Top Marathi News Today Live:
Marathi Breaking news live updates : राज्यासह देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यात कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. जानेवारी २०२५ पासून १२ हजार ११ रुग्णांची कोविड चाचणी केली असून, त्यापैकी ८७३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जानेवारी २०२५ पासून मुंबईमधील एकूण रुग्णसंख्या ४८३ (जानेवारी १, फेब्रुवारी १, मार्च-०, एप्रिल-४, मे- ४७७) असल्याचे दिसून आले.
05 Jun 2025 05:46 PM (IST)
मुंबई: चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रेल्वे स्थानकावरील एका केकच्या दुकानात शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे आग लागली असल्याची प्राथमिक बातमी समोर येत आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांची आणि रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.
05 Jun 2025 04:49 PM (IST)
Russia vs Ukraine: गेलया अनेक वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण स्वरूपाचे युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध हे दिवसेंदिवस अत्यंत तीव्र आणि भयानक होत चालले आहे. नुकताच रशियाने युक्रेनवर भीषण हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनच्या उत्तर भागातील प्रिलुकी शहराला लक्ष्य केले. यामध्ये युक्रेनचे खूप नुकसान झाले आहे.
05 Jun 2025 04:19 PM (IST)
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सदैव विरोध करणारे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना आता उपनेता पदावर बढती देण्यात आली आहे. त्यांच्यावर रावेर लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे.
05 Jun 2025 03:47 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर: आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीं ऑपरेशन टायगर, सामनावरील नाराजी, दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर भाष्य केले आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. यावेळी शिरसाट म्हणाले, " सामनामध्ये जे काही लिहिले आहे, त्याचा अर्थ सर्व काही उलट होणार असा आहे. गेल्या अडीच वर्षात सामनामध्ये लिहिलेले खरे झाले हे दाखवून द्यावे. त्यामुळे शुभ बोल रे नाऱ्या असे याला म्हणावे लागेल."
05 Jun 2025 03:21 PM (IST)
उद्या शुक्रवारी ईद-उल-अजहा साजरी केली जाईल, त्यामुळे उद्या बँका सुरू असतील की बंद? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडर नुसार उद्या 6 जून रोजी केरळमधील कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँका बंद राहतील. इतर सर्व राज्यांमध्ये बँका खुल्या राहतील, मात्र 7 आणि 8 जून रोजी सर्व राज्यात बँका बंद असतील.
05 Jun 2025 03:13 PM (IST)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (5 जून) 'समृद्धी महामार्ग' (मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे) च्या शेवटच्या टप्प्याचे थाटात उद्धघाटन झाले. या महामार्गातील 76 किमी लांबीच्या भागाचे (इगतपुरी-आमाणे) उद्घाटन झाले.
05 Jun 2025 03:12 PM (IST)
सध्या कोकणात विरोधातील राजकीय पक्षांना गळती लागली आहे. विशेष: रत्नागिरी जिल्ह्यात. याआधी ठाकरे गटाला येथे गळती लागली होती. ती अद्याप थांबलेली नसतानाच आता मनसे समोर पक्षातील खदखद चिंतेचा विषय बनला आहे. येथे राज ठाकरेंचे शिलेदार वैभव खेडेकर पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. पण त्याआधी त्यांनी राज ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितली आहे. पण राज ठाकरे त्यांना वेळ देतात का? याची उत्सुकता येथे लागली आहे.
05 Jun 2025 02:49 PM (IST)
अहिल्यानगर शहरातील लेंडकर मळा या ठिकाणी अशोक चिपाडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये गाईचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज असून पहाटे शेतकरी अशोक चिपाडे हे गोठ्यामध्ये आले तेव्हा त्यांना गाई मृत अवस्थेत दिसली. त्यानंतर त्यांनी वन विभागाशी संपर्क केल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
05 Jun 2025 02:47 PM (IST)
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीवर मनसे नेते अविनाश जाधव यांचे मोठे विधान केले आहे. उद्धव साहेबांकडे राज साहेबांचा नंबर आहे फक्त एक फोन करावा आम्ही तयार आहोत.मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही कोणताही पाऊल उचलायला तयार आहोत. असं वक्तव्य अविनाश जाधव यांनी केलं आहे.
05 Jun 2025 02:43 PM (IST)
घनकचरा शुल्क वाढ संदर्भात भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी जी भूमिका घेतली आहे. त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. आमच्या मागणीसाठी त्यांनी शेवटपर्यंत या भूमिकेवर ठाम रहावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.
05 Jun 2025 02:43 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणेपर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उदघाटन आज झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री होते. आता मुंबई ते नागपूरदरम्यानचा हा मार्ग पूर्ण झाला असून केवळ आठ तासांचा हा प्रवास असणार आहे. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारमधून महामार्गावर प्रवास केला. एकनाथ शिंदे यांच्या हाती कारचे स्टेअरिंग होते.
05 Jun 2025 01:53 PM (IST)
ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजच्या “टॉप कन्व्हिक्शन आयडियाज – मेटल अँड मायनिंग” या ताज्या अहवालात म्हटले आहे की जागतिक तणाव आणि अनिश्चितता असूनही हे क्षेत्र सतत ताकद दाखवत आहे. अहवालात गुंतवणूकदारांना या क्षेत्रात “बाय ऑन डिप” धोरण स्वीकारण्याचा सल्ला देण्यात आला आहे, म्हणजेच जेव्हा शेअर घसरत असेल तेव्हा खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. विशेषतः जेव्हा दीर्घकालीन विचार केला जातो तेव्हा हे क्षेत्र चांगल्या संधी देऊ शकते.
05 Jun 2025 01:34 PM (IST)
आयपीएल 2025 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बेंगळुरूहून मुंबईत दाखल झाले आहे. एअरपोर्टवर हे जोडपे दिसून आले.
#WATCH | Virat Kohli and Anushka Sharma arrive in Mumbai from Bengaluru pic.twitter.com/SK5ioh6CzC
— ANI (@ANI) June 5, 2025
05 Jun 2025 01:03 PM (IST)
शेअर बाजार जोरात सुरू आहे. सेन्सेक्स ३७७ अंकांच्या वाढीसह ८१३७५ च्या पातळीवर पोहोचला. तर, शतकाचा टप्पा ओलांडल्यानंतर निफ्टी ११४ अंकांच्या वाढीसह २४७३५ वर होता. इटरनलच्या काउंटरवर मोठी खरेदी नोंदवली जात आहे. सेन्सेक्समध्ये ४.६४ टक्क्यांच्या वाढीसह हा सर्वात जास्त वाढणारा शेअर आहे. तर, मारुती सुमारे एक टक्क्याच्या नुकसानासह सर्वात जास्त तोटा सहन करणारा शेअर ठरला आहे.
05 Jun 2025 12:47 PM (IST)
मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. आता सरकारकडून मदतीचे वाटप सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 4. 23 कोटी केले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे जमा केले जाणार अवकाळीचा फटका तब्बल 7 हजार 661 शेतकऱ्यांना बसला आहे.
05 Jun 2025 12:34 PM (IST)
ट्रान्सफॉर्मर उत्पादक कंपनी सिलचर टेक्नॉलॉजीज लिमिटेड त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक २ शेअर्ससाठी एक बोनस शेअर मोफत देत आहे. कंपनीने जानेवारी-मार्च तिमाहीच्या निकालांसह लाभांश आणि बोनस शेअर्सची घोषणा केली होती. कंपनीने २:१ च्या गुणोत्तरासह त्यांच्या बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड डेट अंतिम केली आहे. सिलचर टेक्नॉलॉजीजने २९ मे रोजी एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवार, ६ जून २०२५ ही ‘रेकॉर्ड डेट’ म्हणून निश्चित केली आहे. या रेकॉर्ड डेटचा उद्देश कंपनीच्या बोनस इक्विटी शेअर्ससाठी पात्र असलेल्या भागधारकांना अंतिम रूप देणे आहे.”
05 Jun 2025 12:32 PM (IST)
तुम्हाला आठवतंय का लोकप्रिय AI आणि टेक कंपनी ओपनएआयमध्ये 2023 साली एक प्रसंग घडला होता. कंपनीने अचानक OpenAI चे CEO सॅम ऑल्टमॅन यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं आणि त्यानंतर 5 दिवसांनी पुन्हा बोलावलं होतं. या घटनेची चर्चा संपूर्ण जगभरात सुरु होती. या प्रसंगला अनेकांनी ड्रामा म्हटलं होतं. पण आता याच ड्राम्यावर एक चित्रपट तयार केला जाणार आहे. द हॉलीवुड रिपोर्टरने दिलेल्या माहितीनुसार, ओपनएआय आणि सॅम ऑल्टमॅन यांच्यामध्ये घडलेल्या प्रसंगांवर हा चित्रपट आधारित असणार आहे. या चित्रपटाचं नाव आर्टिफिशियल असणार आहे. Amazon MGM Studios द्वारे हा चित्रपट तयार केला जात आहे. आगामी चित्रपट 2023 च्या त्या नाट्यमय दिवसांची कहाणी सांगेल जेव्हा तंत्रज्ञान जग पूर्णपणे हादरले होते.
05 Jun 2025 12:28 PM (IST)
ZR2 बायोएनर्जी लिमिटेड ने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांवरून असे दिसून येते की कंपनीच्या आर्थिक स्थितीत मोठा आणि चांगला बदल झाला आहे. शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था SEBI च्या नियमांनुसार प्रसिद्ध झालेल्या या अहवालांमध्ये कंपनीच्या उत्पन्नात (महसूल) आणि तिच्या एकूण मालमत्तेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. हा अहवाल केवळ कंपनी आपले काम किती चांगले करत आहे हे सांगत नाही तर तिने आपल्या पैशाचे व्यवस्थापन किती सुज्ञपणे केले आहे हे देखील दर्शवितो. कंपनीने अलीकडेच काही नवीन गोष्टी खरेदी केल्या आहेत आणि नवीन सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवले आहेत, ज्यामुळे भविष्यासाठी एक मजबूत पाया रचला गेला आहे. ही माहिती गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाची आहे.
05 Jun 2025 12:14 PM (IST)
आज जगभरामध्ये पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले जात असून जनजागृती केली जात आहे. यंदाच्या पर्यावरण दिनी 'एक पेड़ मां के नाम' उपक्रम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत.
Today, on #WorldEnvironmentDay, we strengthened the #EkPedMaaKeNaam initiative with a special tree plantation drive. I planted a sapling at the Bhagwan Mahavir Vanasthali Park in Delhi. This is also a part of our effort to reforest the Aravalli range - the Aravalli Green Wall… pic.twitter.com/6mwbkQukPv
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2025
05 Jun 2025 12:11 PM (IST)
1971 च्या युद्धावेळी शहीद झालेल्या जवानांच्या माता-भगिनींनी दिलेल्या सिंदूर झाडाचे वृक्षारोपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान आवास आवारामध्ये हे झाड मोदींनी लावले आहे.
1971 के युद्ध में साहस और पराक्रम की अद्भुत मिसाल पेश करने वाली कच्छ की वीरांगना माताओं-बहनों ने हाल ही में गुजरात के दौरे पर मुझे सिंदूर का पौधा भेंट किया था। विश्व पर्यावरण दिवस पर आज मुझे उस पौधे को नई दिल्ली के प्रधानमंत्री आवास में लगाने का सौभाग्य मिला है। यह पौधा हमारे देश… pic.twitter.com/GsHCCNBUVp
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2025
05 Jun 2025 11:56 AM (IST)
दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडचा पहिला भाग ११ मार्च २०२४ रोजी आणि दुसरा भाग २६ जानेवारी २०२५ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुंबई सागरी किनारा मार्गावर सध्या वेगमर्यादा नसली, तरी वेगावन वाहनांवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे नाहीत. बराच काळ लोटल्यानंतरही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अद्याप (BMC) कोस्टल रोडवर स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवू शकलेली नाही. बीएमसीने कोस्टल रोडवर ८ ठिकाणी २८ स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवण्याची योजना आखली होती, परंतु हे अद्याप बसवले गेले नाहीत. त्याच वेळी, अतिवेगामुळे कोस्टल रोडवर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यूही झाला आहे.
05 Jun 2025 11:44 AM (IST)
सुंदर पिचाई पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेचं कारण आहे सुंदर पिचाई यांचं शेड्यूल. पिचाई यांनी त्यांच्या पर्सनल लाइफ आणि डेली रूटीनबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान या सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत. शिवाय यावेळी त्यांनी बदलत्या टेक इंडस्ट्रीबाबत देखील सांगितलं. या मुलाखतीमध्ये पिचाई यांना विचारण्यात आलं होतं की, त्यांच्या बिझी शेड्युलमधून ते झोपेसाठी वेळ कसा काढतात. या प्रश्नाचं उत्तर देताना पिचाई यांनी म्हटलं होतं की, ‘झोप अत्यंत महत्त्वाची आहे. मी प्रयत्न करतो की रोज कमीत कमी 6 तास तरी झोपू शकेन.’ त्यांनी म्हटलं की, ते किमान 6 तासांची झोप घेतात.
05 Jun 2025 11:34 AM (IST)
राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांशी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आहे. नागपूर ते मुंबई अशा महामार्गाचे काम पूर्ण झाले.
05 Jun 2025 11:17 AM (IST)
अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यात आले असून मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार सजत आहे. यामध्ये श्रीरामांची मूर्ती ही राजाच्या स्वरुपामध्ये असणार असून याचबरोबर सीता, लक्ष्मण, भरत आणि हनुमानाच्या देखील मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
05 Jun 2025 11:16 AM (IST)
5 जून रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,918 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,091 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,439 रुपये आहे. 4 जून रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,907 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,081 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,431 रुपये होता. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,910 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,180 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,390 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 102.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,02,100 रुपये आहे.
05 Jun 2025 11:15 AM (IST)
महाराष्ट्रातील बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज (5 जून) उद्धाटन होणार आहे. इगतपुरी ते आमने हा शेवटचा 76 किमीचा टप्पा आज प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवास सुलभ करण्यासाठी बांधलेल्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करतील. यामध्ये, महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. इगतपुरी आणि ठाणे दरम्यानचा ७६ किमी लांबीचा हा शेवटचा टप्पा वाहनांसाठी खुला करण्यात येणार असून मुंबई ते नागपूर प्रवास ७ ते ८ तासांत पूर्ण करता येईल. हा रस्ता पर्वातून बांधकाम करत देशातील सर्वात हाय-टेक महामार्ग म्हणून बांधण्यात आला आहे.
05 Jun 2025 11:15 AM (IST)
iPhone आणि iPad युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने काही iPhone आणि iPad मॉडेल्सची यादी जारी केली आहे आणि सांगितलं आहे की, यादीमधील iPhone आणि iPad वर आता व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब सपोर्ट करणार नाही. लेटेस्ट YouTube वर्जन 20.22.1 आता iOS 16 किंवा त्यांच्या नंतरच्या वर्जनला सपोर्ट करणार आहे. यामुळे आता iOS 15 पर्यंत मर्यादित असलेल्या Apple डिव्हाइसेसवर YouTube सपोर्ट करणार नाही.
05 Jun 2025 11:14 AM (IST)
दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2025 च्या पर्यावरण दिनाची थीम एंड प्लास्टिक पॉल्यूशन अशी ठेवण्यात आली आहे. आजच्या काळात आपण तंत्रज्ञानाने जोडलेले आहोत. स्मार्टफोनपासून टिव्हीपर्यंत आणि ऑनलाईन पेमेंटपासून ऑफीसच्या कामापर्यंत सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पण या तंत्रज्ञानाच्या जगात देखील आपण पर्यावरण आणि पृथ्वी वाचवण्यासाठी मदत करू शकतो. यासाठी आपल्याला काही छोटे छोटे बदल आत्मसात करावे लागणार आहेत. वाचा संपूर्ण बातमी
05 Jun 2025 11:12 AM (IST)
लवकरच मुंबई महानगर पालिकेची निवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गट तयारी लागला आहे. युवानेते आदित्य ठाकरे यांनी जनसामान्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
05 Jun 2025 11:11 AM (IST)
नाशिकच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना पक्षविरोधी भूमिका आणि संशयास्पद वागणूकीमुळे पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर आता दत्ता गायकडवाड यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.