मराठी ब्रेकिंग न्यूज
सिमेंट रस्त्यावरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील संतापले असून ‘भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर वन आहे’ असा आरोप केला आहे. मानपाडासह नेवाळी या ठिकाणचाही श्री मलंगगड रोड त्याचं काम तीन वर्षापूर्वी संपलं होतं, 45 कोटी त्यावर खर्च झाले. मात्र, आता पुन्हा त्याची निविदा निघत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्रात सगळ्यात मोठा कुठला घोटाळा सुरू असेल तर रस्ता घोटाळा सुरू आहे असा घणाघाती आरोप करत मेघा इंजीनियरिंगसंदर्भात कोणी हाऊस मध्ये नाव देखील काढलं नाही असंही त्यांनी म्हटले असून सर्वांचेच हात याच्यात रंगलेले असल्याचा आरोपदेखील केलाय.
22 Jul 2025 06:36 PM (IST)
नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करावं, अशी मागणी भाजपाच्याच एका आमदाराने केली आहे. उपराष्ट्रपतीपद बिहारला द्यावं, असं त्यांनी म्हटलंय. अशी मागणी करणाऱ्या भाजपा आमदाराचे नाव हरिभूषण ठाकूर बचौल असे आहे.
22 Jul 2025 05:36 PM (IST)
मुंबई: Devendra Fadnavis Birthday: आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी अनेक विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन केले. दरम्यान राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते मुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळचे महायुतीचे सहकारी असलेले उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
22 Jul 2025 05:23 PM (IST)
महायुती सरकारमधील शिवसेना मंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री नऊ वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर होणार आहे. पक्षांतर्गत शिस्त, महायुतीमधील सध्याच्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे हे मंत्र्यांना काही गोष्टी सांगणारही आहेत.
22 Jul 2025 05:05 PM (IST)
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर भारतीय जनता पक्षाने प्रथमच एकहाती सत्ता मिळविली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यतर्वी सहकारी बॅंकेच्या 21 पैकी 15संचालक हे भाजपचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रथमच बॅंकेवर वर्चस्व मिळविले आहे. आता आम्ही बॅंकेच्या 15 जागा जिंकल्या आहेत. आगामी काळात सर्वच्या सर्व 21 जागा आम्ही जिंकू असा दावाही बंटी भांगडीया यांनी केला आहे .
22 Jul 2025 05:00 PM (IST)
मुंब्रा , कौसा येथील कचरासमस्येने आता उग्र रूप धारण करू लागली आहे. गेल्या पाच दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी कचर्याने भरलेल्या पाच गाड्या थेट ठाणे महानगर पालिका मुख्यालयाच्या दिशेने वळविल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था करण्यात ठाणे पालिकेला यश येत नसल्याने येथील कचराच उचलला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील कचरा उचलावा, यासाठी अनेकवेळा संबधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या शानू पठाण यांनी नाक्यानाक्यावर कचरा भरून गाड्या ठामपाच्या दिशेने वळविल्या. या गाड्या ते ठामपा मुख्यालयासमोर रिकाम्या करणार होते. कौसा, अमृत नगर, रशीद कंपाउंड आदी भागातील कचरा त्यांनी मुख्यालयासमोर फेकण्याचा निर्धार केला होता. मात्र, पोलिसांनी गाड्या अडवून त्यांना ताब्यात घेतले.
22 Jul 2025 04:55 PM (IST)
खासदार सुनिल तटकरे यांच्या शिफारशीने सीआरएस फंडातून ११०० चौ.फूट बांधकाम करण्यात आले आहे. तालुका शहर हिंदु ग्रामस्थ मंडळाचे श्री राधा कृष्ण मंदिर सामाजिक सभागृह बांधकामाचे लोकार्पण राज्याच्या महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले.या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना श्री राधा कृष्ण,श्री रामभक्त हनुमान मंदीर सभागृह आपल्या सर्वांचे आस्थेचे आणि श्रद्धेचे स्थान आहे.मंदिरात पुजा करण्यासाठी आलेले भक्त देवदेवतांच्या प्रती प्रार्थना करीत असतात त्यांचे सेवे मधुन आम्हा सर्वांना बळ मिळावे. ईश्वर सेवा करताना ती त्यांनी मान्य करावी असे आदिती तटकरे यांनी साकडे घातले आहे.
22 Jul 2025 04:45 PM (IST)
डोंबिवलीत चेंबरमध्ये पडून ६० वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू प्रकरण. मयत वयोवृद्ध व्यक्ती भाजप कार्यकर्त्याचे वडील भाजपच्या नेत्यांकडून एमआयडीसीचे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.खरे तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे याप्रकरणी लवकरात लवकर गुन्हा दाखल करून संबंधितांवर तोच कारवाई झाली पाहिजे , अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केले. इतकेच नाही तर दीपेश म्हात्रे यांनी ट्विटच्या माध्यमातून मयत व्यक्तीला श्रद्धांजली व्यक्त करीत व्यंगचित्राद्वारे एका प्रकारे सत्ताधाऱ्यांना लक्ष केले.
22 Jul 2025 04:44 PM (IST)
Maharashtra Politics: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात ऑनलाईन रमी खेळताणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी देखील माणिकराव कोकाटे हे आपल्या विधानांमुळे कायमच चर्चेत आले आहेत. मी रमी खेळात नव्हतो तर, जाहिरात स्किप करत होतो असे, स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिले आहे. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन व्हिडीओ आणखी पोस्ट केले. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चारोळी लिहून त्यांनी कोकाटे यांच्यावर टीका केली आहे.
22 Jul 2025 04:35 PM (IST)
मराठी विरुद्ध अमराठी हा वाद पुन्हा एकदा एकाच्या जीवावर उठला आहे. कल्याण पूर्व नांदिवली परिसरात खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या महाराष्टीय तरुणीला काही अमराठी भाषिकानी बेदम मारहाण केली आहे. परप्रांतीय तरुणाने या मुलीला लाथाबुक्क्याने मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
22 Jul 2025 04:25 PM (IST)
ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राटदारांनी कामे केली आहेत. मात्र, त्यांना अद्याप त्यांची देयके दिली नाहीत. ही देयके तत्काळ अदा करावित, या मागणीसाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत राज्यातील कंत्राटदार कामे करीत असतात. मात्र, त्यांची सुमारे 90 हजार कोटी रूपयांची देयके रखडली आहेत. ही देयके अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे. आता या देयकांमध्ये जल जीवन मिशनच्या देयकांचाही समावेश झाला आहे. ही देयके तत्काळ देण्यात यावीत, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाचा निषेध केला. तसेच, हातात फलक घेऊन शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायच्या का? असा सवाल उपस्थित केला आहे.
22 Jul 2025 04:14 PM (IST)
दिरानगर येथील शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणा मुळे सातत्याने मुलांची मारामारी होऊन अनेक अपघात होत आहेत. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता देखील घसरली आहे.शाळा क्रमांक.२५ (मराठी) कुमार वंश कोकणे या विद्यार्थ्यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली आहे. या पूर्वी देखील हिंदी माध्यम शाळा क्रमांक ७१ येथे अपघात होऊन एका विध्यार्थी ला दुखापत झाली होती. नियमाप्रमाणे या शाळेतील सेवा १० वर्षे पूर्ण झाली की बदली झाली पाहिजे. परंतु शाळेत १४ वर्षांपासून बदली न झालेले शिक्षक शिक्षिका आहेत. ज्या शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे सातत्याने मुलांची मारामारी होऊन अपघात होत आहे. यामुळे नवी मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाचा शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन होत आहे.
22 Jul 2025 04:09 PM (IST)
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हे जोडणारा घोडगे-सोनवडे घाट लवकरच मार्गी लागणार आहे. मागील दहा वर्षात अडचण कशी होईल तेवढेच काम झाले . मात्र आता हे काम मार्गी लागणार आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर या घाटासंबंधी संबंधित विभागाच्या अनेक बैठक झाल्या आहेत. दिल्ली येथील वन्यजीव मंडळ, व्याघ्र प्रकल्प व पर्यावरण विभाग यांची त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्तरित्या बैठक घेऊन पाहणी दौरा झाला आहे. येत्या काही महिन्यात महिन्यात या कामाची सुरुवात करणार असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले आहे.
22 Jul 2025 04:07 PM (IST)
जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या प्रस्तावित तिसऱ्या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध उफाळून आला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा विरोध स्पष्टपणे मांडण्यात आला. या परिषदेसाठी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.संजय जांभळे यांनी सांगितले की, '२२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी ही कंपनीच्या जेट्टीपरिसरात ठेवण्यात आली आहे, जी अन्यायकारक आहे. जनतेच्या सोयीसाठी ही सुनावणी वडखळ येथील जय किसान हायस्कूल किंवा पेण येथील मैदानावर घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
22 Jul 2025 03:55 PM (IST)
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीचं कारण देत सोमवारी अचानक पदाचा राजीना दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारलेल्या धनखड यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता, मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या संवैधानिक पदासाठी नवीन नावाबाबत चर्चा सुरू झाली आहे. यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचंही नाव चर्चेत आहे.
22 Jul 2025 03:34 PM (IST)
सध्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे चांगलेच चर्चेत आले आहेत. विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. त्यानंतर मी जाहिरात स्किप करत होतो असे स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिले होते. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. दरम्यान यावर आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांना प्रत्युत्तर दिले. तेव्हा त्यांनी शेतकरी भिकारी नसून शासन भिकारी आहे एक विधान केले आहे. आता यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंचे कान टोचले आहेत.
22 Jul 2025 03:20 PM (IST)
भारत आणि श्रीलंकेची सागरी सीमा ही एक आंतरराष्ट्रीय सीमा आहे. यामुळे या आंतरराष्ट्रीय सीमेला परवानगीशिवाय ओलांडणे कायद्याने गुन्हा मानला जातो. दरम्यान तामिळनाडूतील रामेश्वरमच्या मच्छीमारांना मासेमारीसाठी ही आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडणे महागात पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय मच्छामारांना श्रीलंकेच्या नौदलाने आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेचे (IMBL) उल्लंघन केले आहे. यामुळे या मच्छामारांना श्रीलंकेने ताब्यात घेतले आहे.
22 Jul 2025 03:11 PM (IST)
पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. यानुसार खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठा हा २२.९७ टीएमसी इतका झाला आहे. पाणीसाठ्याचे हे प्रमाण ७८.७७ टक्के इतके आहे. खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०.०४ टीएमसी इतका जास्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याच्या चिंतेतून आता किमान वर्षभर सुटका झाली आहे.
22 Jul 2025 03:04 PM (IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात वाद होता. त्या वादात मदत मिळावी, यासाठी संबंधित महिला ही किरण काळे यांच्या संपर्कात आली होती. पीडित महिलेला मदतीचे आमिष दाखवून शहरप्रमुख किरण काळे यांनी बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
22 Jul 2025 03:00 PM (IST)
बीड जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी आहे. जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. या आरोपांमधून दोषमुक्तीसाठी न्यायालयात केलेला विनंती अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. बीड सत्र न्यायालयाने हा अर्ज दिला आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
22 Jul 2025 02:31 PM (IST)
मुंबई: राज्यात गेले काही दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मुंबई आणि उपनगरात पाऊस दरम्यान हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारच्या पावसाचा अंदाज दिला आहे, याबाबत जाणून घेऊयात.
22 Jul 2025 02:26 PM (IST)
नागपूर : मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचा विषय चर्चेत आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 75 ची शाल अंगावर आल्यानंतर दुसऱ्यांकडे नेतृत्व सोपवावे असे सूचक विधान केले होते. यावरुन खासदार संजय राऊत यांनी आरएसएस पंतप्रधान मोदी यांना निवृत्तीची आठवण करुन देत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावरुन आता भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
22 Jul 2025 02:26 PM (IST)
भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ने अलिकडेच त्यांच्या तिमाही निकालांनी गुंतवणूकदारांना निराश केले. निकाल अपेक्षेपेक्षा कमी होते, ज्यामुळे सोमवारी कंपनीचे शेअर्स घसरले. कंपनीचे शेअर्स मार्चच्या नीचांकी पातळीपेक्षा २५% ने वाढले होते, परंतु त्यानंतर विक्रीचा दबाव दिसून आला. तथापि, अनेक मोठ्या ब्रोकरेज हाऊसेस अजूनही रिलायन्सबद्दल आशावादी आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की कंपनीकडे प्रचंड वाढीची क्षमता आहे जी येत्या काही महिन्यांत कंपनीसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
22 Jul 2025 02:25 PM (IST)
टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला, ज्यामुळे सामना रद्द करण्यात आला. त्याच वेळी, आशिया कप २०२५ देखील धोक्यात आला आहे. आता असे वृत्त येत आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ऑलिंपिकमध्येही खेळला जाणार नाही. ऑलिंपिक २०२८ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे, ज्यामध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे.
22 Jul 2025 02:25 PM (IST)
ट्विंकल खन्ना आणि काजोल 'टू मच' हा एक नवीन टॉक शो घेऊन परतल्या आहेत. या दोघीनी केमिस्ट्री चाहत्यांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. शोची अधिकृत घोषणा काही काळापूर्वी सोशल मीडियावर करण्यात आली आहे. या शोमध्ये ट्विंकल आणि काजोलला एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या नव्याकोऱ्या शोमध्ये काय काय घडते हे पाहण्यासाठी ते आतुर आहेत. नुकतेच या शो चे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे जे पाहून चकीत झाले आहेत.
22 Jul 2025 02:08 PM (IST)
रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विरोधकांच्या रडारवर आहेत. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाला कोकाटे उपस्थित होते, यावेळी हा प्रकार घडला. कोकाटे यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी वेळ नाही म्हणून आम्ही त्यांना रमी खेळण्यासाठी बोलावत होतो अशी प्रतिक्रिया यावी पत्ते उधळणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
22 Jul 2025 02:04 PM (IST)
इस्लामाबाद : पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलुचिस्तान प्रातांत एक ऑनर किलिंगचा प्रकार घडला आहे. एका महिला आणि पुरुषाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२५ मध्ये बलुचिस्तानच्या राजधानी क्वेटाजवळ ही घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभर संतापाचे वातावरण पसरले आहे.
22 Jul 2025 02:04 PM (IST)
दीर्घकाळ निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहार, शरीरास आवश्यक असलेली पुरेशी झोप, शारीरिक हालचाली, भरपूर पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टी योग्यरित्या फॉलो करणे आवश्यक असते. पण हल्ली बदलेल्या जीवनशैलीमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. लिव्हर अन्नपदार्थ पचवणे, विषारी पदार्थ बाहेर काढून टाकणे, शरीर कायमच स्वच्छ ठेवणे इत्यादी महत्वपूर्ण कामे करते. पण लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर हळूहळू लिव्हरमध्ये हानिकारक पेशी वाढू लागतात. फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस बी किंवा मद्यपान इत्यादी गोष्टींमुळे लिव्हर आतून पूर्णपणे सडून जाते.
22 Jul 2025 01:50 PM (IST)
आजच्या काळात लोकं स्वतः मेहनत करून कंटेंट लिहिण्यापेक्षा AI ची मदत घेतात. ChatGPT सारख्या AI टूल्स च्या मदतीने तुम्ही कोणत्याही विषयावरील माहिती शोधू शकता. विशेषतः शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी या AI टूल्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ज्यामुळे त्यांना एक प्रोफेशनल आणि चांगला कंटेंट मिळतो. पण यामुळे एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. कंटेंट AI ने लिहिला आहे की त्या व्यक्तीने, हे समजणं फार कठीण आहे. सध्या ही समस्या शाळा, कॉलेज आणि अनेक कपन्यांमध्ये आहे.
22 Jul 2025 01:50 PM (IST)
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेचा चौथा सामना 23 जुलै रोजी खेळवला जाणार आहे हा सामना भारतीय संघाला या मालिकेमध्ये टिकुन राहण्यासाठी फारच महत्वाचा आहे. भारताच्या संघाच्या हातात असलेला लाॅर्ड्स कसोटी सामन्यात भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती पण शेवटच्या ओव्हरमध्ये भारताच्या फलंदाजांनी फारच निराशाजनक कामगिरी केली होती. रविंद्र जडेजा याने भारतीय संघासाठी तिसऱ्या सामन्यात कमालीची कामगिरी केली होती पण तो भारताच्या संघाला विजयापर्यत नेण्यात अपयशी ठरला. इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे परंतु भारतीय संघ सामन्याच्या दिवशीच जाहीर केला जाईल.
22 Jul 2025 01:40 PM (IST)
‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ हा प्रसिद्ध टीव्ही शो तुमचे मनोरंजन करण्यासाठी परत येत आहे. या शोच्या माध्यमातून स्मृती इराणी तुलसीच्या भूमिकेने घराघरात प्रसिद्ध झाली आहे. शोबद्दल स्मृती म्हणते की, हा शो परत आणण्याचा उद्देश प्रेक्षकांचे प्रेम परत मिळवणे आणि जुन्या भावनांना पुन्हा जिवंत करणे आहे. तसेच हा शो पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.जुन्या काळात जे सामान्य नव्हते, त्या काळात मुख्य भूमिकेत महिला पात्र आणून बदल घडवून आणल्याबद्दल स्मृतीने निर्माती एकता कपूरचे देखील कौतुक केले.
22 Jul 2025 01:35 PM (IST)
शक्तिपीठाच्या समर्थनार्थ आंदोलन करा, या महामार्गाला पाठिंबा द्या. यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक आहे, असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी केला. जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आमदार सतेज पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधान केले.विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना, गोकुळचा कारभार वाढल्यानेच संचालक संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यानी सांगितले. गोकूळची उलाढाल ४ हजार कोटींवर गेली आहे. जनावरांची संख्या वाढली आहे.
22 Jul 2025 01:25 PM (IST)
बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये एक मोठा विमान अपघात घडला असून या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ढाकामध्ये बांगलादेशच्या एअरफोर्सचे F7 एअरक्राफ्ट उत्तरी भागात असलेल्या एका शाळेच्या परिसरात कोसळले आणि भीषण आग लागली. या अपघातानंतर संपूर्ण देशात दु:खाचे वातावरण पसरले आहे. सरकारने एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर केला आहे. दरम्यान या अपघातातील मृतांच्या आकड्यात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
22 Jul 2025 01:25 PM (IST)
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यानंतर ते सध्या चर्चेत आहेत. धनखड हे त्या सर्व तरुणांसाठी एक उदाहरण आहेत जे गावात राहतात आणि मोठी स्वप्ने पाहतात. धनखड हे अशा तरुणांपैकी एक आहेत जे एका लहान गावातून येतात आणि आपल्या कठोर परिश्रम आणि शिक्षणाद्वारे मोठी उंची गाठतात. सैनिक शाळेत शिक्षण घेतलेले धनखड देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे संवैधानिक पद कसे गाठले ते आपण तुम्हाला सांगूया. त्यांचे शिक्षण आणि राजकीय प्रवास दोन्ही प्रेरणादायी आहेत, जाणून घ्या
22 Jul 2025 01:15 PM (IST)
राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून क्राउड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरिब आणि गरजू रूग्णांना उपचार देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ‘त्रिपक्षीय सामंजस्य करार आणि क्राउड फंडिंग’ या दोन आर्थिक मदतीच्या संकल्पनांवर आधारित ही मदत देण्यात येणार आहे. त्यात कॉर्पोरेट कंपन्या, दाते आणि रुग्णालये यांचे सहकार्य रूग्णांना मिळणार असून, त्यातून हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
22 Jul 2025 01:01 PM (IST)
बॉलीवूडचा अॅक्शन हिरो अजय देवगण पुन्हा एकदा धमाल करण्यास सज्ज झाला आहे. ‘सन ऑफ सरदार २’ चा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि यावेळी ट्रेलर विनोदी, भावनिक नाट्य आणि अनेक विनोदी परिस्थितींनी भरलेला आहे. ट्रेलरद्वारे चित्रपटाची नवीन रिलीज तारीख म्हणजेच १ ऑगस्ट देखील निश्चित करण्यात आली आहे. चित्रपटाच्या या नव्या ट्रेलरने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की जस्सीची कहाणी लग्नापासून सुरू होते, ज्याची भूमिका अजय देवगण साकारत आहे. त्याची वधू नीरू बाजवा आहे. पण लग्नानंतर जस्सीचे आयुष्य सोपे नसते.
22 Jul 2025 12:56 PM (IST)
उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्या राजीनाम्याने संसदेत गोंधळ माजला असून दोन्ही सभागृहं 12 पर्यंत तहकूब करण्यात आली आहेत. जगदीप धनगड यांच्या राजीनाम्याने दोन्ही सभागृहात विरोधकांनी सवाल उपस्थित केले .
22 Jul 2025 12:47 PM (IST)
माणिकराव कोकाटेंकडे प्रश्नाची उत्तर नव्हती. कोकाटेंना तर धड बोलताही येत नव्हतं असं अंजली दमानिया म्हणाल्या. माणिकराव कोकांटेनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर होत असलेल्या ऑनलाइन रमी खेळण्याच्या आरोपावर स्पष्टीकरण दिलं.
22 Jul 2025 12:35 PM (IST)
नालासोपाराच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद कंटेनर वाहत आला आहे. मालवाहतूक करणाऱ्या जहाजामधून तो समुद्रात पडला असावा आणि तो वाहत आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सध्या कंटेनरमध्ये प्रथमदर्शनी त्यात वॉल पेपर असल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांनी त्याचा पंचनामा करून तो पूर्ण खोलल्या नंतरच त्यात नेमके काय आहे हे समजणार आहे.
22 Jul 2025 12:28 PM (IST)
आपल्या प्रकृतीचे कारण देत जगदीश धनखड यांनी सोमवारी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी कोण विराजमान होईल याची चर्चा सुरु झाली आहे.
22 Jul 2025 12:15 PM (IST)
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शासकीय निवासस्थानाच्या बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्त.
22 Jul 2025 12:05 PM (IST)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे सादर केला आहे. मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे सादर केले आहेत. सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्याला विरोध केला. आरोपींच्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.
22 Jul 2025 11:55 AM (IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आज दुपारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलवली आहे. पक्षसंघटना, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
22 Jul 2025 11:45 AM (IST)
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिम कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कराडला बेल मिळणार की आणखी जेलची हवा खावी लागणार याचा फैसला आज होणार आहे. कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जासह प्रॉपर्टी जप्तीच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
22 Jul 2025 11:35 AM (IST)
पुरामुळे जिल्ह्यातील रिसोड – मेहकर,करडा – गोभणी, सरपखेड – धोडप बुद्रुक हे मार्ग झाले बंद… तिन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प… नदी काठावरील गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
22 Jul 2025 11:25 AM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुहित जीवन ट्रस्ट दिव्यांग मुलांची शाळा, पेण, रायगड येथील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार व्यक्त केले
22 Jul 2025 11:25 AM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस असून राज्यासह देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
Wishing Deputy Chief Minister of Maharashtra @AjitPawarSpeaks Dada Happy Birthday. Have a Healthy Year Ahead! pic.twitter.com/wvoyQIfHGe
— Supriya Sule (@supriya_sule) July 22, 2025
22 Jul 2025 11:20 AM (IST)
22 जुलै रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,016 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,181 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,512 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,810 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,160 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,120 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 115.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,15,900 रुपये आहे.
22 Jul 2025 11:15 AM (IST)
टेक कंपनी Vivo ने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G या नावाने लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने लाँच केलेले हे दोन्ही स्मार्टफोन Y सीरीजचा भाग आहेत. या दोन्ही डिव्हाईसचे डिझाईन जवळजवळ सारखेच आहे आणि त्यांची वैशिष्ट्ये देखील सारखीच आहेत परंतु एकमेव मोठा फरक मेमरीचा आहे. दोन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत.
22 Jul 2025 11:14 AM (IST)
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत मला रमी खेळता येत नाही असं स्पष्ट करत जर तो व्हिडिओ खरा असेल तर मी स्वत: राजीनामा देईन असं म्हटलं आहे. शिवाय हा छोटा प्रश्न असू त्यामध्ये राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
22 Jul 2025 11:10 AM (IST)
लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Oppo ने त्यांची नवीन आणि बहुप्रतिक्षित K13 Turbo सिरीज सोमवारी चीनमध्ये लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने Oppo K13 Turbo आणि K13 Turbo Pro असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. दोन्ही फोनमध्ये अनोखे डिझाईन आणि वेगवेगळे पावरफुल फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, या स्मार्टफोनची किंमत देखील बजेट रेंजमध्ये आहे. त्यामुळे जे लोकं नवीन आणि बजेट स्मार्टफोन शोधत आहेत, ज्यांना कूल डिझाईन पाहिजे आहे, त्या सर्वांसाठी हा स्मार्टफोन बेस्ट आहे.