट निवडा आणि कन्फर्म करा. आता एक टोकन किंवा कन्फर्मेशन ईमेल जारी होणार आहे.

    सेशन अटेंड करा: ओळखपत्र आणि केस पेपर्स सारख्या आवश्यक कागदपत्रांसह नियुक्त केलेल्या ठिकाणी पोहोचा. मर्यादित जागा असल्याने लवकर नोंदणी करा. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात, राज्य पोर्टलवर वैवाहिक वादांसाठी ऑनलाइन बुकिंग करणे सोपे करण्यात आले आहे.

  • 06 Sep 2025 01:55 PM (IST)

    06 Sep 2025 01:55 PM (IST)

    देशभरात एकाच वेळी SIR लागू करणार

    बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी SIR वरील वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात एकाच वेळी त्याची अंमलबजावणी केली जाईल असे आयोगाने म्हटले आहे. याबाबत १० सप्टेंबर रोजी दिल्लीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह निवडणूक आयोगाची मोठी बैठक होणार आहे. भारतीय नागरिकांना SIR मध्ये समाविष्ट करण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांसाठी सूचनाही निवडणूक आयोगाने मागवल्या आहेत.

  • 06 Sep 2025 01:50 PM (IST)

    06 Sep 2025 01:50 PM (IST)

    Tanya Mittal च्या ट्रोलिंगमुळे आई-वडील हैराण, म्हणाले...

    बिग बॉस १९ ची स्पर्धक तान्या मित्तल पुन्हा एकदा चर्चेत आहे. तान्या मित्तलला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. आता या ट्रोलिंगवर मौन सोडत तान्या मित्तलच्या पालकांनी एक निवेदन जारी केले आहे. हे विधान तान्या मित्तलच्या इंस्टाग्राम हँडलवरून जारी करण्यात आले आहे. तान्या मित्तलच्या पालकांनी म्हटले आहे की, ‘जे लोक तिच्यावर प्रश्न विचारत आहेत किंवा आरोप करत आहेत त्यांना आमची एकच विनंती आहे. कृपया तिचा प्रवास पूर्ण होईपर्यंत वाट पहा आणि मग निर्णय घ्या. तिला इतका अधिकार आहे. तुमचे रील आणि आरोप तुम्हाला प्रसिद्धी देऊ शकतात, पण ते आयुष्यभरासाठी जखमा सोडतात.’

  • 06 Sep 2025 01:45 PM (IST)

    06 Sep 2025 01:45 PM (IST)

    1 मिलियन डॉलरचा लग्झरी जहाज पाण्यात झाला विलीन

    व्हिडीओमध्ये एक नवंकोर, प्रचंड आणि महागडं लक्झरी जहाज (नौका) समुद्रात प्रथमच उतरवलं जातं. जहाज अतिशय भव्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेलं दिसतं. लाँच केल्यानंतर जहाज काही अंतरापर्यंत व्यवस्थित चालतं, पण अचानक काही तांत्रिक बिघाडामुळे ते एका बाजूला झुकायला लागतं. काही क्षणांतच ते झुकत झुकत पाण्यात बुडायला लागतं. विशेष म्हणजे, जहाज बुडताना त्याच्या एका कोपऱ्यात एक व्यक्ती लाईफ जॅकेटसह उभा दिसतो. अखेर त्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारावी लागते.

  • 06 Sep 2025 01:40 PM (IST)

    06 Sep 2025 01:40 PM (IST)

    एसटीच्या तिकीटासाठी क्यूआर कोडसह ऑनलाईन पेमेंटला पसंती

    किफायतशीर प्रवास म्हणून एसटी बसकडे पाहिले जाते. या बसमधून प्रवास करताना महिला, ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात तिकीट आकारले जाते. बसमध्ये प्रवास करताना वाहक व प्रवाशांचे नेहमीच सुट्या पैशावरून वादावादी व्हायची. अशात एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता प्रवाशी क्युआर कोड, फोन पे, गुगल पे यासारखा माध्यमांना पसंती देत आहे.

  • 06 Sep 2025 01:30 PM (IST)

    06 Sep 2025 01:30 PM (IST)

    ब्रिटनमध्ये गणेशोत्सव थाटामाटात साजरा

    गणपती बप्पाच्या विसर्जनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ब्रिटनमधील आहे. दरवर्षी गणपती बप्पाची धूम केवळ भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळते. परदेशात राहणारे भारतीय लोक आनंदाने, थाटामाटात गणेशोत्सव साजरा करतात. यामध्ये परदेशी लोकांचाही सहभाग असतो. परंतु सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ब्रिटनमध्ये विसर्जनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. ब्रिटनमधील भारतीयांना गणपती बप्पाचे नदीत मूर्ती विसर्जन केले आणि पंरपरा जपली. परंतु यावर पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे जल प्रदूषणाच्या वादाला तोंड फुचले असून, लोकांनी नदीत विसर्जनामूळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.

  • 06 Sep 2025 01:25 PM (IST)

    06 Sep 2025 01:25 PM (IST)

    लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

    लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. लाखो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

  • 06 Sep 2025 01:20 PM (IST)

    06 Sep 2025 01:20 PM (IST)

    गर्भवती महिलेने दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत मारली उडाली

    सातारा शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गरोदर महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. यात महिलेचा आणि एका चिमुकलीचा मुत्यू झाला आहे. तर एकीला वाचाव्यात स्थानिकांना यश आले आहे. साताऱ्यातील परळी खोऱ्यातल्या कारी येथे हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • 06 Sep 2025 01:15 PM (IST)

    06 Sep 2025 01:15 PM (IST)

    चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी निघाला

    चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी निघाला असून मिरवणुकीत गुलालाची उधळण अन् भक्तांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

  • 06 Sep 2025 01:09 PM (IST)

    06 Sep 2025 01:09 PM (IST)

    ‘वीकेंडच्या वार’ मध्ये येणार मोठा ट्विस्ट

    ‘बिग बॉस १९’ हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही या शोमध्ये प्रसिद्ध चेहऱ्यांनी एन्ट्री घेतली आहे. शो सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत, त्यामुळे स्पर्धक स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘बिग बॉस १९’ च्या घरात खूप गोंधळ आहे. एवढेच नाही तर स्पर्धकांचे खरे चेहरे समोर येऊ लागले आहेत. कोण कोणाचा मित्र आहे आणि कोण कोणाचा शत्रू आहे हे सांगणे खूप कठीण आहे. घरातील सदस्यांवर नामांकनाची तलवार लटकत आहे.

  • 06 Sep 2025 12:55 PM (IST)

    06 Sep 2025 12:55 PM (IST)

    गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!

    गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या, भावनिक निरोपात भक्तांचे डोळे पाणावले. आनंद चतुर्थी निमित्त घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांचे जल्लोषात विसर्जनाला सुरुवात झाली आहे. एकीकडे मुंबई पोलिस आणि महानगरपालिकेची जय्यत तयारी करत नियंत्रणासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्ष ही गणरायाला निरोप देण्यात आलेल्या या गणेश मंडळाच्या स्वागतासाठी राजकारण सोडून जयत तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.

  • 06 Sep 2025 12:45 PM (IST)

    06 Sep 2025 12:45 PM (IST)

    गणेशभक्तांना गिरीश महाजनांचे आवाहन

    सांभाळून गणरायाला निरोप द्या. छोट्या मोठ्या घटना दरवर्षी घडत असतात. गणरायाच्या कृपणे धरणं भरली आहे. नदीत उतरू नका. दुर्घटना होता कामा नये. पोहता येत असले तरी धाडस करू नये, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. प्रशासनानं सगळी काळजी घेतली आहे, असे ते म्हणाले.

  • 06 Sep 2025 12:35 PM (IST)

    06 Sep 2025 12:35 PM (IST)

    बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग

    मुंबईत 6500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आणि जवळपास पावणेदोन लाख घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आल्याचं सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितलं. तसंच या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी एआयच्या मदतीने सर्व घडामोडी टिपण्यासाठी लालबाग तसेच महत्त्वाच्या मंडळाच्या ट्रक, तसेच वाहनांना चीप बसवली आहे. यामुळे गर्दीत हे वाहन जिथे जाईल त्याची स्थिती पोलिसांना कळेल आणि तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास मदत होईल. सीसीटीव्हीद्वारे संशयास्पद हालचाली, व्यक्तींबाबतही पोलिसांना अलर्ट मिळेल.

  • 06 Sep 2025 12:25 PM (IST)

    06 Sep 2025 12:25 PM (IST)

    अजितदादांवर चौफेर टीका होत असताना रोहित पवारांनी केलं समर्थन

    सोलापूर जिल्ह्यात मुरूमाच्या बेकायदेशीर उत्खननावरून अजित पवार यांच्या आघाडीतील भागीदारांनी जाणूनबुजून त्यांच्या आणि आयपीएस अधिकाऱ्यातील संभाषणाला वेगळा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर चौफेर टीका होत असताना रोहित पवारांनी केलं समर्थन केलं आहे. रोहित पवार म्हणाले, राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.

  • 06 Sep 2025 12:15 PM (IST)

    06 Sep 2025 12:15 PM (IST)

    मुळशी धरणातून पाणी सोडणार

    मुळशी धरण ९८ % भरले आहे व पाऊस कमी / अधिक प्रमाणात होत आहे आणि पाणी पातळीत वाढ घट होत आहे. त्यामुळे मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 1300 ने सुरू असणारा विसर्ग सकाळी ११:०० वाजता 2946 Cusecs करण्यात येईल, तसेच पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

  • 06 Sep 2025 12:10 PM (IST)

    06 Sep 2025 12:10 PM (IST)

    कसबा गणपती बेलबाग चौकातून मार्गस्थ

    पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात मानाचा पहिला गणपती कसबा १०.१५ वाजता बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थ झाला. पारंपरिक पालखीतून लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ. दरवर्षी पेक्षा यंदा एक तास अधिच मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

  • 06 Sep 2025 11:33 AM (IST)

    06 Sep 2025 11:33 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाबा जगताप अंमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल

    सोलापूरच्या माढा तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा गाजत आहे. अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबा जगताप यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक व्हिडिओमध्ये बाबा जगताप आपल्या कार्यालयात बसून अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ प्रसारित होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

  • 06 Sep 2025 11:31 AM (IST)

    06 Sep 2025 11:31 AM (IST)

    लालबागेत भरधाव वाहनाच्या धडकेत २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, ११ वर्षीय मुलगा गंभीर

    मुंबईतील लालबाग परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला, तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात व्यक्ती भरधाव वाहनाने विरुद्ध दिशेने येत झोपलेल्या मुलांना धडक दिली. या भीषण धडकेत चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत जागीच ठार झाली, तर गंभीर जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • 06 Sep 2025 10:59 AM (IST)

    06 Sep 2025 10:59 AM (IST)

    वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर शस्त्रपूजन

    पुण्यात एकीकडे गणपती विसर्जनाची मिरवणुकीची धामधूम सुरू असताना नाना पेठेत टोळी युद्धाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक व आंदेकर टोळीचा आधारस्तंभ वनराज आंदेकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष गणेश कोमकर (Ayush Komkar) याची शुक्रवारी(05 सप्टेंबर) रात्री सुमारे पावणेआठच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

    बातमी सविस्तर वाचा...

  • 06 Sep 2025 10:56 AM (IST)

    06 Sep 2025 10:56 AM (IST)

    सुरु होतोय Amazon आणि Flipkart चा बंपर सेल

    लोकप्रिय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने आगामी सेलची घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेल सुरु होणार आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांनी आगामी फेस्टिवल सेलची घोषणा केली आहे. तसेच या आगामी सेलमधील ऑफर्स आणि डिस्काऊंटबद्दल देखील माहिती समोर आली आहे...सविस्तर वाचा

  • 06 Sep 2025 10:44 AM (IST)

    06 Sep 2025 10:44 AM (IST)

    BGMI खेळण्याची मजा आणखी वाढणार

    तुम्ही देखील पॉपुलर बॅटलरॉयल गेम बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) प्लेअर आहात का? मग नक्कीच तुम्ही गेममधील आगामी अपडेटची वाट बघत असणार… सर्व बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया प्लेअर्सससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेमच्या आगामी अपडेटची तारीख आता समोर आली आहे. येत्या काहीच दिवसांत म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी BGMI 4.0 Update रिलीज केलं जाणार आहे. आगामी अपडेट BGMI यूजर्सचा गेमिंग एक्सपीरियंस पूर्णपणे बदलणार आहे. आगामी अपडेटमध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. सविस्तर वाचा...

     

  • 06 Sep 2025 10:32 AM (IST)

    06 Sep 2025 10:32 AM (IST)

    तीन धावांनी हुकलं Narayan Jagadeesan चं द्विशतक

    जगदीशाने कशाप्रकारे दिलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. शुक्रवारी दुलीप करंडक उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण विभागाने पहिल्या डावात उत्तर विभागाविरुद्ध ५३६ धावा केल्या. दक्षिण विभागाने ३ बाद २९७ धावांवरून खेळ सुरू केल्यानंतर, संपूर्ण दिवस (८८.२ षटकांत) फलंदाजी केली परंतु उर्वरित विकेट गमावून फक्त २३९ धावा केल्या. बातमी सविस्तर वाचा...

  • 06 Sep 2025 10:26 AM (IST)

    06 Sep 2025 10:26 AM (IST)

    PM मोदी US ला जाणार नाहीत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) अधिवेशनात सहभागी होणार नाहीत. त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी न होण्याचा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड ठोठावला आहे, त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे.

  • 06 Sep 2025 10:19 AM (IST)

    06 Sep 2025 10:19 AM (IST)

    ‘चुकीला माफी नाही’ पुणे पोलिसांनी आरोपींना दिला इशारा

    आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा 18 वर्षीय मुलगा आयुष कोमकर याला आंदेकर टोळीने टार्गेट करून हत्या केली. या हत्येनंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना थेट इशारा देत म्हण्टक आहे की, चुकीला माफी नाही. प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा.

    बातमी सविस्तर वाचा...

  • 06 Sep 2025 10:10 AM (IST)

    06 Sep 2025 10:10 AM (IST)

    सेमीफायनलमध्ये झाले Novak Djokovic चे स्वप्न भंग

    सध्या अमेरिकेत यूएस ओपन २०२५ जोरात सुरू आहे. ६ सप्टेंबर रोजी सकाळी लवकर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कार्लोस अल्काराजने शानदार कामगिरी केली. त्याच्या फिटनेस आणि शानदार खेळाच्या जोरावर त्याने अनुभवी नोवाक जोकोविचला पराभूत करून यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर २ तास २३ मिनिटे चाललेला हा सामना अल्काराजने २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविचचा ६-४, ७-६ (४), ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

  • 06 Sep 2025 09:57 AM (IST)

    06 Sep 2025 09:57 AM (IST)

    6,000mAh बॅटरीसह आला Redmi चा नवा बजेट स्मार्टफोन

    चिनी कंपनी शाओमीचा लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Redmi ने एक नवीन बजेट डिव्हाईस लाँच केले आहे. हा नवीन बजेट स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 15C 4G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने हे डिव्हाईस निवडक बाजारात लाँच केला आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीने लाँच केलेले नवीन डिव्हाईस Redmi 14C चे अपग्रेड मॉडेल आहे. कंपनीने हे डिव्हाईस 2024 मध्ये लाँच केले होते.

  • 06 Sep 2025 09:50 AM (IST)

    06 Sep 2025 09:50 AM (IST)

    ठाण्यातील भिवंडीत कारखान्याला भीषण आग

    मुंबई : ठाण्यातील भिवंडीत एका कारखान्याला भीषण आग लागली. कामतघर परिसरात असलेल्या बालाजी डाईंग फॅक्टरीत ही आग लागल्याची माहिती दिली जात आहे. ज्या इमारतीत आग लागली ती इमारत दोन मजली इमारत असून, ती आगीच्या भक्ष्यस्थानी होती. कारखान्यात ठेवलेल्या कपड्यांमुळे आग वेगाने पसरली आणि आजूबाजूच्या मजल्यांनाही वेढले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.

  • 06 Sep 2025 09:43 AM (IST)

    06 Sep 2025 09:43 AM (IST)

    हिटमॅनने हात जोडून चाहत्यांना का गप्प केले? Video Viral

    आणखी एकदा रोहितचे कौतुक करण्यासारखा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शर्माच्या स्वभावाचे कौतुक करताना प्रत्येकजण कधीही थकत नाही. आता त्याने पुन्हा एकदा असे काही केले आहे ज्याने मन जिंकले आहे. रोहितने हात जोडून चाहत्यांना शांत केले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रत्येकजण रोहितचे कौतुक करत आहे.

  • 06 Sep 2025 09:33 AM (IST)

    06 Sep 2025 09:33 AM (IST)

    ५००० कोटी रुपयांच्या ड्रग्सचा भांडाफोड

    मीरा भाईंदर : वसई विरार पोलिसांनी ड्रग्स फॅक्टरीचा भांडाफोड करण्यात आला आहे. पोलिसांनी हैदराबाद येथील ड्रग्स फॅक्टरीवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. मीरा रोडमधील एमडी ड्रग्सच्या एका प्रकरणात तपास सुरू असताना हैदराबाद कनेक्शन सामोर आले. दरम्यान, मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटने १४ पोलिसांना सोबत घेऊन हैदराबाद येथे छापेमारी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्स किंमत 5000 कोटी असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई शुक्रवारी (5 सप्टेंबर 2025) ला करण्यात आली.

  • 06 Sep 2025 09:23 AM (IST)

    06 Sep 2025 09:23 AM (IST)

    सोन्याच्या किंमतींनी गाठला पुन्हा नवीन उच्चांक

    भारतात आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर काल म्हणजेच 5 सप्टेंबर 2025 रोजी देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली होती. जीएसटी कौन्सिलची 56 वी बैठक संपल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीनी मोठा टप्पा पार केला आहे.

  • 06 Sep 2025 09:20 AM (IST)

    06 Sep 2025 09:20 AM (IST)

    सेमीफायनलमध्ये झाले Novak Djokovic चे स्वप्न भंग

    Novak Djokovic vs Carlos Alcaraz : सध्या अमेरिकेत यूएस ओपन २०२५ जोरात सुरू आहे. ६ सप्टेंबर रोजी सकाळी लवकर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कार्लोस अल्काराजने शानदार कामगिरी केली. त्याच्या फिटनेस आणि शानदार खेळाच्या जोरावर त्याने अनुभवी नोवाक जोकोविचला पराभूत करून यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर २ तास २३ मिनिटे चाललेला हा सामना अल्काराजने २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविचचा ६-४, ७-६ (४), ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

  • 06 Sep 2025 09:13 AM (IST)

    06 Sep 2025 09:13 AM (IST)

    सलमान खान आज कोणाला खडसावणार?

    आज बिग बॉस 19 दुसरा वीकेंडचा वार होणार आहे. सलमान खान कोणाला खडसावणार त्याचबरोबर कोणाचं कौतुक करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. झालेल्या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी धुमाकूळ घातला. फरहाना आणि अभिषेक बजाज यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळाला. मागील आठवड्यामध्ये कोणत्याही सदस्याला घराबाहेर काढण्यात आले होते या आठवड्यात पुन्हा पाच सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहे. सलमान खानचा नवा एक प्रमुख सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामध्ये तो आता घरातला सदस्यांना ओरडताना दिसत आहे.

  • 06 Sep 2025 09:03 AM (IST)

    06 Sep 2025 09:03 AM (IST)

    लाडक्या बाप्पाला आज दिला जाणार भावपूर्ण निरोप

    मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या जयघोषात शनिवारी लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. घरोघरी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली असून, सार्वजनिक मंडळांसह यंत्रणा सज्ज आहे. बाप्पाचे विसर्जन करताना मन अतिशय निराश होते, पण परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते.

  • 06 Sep 2025 08:55 AM (IST)

    06 Sep 2025 08:55 AM (IST)

    बाप्पाला निरोप देण्यासाठी वरूणराजाचे आगमन

    यंदा गणपती बाप्पाला निरोप देताना पावसाची (Mumbai Rain) हजेरी लागण्याची शक्यता आहे. कालपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू असून आज पहाटेपासूनही संततधार कोसळत आहे. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्याने पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे प्रणाली हळूहळू वायव्य दिशेकडे सरकत असून त्याची तीव्रता वाढत आहे. सध्या समुद्रसपाटीपासून तब्बल ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत.

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवारी मुंबईत कालप्रमाणेच पावसाचा जोर कायम राहील. दक्षिण मुंबईत रिमझिम सरी तर उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. शुक्रवारप्रमाणे शनिवारीही पावसाळी वातावरण कायम राहील. मात्र, सोमवारनंतर पाऊस उघडीप देईल, असा अंदाज आहे. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकीत पावसाची हजेरी एकीकडे नाचणाऱ्यांचा उत्साह दुणावणारी ठरेल. परंतु सततचा पाऊस सुरू राहिल्यास मूर्ती झाकून न्याव्या लागतील आणि मिरवणुकीचा वेगही मंदावण्याची शक्यता आहे.

  • 06 Sep 2025 08:45 AM (IST)

    06 Sep 2025 08:45 AM (IST)

    पुण्यात गँगवॉर; नाना पेठेत गोळ्या घालून तरूणाची हत्या

    Pune News : अनंत चतुर्दशीच्या तयारीदरम्यान पुण्यात गँगवॉरची धक्कादायक घटना घडली आहे. नाना पेठ परिसरात एका तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या असून, या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे.ही घटना एका वर्षापूर्वी झालेल्या नगरसेवक खुनाच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हल्लेखोरांनी तरुणावर तब्बल तीन गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख गोविंद कोमकर अशी झाली असून, तो गणेश कोमकर यांचा मुलगा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

  • 06 Sep 2025 08:40 AM (IST)

    06 Sep 2025 08:40 AM (IST)

    भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार, 14 सप्टेंबरला राडा होणार

    IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप क्रिकेट स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होत आहे. यंदाही भारत–पाकिस्तान संघ आमनेसामने येणार असून, हा हाय-वोल्टेज सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याबाबत अनेक शंका उपस्थित होत होत्या. मात्र बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.   भारत–पाकिस्तान सामन्यासंदर्भात बीसीसीआय केंद्र सरकारच्या धोरणाचे पूर्ण पालन करते आणि त्यात कोणतीही अडचण नाही, असही त्यांनी सांगितलं आहे.

  • 06 Sep 2025 08:32 AM (IST)

    06 Sep 2025 08:32 AM (IST)

    पुण्यात गणपती विसर्जन मिरणुकीला सुरूवात

    पुणे शहरातील यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. यंदा मिरवणुकीची सुरुवात नेहमीपेक्षा एक तास लवकर, म्हणजेच शनिवारी (दि. ६) सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. मागील वर्षी ही मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली होती.यासंदर्भातील माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मानाच्या गणेश मंडळांनीही या नियोजनास सहमती दर्शवली असून, मिरवणूक वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

    मानाचा पहिला कसबा गणपती सकाळी ९.३० वाजता टिळक पुतळा, मंडई येथे आगमन करून बेलबाग चौकाकडे मार्गस्थ होईल. त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी १०.३० वाजता, मानाचा तिसरा गुरुजी तालिम गणपती सकाळी ११ वाजता, तर मानाचे चौथा तुळशीबाग गणपती व पाचवा केसरीवाडा गणपती दुपारी १२ वाजेपर्यंत बेलबाग चौक पार करून पुढे जातील.याप्रमाणे दुपारपर्यंत सर्व मानाचे गणपती लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होतील, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

Marathi Breaking news live update:  अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत श्री गणरायाचे विसर्जन आज होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील गिरगाव चौपाटीसह विविध ठिकाणी हजारो सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन (Ganesh Immersion 2025) पार पडणार आहे. यंदा प्रथमच गणेश विसर्जन सोहळ्याच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शहरातील सुमारे ६५०० सार्वजनिक मंडळे आणि दीड लाख गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका आज निघणार आहेत.

विसर्जन मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असून गर्दीच्या भागांत १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही मिरवणुकीवर लक्ष ठेवले जाईल. लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांच्या विसर्जन मिरवणुका नेहमीप्रमाणेच विशेष आकर्षण ठरणार आहेत.

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political national crime sports international lifestyle business breaking news ganpati vissarjan breaking news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: दिल्लीत मुसळधार पाऊस; 100 पेक्षा रेल्वेगाड्यांना फटका
1

Top Marathi News Today: दिल्लीत मुसळधार पाऊस; 100 पेक्षा रेल्वेगाड्यांना फटका

Top Marathi News Today: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर, अजित पवारांची माहिती
2

Top Marathi News Today: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर, अजित पवारांची माहिती

Top Marathi News Today:  हैदराबाद गॅझेटला मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देण्यास तयार
3

Top Marathi News Today: हैदराबाद गॅझेटला मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देण्यास तयार

Top Marathi News Today: मुंबईकरांची होणार कोंडी! CSMT कडे जाणारे सर्व मार्ग बंद
4

Top Marathi News Today: मुंबईकरांची होणार कोंडी! CSMT कडे जाणारे सर्व मार्ग बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.