नालंदा येथील शीतळा देवी मंदिरामध्ये भाविकांची चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत किमान आठ महिलांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
महाबळेश्वर तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील २७० अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून संबंधितांनी सात दिवसांच्या आत बांधकामे काढून टाकावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.
गुढीपाडवा आणि अनेक सणांच्या मुहूर्तावर भेसळयुक्त मिठाई बाजारामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागिरकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. याच्या निषेधार्थ पाचगणीमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी याला पूर्ण पाठिंबा दिला.
अनेक प्रवासी हे रेल्वेचा प्रवास विनातिकीट करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान होत आहे. यावर नांदेड विभागामध्ये कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसुल केला.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या आशुतोष ब्रह्मचारींवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे.
Rameshwaram Cafe Encroachment : विमाननगरमध्ये असणाऱ्या रामेश्वरम कॅफेवर पुणे महापालिकेने अतिक्रमण कारवाई केली आहे. यामध्ये कॅफे समोरील भागावरील अतिक्रमणाची तोडफोड करण्यात आली आहे.
सुमारे ३० लाख रुपयांच्या पाणीपट्टी थकबाकीमुळे सलग चौथ्या दिवशी पाणीपुरवठा ठप्प झाला असून जिगळा तळ्यावर सील ठोकताच शहराचा मुख्य पाणीस्त्रोत बंद पडला आहे.
वाई येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचा सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास माने बोलत होते.
जलसंपदा विभागातील १४ हजार ५१ पदांचा समावेश करण्यात येणार नाहे. या विभागात असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे
सामान्य नागरिकांना विधीचे ज्ञान व्हावे आणि कायदेशीर हक्कांच्या जाणीव व्हाव्यात या हेतूने वाई येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता.
माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, राजस्थानमध्ये याबाबत त्यांनी वक्तव्य केले असून मी आजारी नव्हतो अशी कबुली जगदीप धनखड यांनी दिली आहे.
नाशिक येथील ताज गेटवे आयोजित 'गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह'चे उद्घाटन केले. यावेळी शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.
मुख्य रेल्वे स्थानकावर तिकीट आरक्षण प्रक्रियेत गंभीर अनियमितता सुरू असल्याची चर्चा प्रवाशांत रंगू लागली आहे. रेल्वेच्या तिकीटांमध्ये दलाली केली जात असल्याचे धक्कादायक बाब समोर येत आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडून दिले जाणारे परीक्षांचे प्रशिक्षण गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असल्याने मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुरेश गवळी यांची झालेली तडकाफडकी बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. यामध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या सुमारे ४७५ विद्यार्थ्यांनी केले.
Nanded News : जायकवाडी पाटबंधारे उपविभागात काम बंद आंदोलन सुरु झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांमुळे हे आंदोलन सुरु आहे.