Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: अखेर 12 दिवसानंतर इराण-इस्त्रालय देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा

Marathi breaking live marathi - मुंबई महानगरपालिकेनेही मोठ्या भरतीच्या दिवशी, विशेषतः भरती कालावधीत समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 24, 2025 | 07:23 PM
Top Marathi News Today: अखेर 12 दिवसानंतर इराण-इस्त्रालय देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates:  मुंबई आणि उपनगरांवर पुढील पाच दिवस दुहेरी संकट ओढावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. एकीकडे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे समुद्रही खवळलेला राहणार असून उंच लाटा उसळणार आहेत.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईच्या समुद्रात पुढील पाच दिवस साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळू शकतात. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर राहणाऱ्यांना आणि पर्यटकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेनेही मोठ्या भरतीच्या दिवशी, विशेषतः भरती कालावधीत समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, तसेच प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 24 Jun 2025 07:10 PM (IST)

    24 Jun 2025 07:10 PM (IST)

    Mangal Prabhat Lodha: मंत्री लोढांचा जनता दरबार ठरतोय आदर्श; भाजपा कार्यालयात 500 नागरिकांनी…

    मुंबई:  विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकाच छताखाली उपलब्ध राहून, नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्याच्या हेतूने थेट प्रशासकीय मदत मिळवून देणारा जनता दरबार आयोजित करून कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या या जनता दरबारात महाराष्ट्रातील सुमारे 500 नागरिकांनी आपले प्रश्न मांडले.

  • 24 Jun 2025 06:48 PM (IST)

    24 Jun 2025 06:48 PM (IST)

    Mangal Prabhat Lodha: मंत्री लोढांचा जनता दरबार ठरतोय आदर्श; भाजपा कार्यालयात 500 नागरिकांनी...

    मुंबई:  विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकाच छताखाली उपलब्ध राहून, नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्याच्या हेतूने थेट प्रशासकीय मदत मिळवून देणारा जनता दरबार आयोजित करून कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या या जनता दरबारात महाराष्ट्रातील सुमारे 500 नागरिकांनी आपले प्रश्न मांडले.

  • 24 Jun 2025 06:18 PM (IST)

    24 Jun 2025 06:18 PM (IST)

    Air India च्या अडचणीत वाढ; अहमदाबाद दुर्घटनेप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, केली ‘ही’ मोठी मागणी

    नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता. यामध्ये प्रवास करत असणाऱ्या 242 पैकी 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक प्रवासी सुखरूप बचावला आहे. मात्र त्यानंतर एअर इंडियाच्या अडचणी संपायचे काही चित्र पाहायला मिळत आहे. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. एअर इंडियाच्या या प्रकरणात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे.

  • 24 Jun 2025 05:54 PM (IST)

    24 Jun 2025 05:54 PM (IST)

    Union बँकेमध्ये भरती! पगार ऐकून व्हाल आनंदी; ताबडतोब करा अर्ज

    अनेक जणांनी बँकिंग इन फायनान्स तसेच वाणिज्या संबंधित अनेक कोर्स केले असतील पण सध्या ते नोकरीच्या शोधत असतील. जर तुमच्यापैकी असे कुणी आहे? तर नक्कीच हे लेख तुमच्या उपयोगाचे आहे. कारण Union Bank या सरकारने बँकेने भरतीला सुरुवात केली आहे. एका पदासाठी नव्हे, तर विविध पदांना या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. अगदी १० वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठीही येथे जागा रिक्त आहेत. महत्वाचे म्हणजे सरकारी बँक असल्यामुळे नोकरीही सरकारी असेल आणि मिळणार पगारही भरघोस असेल, त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

  • 24 Jun 2025 05:37 PM (IST)

    24 Jun 2025 05:37 PM (IST)

    गुजरातमध्ये ‘आप’ चा उदय कोणासाठी धोक्याची घंटा? भाजप की कॉंग्रेस? वाचा सविस्तर

    भ्रष्टाचार विरोधी आंदोनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला आणि पुढे देशाच्या राजकारणात महत्त्वाचा पक्ष बनला. दिल्लीत सत्ता गाजवली, त्यांच्या योजनांची जगानेही दखल घेतली. मात्र दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात झालेल्या आरोपांमुळे आपला दिल्लीची सत्ता गमवावी लागली. एकाक्षणी असंही वाटतं होतं की आता आपला पुन्हा उभारी घेता येणं अशक्य आहे, मात्र गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये आपने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र, आपचा गुजरातमध्ये उदय नेमका कोणासाठी धोकादाय ठरणार आहे, दिल्लीची सत्ता हिसकावून घेतलेल्या भाजपसाठी की इंडिया आघाडीतील त्याचाच सहकारी कॉंग्रेसाठी, जाणून घेऊयात…

  • 24 Jun 2025 05:20 PM (IST)

    24 Jun 2025 05:20 PM (IST)

    Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर; 29 फुट पातळी अन् राजाराम बंधारा...

    कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी २९ फुटांवर पोहोचली असून यामुळं पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. तसंच, या मार्गावरील वाहतूक प्रशासनानं बंद केली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

  • 24 Jun 2025 05:00 PM (IST)

    24 Jun 2025 05:00 PM (IST)

    काँग्रेसने केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, निवडणूक आयोगावरही केले आरोप

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुल गांधी यांनी सातत्याने या मतचोरीचे प्रकरण लावून धरले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघातील मतांचा घोळ उघड केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढल्याचे उघड झाले आहे. भाजपाची मतचोरी पकडली गेल्याने देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 24 Jun 2025 04:50 PM (IST)

    24 Jun 2025 04:50 PM (IST)

    शक्तीपीठाच्या भूसंपादनावरून राजू शेट्टींचा राज्य सरकारवर घणाघात…

    आज (24 जून) राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यातील प्रमुख निर्णय म्हणजे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची रचना केली आहे. शक्ती द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाचा वेळ १८-२० तासांवरून फक्त ८-१० तासांपर्यंत कमी होईल. १२ जिल्ह्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवून, पर्यटन, प्रादेशिक विकास आणि आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यास प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. शक्तीपीठ एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होतो आणि महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपतो. यावर आता कॉँग्रेस नेते सतेज पाटील यांनी टीका केली आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 24 Jun 2025 04:48 PM (IST)

    24 Jun 2025 04:48 PM (IST)

    पुढील 10 वर्षात देशात अडीच ते तीन लाख कोटींचे बोगदे

    भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील १० वर्षांत २.५ ते ३ लाख कोटींच्या टनेल (भुयारी मार्ग) प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU), पुणे येथे आयोजित ‘सस्टेनेबल टनेलिंग फॉर बेटर लाईफ’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 24 Jun 2025 04:35 PM (IST)

    24 Jun 2025 04:35 PM (IST)

    भारताच्या जीडीपी वाढीला मिळाली चालना! काय सांगतो अहवाल?

    एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ (आर्थिक वर्ष २६) साठी भारताच्या आर्थिक विकास दराचा (जीडीपी ग्रोथ) अंदाज वाढवला आहे. आता एजन्सीला देशाचा जीडीपी ६.५% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत हा अंदाज सुधारला आहे, जेव्हा जागतिक अनिश्चिततेमुळे वाढीचा अंदाज ६.३% पर्यंत कमी करण्यात आला होता.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 24 Jun 2025 04:29 PM (IST)

    24 Jun 2025 04:29 PM (IST)

    मनोज बाजपेयीच्या ‘The Family Man 3’ पोस्टरने वेधले लक्ष

    प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांची प्रसिद्ध वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा झाली आहे. अभिनेता पुन्हा एकदा ‘श्रीकांत तिवारी’ त्याच्याच शैलीत चमकणार आहे. मालिकेची घोषणा तर झालीच पण मनोज बाजपेयीचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. ‘द फॅमिली मॅन ३’ कधी रिलीज होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मालिकेचे दोन सीजन हिट झाल्यांनतर आता प्रेक्षकांना तिसरा सीजन पाहायला मिळणार आहे. ‘द फॅमिली मॅन ३’चे पहिले पोस्ट नुकतेच निर्मात्यांनी शेअर केले आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 24 Jun 2025 04:15 PM (IST)

    24 Jun 2025 04:15 PM (IST)

    'तेरे नाम' मधली गाजलेली हेअरस्टाईल कोणापासून प्रेरित होती? सलमान खानने २२ वर्षांनी केला खुलासा

    २००३ साली रिलीज झालेल्या 'तेरेनाम' चित्रपटात सलमान खानने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या लूकचे लाखो चाहते होते आणि आजही आहेत. सलमानने या चित्रपटामध्ये कोणाला प्रेरित होऊन हेअरस्टाईल केली आहे. या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्याने कपिल शर्मा शोमध्ये दिलं आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 24 Jun 2025 04:10 PM (IST)

    24 Jun 2025 04:10 PM (IST)

    रणबीर- साई पल्लवीच्या 'रामायण' चित्रपटाचा प्रोमो केव्हा रिलीज होणार?

    सध्या अवघ्या बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची शुटिंग सुरु आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची फौज दिसणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित, 'रामायण' चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रभू श्री रामाच्या भूमिकेत तर, साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. प्रेक्षक सध्या या चित्रपटासाठी आतुर असून या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ती गुड न्यूज म्हणजे चित्रपटाच्या प्रोमोसंबंधित...

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...)

  • 24 Jun 2025 04:00 PM (IST)

    24 Jun 2025 04:00 PM (IST)

    केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, सरकारने ‘या’ कामाची अंतिम मुदत ३ महिन्यांपर्यंत वाढवली

    केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे आणि युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) आणि नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) निवडण्यासाठी पूर्वी निश्चित केलेली अंतिम मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. हे काम करण्यासाठी सरकारने आता नवीन अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. सरकारने या संदर्भात एक प्रेस रिलीज जारी करून माहिती शेअर केली आहे.

  • 24 Jun 2025 03:50 PM (IST)

    24 Jun 2025 03:50 PM (IST)

    भाषा सक्तीवर अखेर सरकारची नरमाईची भूमिका; हिंदी भाषेच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती

    महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत सर्वच शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र मराठी भाषेची अस्मिता धोक्यात येणार असल्यामुळे राज्य सरकार सर्वच स्तरातून टीका होत होती. अखेर वाढता विरोध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे.

  • 24 Jun 2025 03:40 PM (IST)

    24 Jun 2025 03:40 PM (IST)

    ICC ने शतकवीर ऋषभ पंतला चांगलेच फटकारले, मैदानात पंचांसोबत ‘ती’ वागणूक पडली महागात

    ‘रविवारी हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल ऋषभ पंतला अधिकृतपणे फटकारण्यात आले आहे. पंतने खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.८ चे उल्लंघन केल्याचे दिसून आले, जे “आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाशी असहमती दर्शविण्याशी” संबंधित आहे.’ आयसीसीने पंतला फटकाराव्यतिरिक्त, पंतच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे. २४ महिन्यांच्या कालावधीत हा त्याचा पहिलाच गुन्हा ठरला आहे.

  • 24 Jun 2025 03:29 PM (IST)

    24 Jun 2025 03:29 PM (IST)

    पुण्यात कोसळधार; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सध्याची स्थिती काय?

    पुणे: पुणे शहरात आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. गेले काही दिवस पुणे शहर आणि उपनगर परिसरात पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे चित्र होते. मात्र आज पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणातून सध्या 7,700 क्युसेक  वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

  • 24 Jun 2025 03:29 PM (IST)

    24 Jun 2025 03:29 PM (IST)

    अखेर शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

    महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची रचना केली आहे. शक्ती द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाचा वेळ १८-२० तासांवरून फक्त ८-१० तासांपर्यंत कमी होईल. १२ जिल्ह्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवून, पर्यटन, प्रादेशिक विकास आणि आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यास प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. शक्तीपीठ एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होतो आणि महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपतो. तो वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांमधून जातो. जलद आणि अधिक सोयीस्कर मार्ग तयार करून, हा प्रकल्प प्रादेशिक पर्यटन आणि विकासाला चालना देणार आहे. याचदरम्यान आज (24 जून) राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यातील प्रमुख निर्णय म्हणजे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे.

  • 24 Jun 2025 03:19 PM (IST)

    24 Jun 2025 03:19 PM (IST)

    रणबीर- साई पल्लवीच्या ‘रामायण’ चित्रपटाचा प्रोमो केव्हा रिलीज होणार?

    रणबीर कपूरने आजवर अनेक चित्रपटांमध्ये ॲक्शन आणि कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत. पहिल्यांदाच तो एक आध्यात्म भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रभू श्री रामाच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदाच रणबीर कपूर दिसणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाबद्दल सर्वात जास्त उत्सुक आहेत. येत्या काही दिवसांमध्येच चित्रपटाचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचा नवा प्रोमो तब्बल ३ मिनिटांचा असणार आहे. याबद्दलचे वृत्त पिंकव्हिलाने दिलेले आहे. या प्रोमोमध्ये चाहत्यांना राम आणि सीतेची पहिली झलक पाहायला मिळणार आहे.

  • 24 Jun 2025 03:11 PM (IST)

    24 Jun 2025 03:11 PM (IST)

    राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांसाठी खास बातमी, ‘सौरकृषी’ योजनेतून 102 मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती

    केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. या माध्यमातून आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा हा उद्देश असतो. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुधारणा व्हावी हाच शासकीय योजना राबवण्याचा हेतू असतो. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मिती तर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत.या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • 24 Jun 2025 03:00 PM (IST)

    24 Jun 2025 03:00 PM (IST)

    “भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना सोडणार नाही“; PM मोदींच्या इशाऱ्याने पाकिस्तानला भरली धडकी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. भारतीयांना त्रास देणाऱ्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही, असा कडक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानला कडक इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “भारतीय नागरिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही. दहशतवाद्यासाठी कोणतेही ठिकाण लपण्यासाठी सुरक्षित नसेल. दहशतवाद्यांना आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या लोकांना कधीच माफ केले जाऊ शकत नाही. त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल.”

  • 24 Jun 2025 02:59 PM (IST)

    24 Jun 2025 02:59 PM (IST)

    महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

    पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मिती तर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत.या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • 24 Jun 2025 02:39 PM (IST)

    24 Jun 2025 02:39 PM (IST)

    महाराष्ट्र राज्य सरकारच्या ई-कॅबिनेटला आजपासून सुरूवात

    महायुती राज्य सरकारमधील ई-कॅबिनेटला मंगळवारी (ता.24) सुरूवात करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आले आहे. बैठकीआधी अजेंडा बाहेर येऊ नये, म्हणून ई कॅबिनेटचा तोडगा काढण्यात आला आहे. आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीत मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आले.

  • 24 Jun 2025 01:56 PM (IST)

    24 Jun 2025 01:56 PM (IST)

    इस्रायलवरील हल्ल्यांदरम्यान इराणचा खळबळजनक दावा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा केली आहे. परंतु याला इराणने स्पष्ट नकार दिला असून असा कोणताही करार करण्यात आला नसल्याचे म्हटले आहे. तसेच या घोषणेनंतरही इस्रायल आणि इराणमध्ये क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरु आहे. आज (24 जून) सकाळी इराणने एकामागून एक तीन क्षेपणास्त्रे डागली आहेत. तसेच इस्रायलने देखील इराणवर तीव्र हल्ले केले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या एका वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. तसेच इस्रायलच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, इराणने बेअरशेबा येथे क्षेपणास्त्रे डागली असून यामध्ये तीन इस्रायलींचा मृत्यू झाला आहे.

  • 24 Jun 2025 01:20 PM (IST)

    24 Jun 2025 01:20 PM (IST)

    रिंकू सिंग आणि प्रिया सरोजचे लग्न कॅन्सल!

    रिंकू सिंग आणि प्रिया सरोजच्या लग्नाची तारिख पुढे ढकलली : भारताचा फलंदाज रिंकू सिंग याचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला. त्याने खासदार प्रिया सरोजसोबत नात्यात जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांचा साखरपुडा हा ८ जून रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन लखनऊच्या लक्झरी हॉटेलमध्ये करण्यात आले होते. त्यांच्या दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती, परंतु अचानक त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्यामुळे तयारी देखील थांबविण्यात आली आहे.

  • 24 Jun 2025 01:12 PM (IST)

    24 Jun 2025 01:12 PM (IST)

    ड्रग्ज खरेदी आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याला अटक

    दक्षिण इंडस्ट्रीमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तमिळ आणि तेलगू अभिनेता श्रीकांतला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्याचे हे संपूर्ण प्रकरण ड्रग्जशी संबंधित आहे. आजकाल दक्षिण इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जशी संबंधित प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या दक्षिण अभिनेत्याचे नाव ड्रग्जशी जोडले जाते आणि नंतर त्याला अटक केल्याचे समजले आहे. अशा परिस्थितीत, आता अभिनेता श्रीकांतशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की चेन्नई पोलिसांनी आज त्याला ड्रग्जशी संबंधित आरोपांवर अटक केली आहे.

  • 24 Jun 2025 01:03 PM (IST)

    24 Jun 2025 01:03 PM (IST)

    चंद्रभागेच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेले पाच भाविक बुडाले

    आषाढी यात्रेच्या सोहळ्यापूर्वीच पंढरपुरात वारकरी भाविकांची मोठी गर्दी वाढत असून, पंढरीत आलेला प्रत्येक भाविक प्रथम चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतो. सध्या धरण क्षेत्र व पुणे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने चंद्रभागेच्या पात्रात पाण्याची पातळी वाढलेली आहे. पात्रांमध्ये अनेक ठिकाणी खड्डे असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक भाविकांचा बुडून मृत्यू होत आहे.

  • 24 Jun 2025 12:53 PM (IST)

    24 Jun 2025 12:53 PM (IST)

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का

    हडपसरचे माजी शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांच्यासह माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नीलेश मगर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांचे माजी नगरसेवक योगेश ससाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षासह राष्ट्रवादींना मोठा धक्का बसणार आहे.

  • 24 Jun 2025 12:48 PM (IST)

    24 Jun 2025 12:48 PM (IST)

    भारतासाठी धोक्याची घंटा!

    सध्या जग अनेक आघाड्यांवर संघर्षात अडकलेला आहे. एकीकडे इराण-इस्रायल, दुसरीकडे युक्रेन-रशिया तर तिसरीकडे भारतासोबत चीन आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीच्या चर्चेवरुन वाद सुरु आहे. यामध्ये एक धक्कादायक माहितीचा खुलासा करण्यात आला आहे. पूर्ण लडाखमधील पॅंगोग तलावाजवळ चीनने आपली HQ-16 ही हवाई प्रणाली तैनात केली आहे. याच्या सॅटेलाईट्स छायाचित्र सध्या समोर आले आहे. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.

  • 24 Jun 2025 12:48 PM (IST)

    24 Jun 2025 12:48 PM (IST)

    राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट आरोप

    काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी फेरफार झाल्याचा आरोप करत आहेत. या सगळ्यात गेल्या आठवड्या केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेतील सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे, व्हिडीओ रेकॉर्डिंग्स  निकालानंतर ४५ दिवसात नष्ट करण्याचा निर्णय़ घेतला. आयोगाच्या या निर्णय़ावर राहुल गांधी यांनी पुन्हा संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत.

  • 24 Jun 2025 12:31 PM (IST)

    24 Jun 2025 12:31 PM (IST)

    Sanjay Kapur च्या कंपनीचा नवा चेअरपर्सन

    बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती आणि सोना कॉमस्टारचे दिवंगत अध्यक्ष संजय कपूर यांच्या निधनानंतर, कंपनीने त्यांचा उत्तराधिकारी निवडला आहे. सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड (सोना कॉमस्टार) ने जेफ्री मार्क ओव्हरली यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

  • 24 Jun 2025 12:30 PM (IST)

    24 Jun 2025 12:30 PM (IST)

    पंढरपूरच्या वारीबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांचा माफीनामा

    महाराष्ट्राचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी पंढरपूर वारी पालखीबाबत दिलेल्या विधानावर राजकारण तापले होते. भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांनीही अबू आझमी यांच्या विधानावर टीका केली. यानंतर आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी माफी मागितली. वाचा सविस्तर

  • 24 Jun 2025 12:25 PM (IST)

    24 Jun 2025 12:25 PM (IST)

    ‘Sardaar Ji 3’ वादावर दिलजीतने सोडले मौन

    दिलजीत दोसांझ त्याच्या आगामी ‘सरदारजी ३’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम करत आहे, जो वादाचा विषय बनला आहे. दरम्यान, त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने एका प्रोजेक्टला रिलीज होण्यापूर्वी सेन्सॉर करण्याबद्दल बोलले. अभिनेता लवकरच ‘सरदारजी ३’ हा चित्रपट परदेशात प्रदर्शित करणार आहे. याचबरोबर त्याचा ‘पंजाब ९५’ हा चित्रपट देखील चर्चेत आहे जो कधी रिलीज होणार हे अद्यापही समजलेले नाही. वाचा सविस्तर

  • 24 Jun 2025 12:17 PM (IST)

    24 Jun 2025 12:17 PM (IST)

    मुंबई,पुणे महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर पडणार

    राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारकडून महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीच्या आधी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आता मुंबई, ठाणे आणि पुण्याती महापालिका निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार नाहीत, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दिवाळीनंतरच होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 24 Jun 2025 12:15 PM (IST)

    24 Jun 2025 12:15 PM (IST)

    इंजेक्शन हल्ल्याने पॅरिस हादरले, १५० लोकांना संसर्ग झाल्याचा संशय

    पॅरिसमध्ये इंजेक्शन हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १५० लोकांवर संक्रमित इंजेक्शनने हल्ला करण्यात आला आहे. इंजेक्शनमध्ये ड्रग्ज भरल्याचा संशय आहे. हल्ल्याच्या संशयावरून १२ जणांना अटक करण्यात आली आहे. हा हल्ला एका संगीत महोत्सवात झाला.

  • 24 Jun 2025 12:15 PM (IST)

    24 Jun 2025 12:15 PM (IST)

    देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यांत 8 टक्के मतदार वाढले – राहुल गांधी यांचा आरोप

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मतदारसंघात 5 महिन्यांत 8 टक्के मतदार वाढले, ट्विट करत राहुल गांधी यांचा मोठा आरोप. निवडणूक आयोग गप्प का आहे, असा सवालही राहुल गांधींनी विचारला आहे.

  • 24 Jun 2025 12:10 PM (IST)

    24 Jun 2025 12:10 PM (IST)

    पंजाब:पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राजीनामा

    पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षाचे उमेदवार आणि पंजाब प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष भारत भूषण आशु यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

  • 24 Jun 2025 12:05 PM (IST)

    24 Jun 2025 12:05 PM (IST)

    इराणच्या धमकीनंतर कतारने आपले हवाई क्षेत्र बंद

    इराणने अमेरिकन हवाई तळावर हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर कतारने आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. दोहाला जाणारी डझनभर उड्डाणे वळवण्यात आली आहेत.

  • 24 Jun 2025 12:00 PM (IST)

    24 Jun 2025 12:00 PM (IST)

    रघुवंशी हत्या प्रकरण: पोलिसांनी इंदूरच्या फ्लॅट मालकाला अटक

    सोनम रघुवंशी तिच्या पतीची मधुचंद्रादरम्यान हत्या करून ईशान्येकडील राज्यात पळून गेल्याचा आरोप केल्यानंतर मेघालय पोलिसांनी सोमवारी इंदूरच्या फ्लॅट मालकाला अटक केली जिथे सोनम रघुवंशी राहत होती.

  • 24 Jun 2025 11:55 AM (IST)

    24 Jun 2025 11:55 AM (IST)

    इराणच्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील या 8 देशांमध्ये सायरन वाजले

    इराणच्या हल्ल्यानंतर बहरीन, कतार, युएई, सीरिया, इराक, जॉर्डन आणि सौदी अरेबियातील अमेरिकन तळांवर सायरन वाजत आहेत.

  • 24 Jun 2025 11:45 AM (IST)

    24 Jun 2025 11:45 AM (IST)

    तेहरानवर इस्रायलचा हल्ला सुरू

    इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचा प्रत्युत्तर सुरू झाला आहे. सध्या मध्य पूर्वेतील परिस्थिती खूप गंभीर आहे.

  • 24 Jun 2025 11:40 AM (IST)

    24 Jun 2025 11:40 AM (IST)

    डिक्सनपासून टाटा मोटर्सपर्यंत, ‘या’ स्टॉक्समध्ये दिसेल अ‍ॅक्शन!

    आजच्या व्यवहारात, विविध बातम्यांमुळे डिक्सन टेक्नॉलॉजीज, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन, टाटा मोटर्स, बेमको हायड्रॉलिक्स, अ‍ॅक्मी सोलर इत्यादींचे स्टॉक फोकसमध्ये असतील. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार अस्थिर राहिला आणि निर्देशांक अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरला. दरम्यान, डिक्सन टेक्नॉलॉजीज, सोना बीएलडब्ल्यू प्रेसिजन, टाटा मोटर्स, बेमको हायड्रॉलिक, अ‍ॅक्मी सोलर सारखे शेअर्स आज चर्चेत असतील, ज्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत.

    (सविस्तर बातमी)

  • 24 Jun 2025 11:35 AM (IST)

    24 Jun 2025 11:35 AM (IST)

    कतारमधील भारतीय दूतावासाने सूचना जारी

    कतारमधील इराणच्या हल्ल्याबाबत भारतीय दूतावासाने सूचना जारी केली आहे. भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 24 Jun 2025 11:25 AM (IST)

    24 Jun 2025 11:25 AM (IST)

    मध्य पूर्वेतील विमान उड्डाणांबाबत इंडिगोने सूचना जारी

    इंडिगोने मध्य पूर्वेतील विमान उड्डाणांबाबत प्रवास सूचना जारी केली. इंडिगोने म्हटले आहे की मध्य पूर्वेतील सध्याच्या परिस्थिती पाहता, आमच्या काही उड्डाणांना विलंब होऊ शकतो किंवा वळवता येऊ शकतो.

  • 24 Jun 2025 11:16 AM (IST)

    24 Jun 2025 11:16 AM (IST)

    इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे शेयर बाजारात दिलासा

    इराण-इस्रायल युद्धात युद्धबंदी झाल्यानंतर दलाल स्ट्रीटमध्ये खूप गोंधळ आहे. बाजारात सर्वत्र तेजी आहे. मिड कॅप, स्मॉल कॅप निर्देशांक देखील हिरव्या रंगात आहेत. बँक निफ्टी ते निफ्टी पर्यंतचे क्षेत्रीय निर्देशांक मिड स्मॉल आयटी आणि टेलिकॉम तेजीत आहेत. फक्त मीडिया निर्देशांक लाल रंगात आहे. पीएसयू बँका २ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. रिअल्टी, ऑटो, मेटल, वित्तीय सेवा १ टक्क्यांहून अधिक आहेत.

    (सविस्तर बातमी)

  • 24 Jun 2025 11:15 AM (IST)

    24 Jun 2025 11:15 AM (IST)

    जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी भरत प्रिये यांची नियुक्ती

    काँग्रेसने तात्काळ प्रभावाने किसान काँग्रेस, जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी भरत प्रिये यांची नियुक्ती केली आहे.

  • 24 Jun 2025 11:09 AM (IST)

    24 Jun 2025 11:09 AM (IST)

    इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर'सर्वांचे अभिनंदन! इस्रायल आणि इराणमध्ये 12 तासांसाठी पूर्ण आणि पूर्णपणे युद्धबंदीवर सहमती झाली आहे.' यानंतर युद्ध संपल्याचे मानले जाईल! अधिकृतपणे, इराण युद्धबंदी सुरू करेल आणि 12 व्या तासाला, इस्रायल युद्धबंदी सुरू करेल आणि 24 व्या तासाला, 12 दिवसांच्या युद्धाच्या अधिकृत समाप्तीला जगाकडून सलाम केला जाईल. इराणकडून युद्धबंदीचे एकमत नाही, तर इस्त्राइलकडून हल्ले सुरू आहेत.

  • 24 Jun 2025 11:05 AM (IST)

    24 Jun 2025 11:05 AM (IST)

    मानपाडा ते माजीवाडा मार्गावर वाहतूक कोंडी

    ठाण्याहून मुंबई- नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मानपाडा ते माजीवाडा मार्गावर गाडी बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक शाखेकडून बंद पडलेल्या गाडीला बाजूला करण्याचं काम सुरू आहे. सध्या वाहतूक धीम्या गतीने वाहतूक सुरु आहे.

  • 24 Jun 2025 11:01 AM (IST)

    24 Jun 2025 11:01 AM (IST)

    मंत्र्यांच्या PA आणि OSD बदल्याचे आदेश, महायुतीत नाराजीचं वातावरण

    राज्यातील महायुती सरकारमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांमध्ये अधूनमधून कुरबुरी समोर येत असतात. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कार्यालयातील स्वीय सहायक (PA) आणि विशेष कार्य अधिकारी (OSD) यांच्या नियुक्तीबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे महायुतीत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता मंत्र्यांच्या खासगी सचिवांना त्यांच्या मूळ विभागात परत जाण्याचे लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत. यापूर्वी संबंधित स्वीय सहाय्यकांना तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु त्या दुर्लक्षित केल्या गेल्या. आता मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने मूळ विभागात रुजू होण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

  • 24 Jun 2025 11:00 AM (IST)

    24 Jun 2025 11:00 AM (IST)

    संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

    बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात (Court) होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावरती आणि दोष मुक्तीच्या अर्जावरती विशेष सरकारी वकील उज्वल निकम आज युक्तिवाद करणार आहे.

Web Title: Marathi breaking news today live political sports crime national international breaking news 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • Maharashtra Breakig News

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: अमरावती एटीएस आणि ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई; ११ जण शस्त्रांसह जेरबंद
1

Top Marathi News Today Live: अमरावती एटीएस आणि ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई; ११ जण शस्त्रांसह जेरबंद

Top Marathi News Today: इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला; चार मृत, अनेक गंभीर
2

Top Marathi News Today: इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला; चार मृत, अनेक गंभीर

Top Marathi News Today: IG जालिंदर सुपेकरांचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढला
3

Top Marathi News Today: IG जालिंदर सुपेकरांचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.