Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: आज आयुष कोमकरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार

Marathi breaking live marathi headlines

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 08, 2025 | 04:25 PM
LIVE
Top Marathi News Today Live: आज आयुष कोमकरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार
Follow Us
Close
Follow Us:
  • 08 Sep 2025 04:25 PM (IST)

    08 Sep 2025 04:25 PM (IST)

    कोकण - मुंबई कोकणकन्या, मत्स्यगंधा एक्सप्रेसला तुडुंब गर्दी

    गणेशोत्सवानिमित्त कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे कोकणकन्या आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस गाड्यांमध्ये तुडुंब गर्दी झाली आहे. रेल्वे डब्यांमध्ये जागा मिळणे कठीण झाले असून, अनेक प्रवासी उभे राहूनच प्रवास करत आहेत.

  • 08 Sep 2025 04:15 PM (IST)

    08 Sep 2025 04:15 PM (IST)

    फासे पारधी समाज बांधवांचा मंत्री उईके यांच्या घराला घेराव

    येवतमाळमध्ये फासे पारधी समाज बांधवांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या घरासमोर जोरदार घेराव घातला. श्री दादाजी फासे पारधी समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. समाज विकासापासून वंचित असल्याचा आरोप करत शेती, घरकुल, आर्थिक पाठबळ आणि दादाजी आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. २०१४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणीही संघटनेने केली. संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी यापूर्वी मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेतली होती, मात्र उपसचिवाने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पारधी समाज बांधवांनी व्यक्त केला.

  • 08 Sep 2025 04:10 PM (IST)

    08 Sep 2025 04:10 PM (IST)

    मीरा-भाईंदर शहरातील खड्ड्यांबाबत परिवहन मंत्री आक्रमक

    मीरा-भाईंदर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. काशिमिरा नाक्यापासून सुरू होऊन शहरातील विविध मार्गांची पाहणी करत त्यांनी एमएमआरडीए, मेट्रो आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना एका आठवड्यात खड्डे बुजवण्याचे अल्टिमेटम दिले. मंत्री सरनाईकांच्या सूचनेनुसार, खड्डे वेळेत दुरुस्त न झाल्यास कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांना दिला आहे. या हालचालीमुळे शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याचा दबाव निर्माण झाला आहे.

  • 08 Sep 2025 04:02 PM (IST)

    08 Sep 2025 04:02 PM (IST)

    मोरबे धरणाचे आज जलपूजन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते

    नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून याठिकाणी महापालिकेच्या वतीने सोमवार, ८ सप्टेंबर रोजी जलपूजन करण्यात आले आहे.यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने ऑगस्ट महिन्यातच मोरबे धरण पूर्ण भरले आहे.पूजन झाल्यानंतर विसर्ग करण्यात आला.यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात समाधानकारक पावसाची नोंद झाली.जलसाठ्याची सर्वोच्च पातळी ८८ मीटर आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस धरण ८० टक्के भरले होते.

  • 08 Sep 2025 03:49 PM (IST)

    08 Sep 2025 03:49 PM (IST)

    पाकिस्तानला Asia cup 2025 मध्ये ‘यॉर्कर किंग’ची धास्ती!

    Asia cup 2025 : ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ ला सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यूएईमध्ये दाखल झाला आहे. भारत १० सप्टेंबररोजी यूएईविरुद्ध पहिलला सामाना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

  • 08 Sep 2025 03:26 PM (IST)

    08 Sep 2025 03:26 PM (IST)

    लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट!

    मुंबई: अलिकडेच अनंत चतुर्दशी मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने, मुंबईकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप दिला. मुंबईचा प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव नेहमीप्रमाणे या वर्षीही चर्चेत राहिला.

  • 08 Sep 2025 03:20 PM (IST)

    08 Sep 2025 03:20 PM (IST)

    नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदीवरून राडा, आतापर्यंत 5 आंदोलकांचा मृत्यू

    नेपाळमधील हजारो तरुणांनी आज (8 सप्टेंबर) काठमांडूसह अनेक शहरांमध्ये निदर्शने केली. हे निदर्शन सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीविरोधात आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारविरुद्ध ही जनरल-झेड क्रांती सुरू झाली आहे. या दरम्यान निदर्शक संसद भवनात घुसले.

  • 08 Sep 2025 03:10 PM (IST)

    08 Sep 2025 03:10 PM (IST)

    महानगरपालिकेच्या आश्वासनाचे तीन तेरा; नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या ‘आपला दवाखाना’ला टाळं

    पालिकेने नागरिकांच्या आरोग्यासाठी  काही उपक्रम राबविले होते. दिवा शहरातील ‘आपला दवाखाना’ हा ठाणे महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणारा महत्त्वाचा आरोग्य सेवा उपक्रम कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आला असून या निर्णयामुळे दिव्यातील पाच लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्य हक्कावर गदा आली आहे.

  • 08 Sep 2025 03:03 PM (IST)

    08 Sep 2025 03:03 PM (IST)

    अल्काराझच्या विजयाची गुरुकिल्ली कोणती?

    कार्लोस अल्काराझने आपले दुसरे यूएस ओपन २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. जेतेपदाच्या सामन्यामध्ये अल्काराझने दमदार खेळ दाखवला आणि जॅनिक सिनरला पराभूत केले.  या विजयानंतर कार्लोस अल्काराझने एटीपी रँकिंगमध्ये नंबर १ स्थान पटकावले.

  • 08 Sep 2025 03:00 PM (IST)

    08 Sep 2025 03:00 PM (IST)

    मुलाला आणि आपल्या सुनेला त्रास नको म्हणून वृद्ध दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल

    वसई: वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततचे आजारपण तसेच मुलाला आणि सुनेला त्रास नको म्हणून एका वृद्ध दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. ८१ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आधी स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीचा गळा कापून ठार मारले. नंतर त्याच चाकूने स्वतःच्या मनगटाच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या भयंकर घटनेने वसईमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

  • 08 Sep 2025 02:55 PM (IST)

    08 Sep 2025 02:55 PM (IST)

    पैसे तयार ठेवा, २ दिवसांनी अर्बन कंपनीचा १,९०० कोटी रुपयांचा इश्यू उघडणार

    Urban Company IPO GMP Marathi News: ऑनलाइन सेवा प्रदाता अर्बन कंपनीने त्यांच्या १९०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी पूर्ण तयारी केली आहे. हा आयपीओ १० सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल, तर १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शेअर्ससाठी अर्ज करता येईल. त्यानंतर, १५ सप्टेंबर रोजी शेअर्सचे वाटप अंतिम होण्याची अपेक्षा आहे.

  • 08 Sep 2025 02:54 PM (IST)

    08 Sep 2025 02:54 PM (IST)

    नेपाळमध्ये सोशल मीडिया Apps वर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने

    नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी ४ सप्टेंबरपासून देशात सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातल्यामुळे देशभरात मोठा गोंधळ उडाला आहे. या बंदीविरोधात राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हजारो Gen-Z तरुणांनी हिंसक निदर्शने केली. यादरम्यान शेकडो तरुण नेपाळच्या संसदेत घुसले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा आणि गोळीबाराचा वापर करावा लागला. परिस्थिती पाहता काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

  • 08 Sep 2025 02:50 PM (IST)

    08 Sep 2025 02:50 PM (IST)

    मोहम्मद नवाजची अफलातून हॅटट्रिक!

    Pakistan’s Mohammad Nawaz : पाकिस्तान, युएई आणि अफगाणिस्तान यांच्यात नुकतीच तिरंगी मालिका खेळवण्यात आली. या मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ७५ धावांनी पराभव केला. रविवार, ७ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन संघ अंतिम सामना खेळायला आमनेसामने आले होते. पाकिस्तान या सामन्यात वरचढ ठरला. पाकिस्तान संघाला आशिया कपपूर्वी संघासाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. या दरम्यान, पाकिस्तानच्या गोलंदाजांकडून टिच्चून मारा करण्यात आला. या दरम्यान पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजने  हॅटट्रिक घेऊन इतिहास रचला आहे.

  • 08 Sep 2025 02:45 PM (IST)

    08 Sep 2025 02:45 PM (IST)

    सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा आयुर्वेदिक क्रीम, त्वचा होईल उजळदार

    संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह असतो. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या जलौषात तयारी केली जाते. याशिवाय बाप्पाचे स्वागत झाल्यानंतर घरात मनोभावे पूजा करून ११ व्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो. बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य विकत आणेल जाते. धूप अगरबत्ती, कपूर, धूप, फुले इत्यादी अनेक वेगवेगळे सामान आणले जाते. पूजेच्या ताटात प्रामुख्याने वापरला जाणारे साहित्य म्हणजे तेल आणि कापूर. बाप्पाच्या आरतीसाठी कापूर पेटवले जाते. पण पूजेच्या साहित्यामधील कापूर आणि तेल शिल्लक राहिल्यानंतर नेमकं काय करावे असा प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतो.

  • 08 Sep 2025 02:40 PM (IST)

    08 Sep 2025 02:40 PM (IST)

    चंद्रशेखर बावनकुळे नेमकं भडकले का?

    Rohit Pawar vs Bawankule : मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक जाहिरात सध्या सर्वत्र गाजते आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना फुले अर्पण करताना देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. मात्र ही जाहिरात नक्की कोणी दिली हे समोर आले नसून यावरुन वाद निर्माण झाला आहे. जाहिरातबाजी आणि त्यातील पैसे यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. एका कंपनीचा 90 कोटींचा दंड माफ केल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत बावनकुळे यांनी पुरावा मागितल्यानंतर रोहित पवार यांनी पुरावा देखील सादर केला आहे. मात्र हा पुरावा दाखवल्यानंतर बावनकुळे यांनी रोहित पवारांमध्ये अपरिपक्वतेची लक्षणे असल्याचे म्हणत टीका केली आहे.

  • 08 Sep 2025 02:35 PM (IST)

    08 Sep 2025 02:35 PM (IST)

    नातेवाईक मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात का

    CM Relatives Official Meetings: दिल्लीतील राजकीय वर्तुळातून दररोजी नवनव्या घडामोडी समोर येत असतात. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये सातत्याने वादाच्या ठिणग्या पडत आहेत. अशातच आदमी पक्षाने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांचे पतीही मुख्यमंत्र्यांसोबत अधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित राहत असल्याचा आरोप केला आहे.

  • 08 Sep 2025 02:34 PM (IST)

    08 Sep 2025 02:34 PM (IST)

    बिहार निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मोठी घोषणा

    बिहारमधील मुले आणि गर्भवती महिलांचे पोषण आणि राहणीमान सुधारण्यात अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडिया पोस्टवर लिहिले. त्यांच्या भूमिकेचा आदर करत, बिहारमधील निवडणुकीपूर्वी नितीश सरकारने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

  • 08 Sep 2025 02:34 PM (IST)

    08 Sep 2025 02:34 PM (IST)

    ‘सलमान खान गुंड आहे आणि…’, भाईजानबद्दल ‘दबंग’ दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

    बॉलीवूडचा भाईजान सध्या त्याच्या ‘बिग बॉस १९’ या रिॲलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, त्याच्या ‘दबंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी भाईजानबद्दल वादग्रस्त विधान करून सर्वांना धक्का दिला आहे. अभिनव यांनी त्यांच्या वक्तव्यात सलमान खानवर जोरदार टीका केली आहे आणि त्याला खूप वाईट म्हटले आहे. अभिनव यांनी सलमान खानला गुंड आणि वाईट वर्तनाचा माणूस देखील म्हटले आहे. इतकेच नाही तर अभिनव यांनी सलमान खान तसेच खान कुटुंबावरही निशाणा साधला आहे. अभिनव नक्की काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.

  • 08 Sep 2025 02:33 PM (IST)

    08 Sep 2025 02:33 PM (IST)

    कुठे दिलासा तर कुठे संकट! आज पाऊस ‘या’ राज्यांना धुवून काढणार,

    IMD Rain Alert: देशभरातील अनेक राज्यांना आज पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरी, पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाहीये. देशभरात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश  व अन्य राज्यांमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.

  • 08 Sep 2025 02:30 PM (IST)

    08 Sep 2025 02:30 PM (IST)

    IMD Rain Alert: कुठे दिलासा तर कुठे संकट! आज पाऊस 'या' राज्यांना धुवून काढणार, पहा IMD चा अलर्ट

    IMD Rain Alert: देशभरातील अनेक राज्यांना आज पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरी, पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाहीये. देशभरात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश  व अन्य राज्यांमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.

  • 08 Sep 2025 02:29 PM (IST)

    08 Sep 2025 02:29 PM (IST)

    बुर्ज खलिफावर दिसले ‘Blood Moon’चे अद्भुत दृश्य

    काल ७ सप्टेंबरच्या रात्री भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळाली. संपूर्ण जगभरात चंद्रग्रहण पाहायला मिळाले, पण चंद्रग्रहण अत्यंत खास होते. कारण यावेळ चंद्र रक्तासारखा लाल बूंद असा पाहायला मिळाला, ज्याला Blood Moon असे म्हटले जाते. भारता, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, मध्य पूर्वे यांसरख्या अनेक भागांमध्ये ब्लड मूनचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. सध्या संयुक्त अरब अमिरातीमधील बुर्ज खलिफा येथील दिसलेल्या ब्लड मूनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सर्वांना मंत्रमुग्ध करत आहे.

  • 08 Sep 2025 02:20 PM (IST)

    08 Sep 2025 02:20 PM (IST)

    पितृपक्षातील इंदिरा एकादशीला करा ‘हे’ उपाय

    सनातन धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. वर्षाभरामध्ये 24 एकादशी येतात त्यापैकी प्रत्येक एकादशीला स्वतःचे असे महत्त्व आहे. असे मानले जाते की, एकादशीच्या नियमांचे पालन केल्याने व्यक्तीला त्याच्या पापांचे प्रायश्चित्त करण्याची संधी मिळते. पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते, असे म्हटले जाते. या एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग देखील तयार होत आहे. इंदिरा एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करायचे, जाणून घ्या

  • 08 Sep 2025 02:15 PM (IST)

    08 Sep 2025 02:15 PM (IST)

    तान्या मित्तलने कुनिकाला दिली धमकी; ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा राडा

    ‘बिग बॉस १९’ सुरू झाल्यापासून स्पर्धकांमध्ये खूप भांडणे पाहायला मिळत आहे. पण तान्या मित्तल आणि कुनिका यांचे पूर्वी चांगले जमत होते, त्यांचे नाते आई आणि मुलीसारखे झाले होते. आता त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. नॉमिनेशन सुरु होऊद्यात अशी तान्याने कुनिकाला धमकीही दिली आहे. जाणून घ्या, तान्या मित्तल आणि कुनिका यांच्यातील वाद सुरु होण्यामागचे कारण काय आहे.

  • 08 Sep 2025 02:06 PM (IST)

    08 Sep 2025 02:06 PM (IST)

    iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत होणार हे 5 मोठे अपग्रेड

    Apple उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी त्यांचा मोठा ईव्हेंट आयोजित करण्याची तयारी करत आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांची आगामी आयफोन 17 सिरीज लाँच करण्याची शक्यता आहे. या आगामी आयफोन सिरीजबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. या सिरीजमधील सर्वात चर्चेत असणारे मॉडेल्स म्हणजे iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air. असं सांगितलं जात आहे की, या दोन्ही मॉडेलमध्ये बराच बदल केला जाणार आहे.

  • 08 Sep 2025 02:06 PM (IST)

    08 Sep 2025 02:06 PM (IST)

    MPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या अश्विनी केदारी यांचे निधन

    Ashwini Kedari MPSC News in Marathi : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पालू गावची मुलगी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२३ च्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी राज्यातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारी अश्विनी केदारी (३०) हिचे अचानक निधन झाले आहे. गेल्या अकरा दिवसांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी पीएसआय अश्विनी यांचे निधन झाले.

  • 08 Sep 2025 01:55 PM (IST)

    08 Sep 2025 01:55 PM (IST)

    घरांच्या घोटाळ्याच्या आरोपांबाबत बैठक; दैनिक नवराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश

    शासनाने आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी असलेली घरे विकासकांनी शासनाला न देता स्वतःच राखून त्यांची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुख्यम्हणजे हे करताना विकासकाना शासनाचे नगरविकास खाते, सिडको, नवी मुंबईपालिकेतील अधिकाऱ्यांची देखील साथ मिळाल्याचे उघडकीस आले आहे. अशी जवळपास ७९१ हजार घरे असल्याचे प्रकरण प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवीण खेडकर यांनी उघडकीस आणले होते. यावर यंदाच्या पावसाळी अधिवेशनात पनवेलचे विधान परिषदेचे आ. विक्रांत पाटील यांनी यावर आवाज उठवला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी नवी मुंबईत गृह घोटाळा झाल्याचे कबूल करत चौकशीचे आदेश दिले होते.

  • 08 Sep 2025 01:50 PM (IST)

    08 Sep 2025 01:50 PM (IST)

    शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्स २०० पेक्षा जास्त अंकांनी वधारला, जाणून घ्या

    आशियाई बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमध्ये, भारतीय शेअर बाजार सोमवारी (८ सप्टेंबर) आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात तेजीसह उघडले. ऑटो शेअर्समधील सततची वाढ आणि धातूंच्या शेअर्समधील खरेदीमुळे बाजार तेजीत राहिला. कमकुवत अमेरिकन कामगार आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढली. याचा बाजाराच्या भावनांवर सकारात्मक परिणाम झाला. तसेच, भारत सरकारने जीएसटी कर कमी करण्याच्या निर्णयामुळेही बाजाराच्या भावना मजबूत झाल्या. ऑटो शेअर्समध्ये सतत वाढ आणि धातूंच्या शेअर्समधील खरेदीमुळे बाजार तेजीत राहिला.

  • 08 Sep 2025 01:45 PM (IST)

    08 Sep 2025 01:45 PM (IST)

    ‘विनफास्ट’ ने एसयूव्ही VF6 आणि VF7 चे केले लाँचिंग

    विनफास्टने (Vinfast) भारतात आपली बहुप्रतीक्षित प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूवी स्लीक, स्मार्ट VF6 आणि स्पोर्टी अत्याधुनिक VF7 (Car Launch) अधिकृतरित्या लॉन्च केली आहे. भारतात गतीने वाढणाऱ्या ईव्ही बाजारात व्हिनफास्टने आपल्या पहिल्या मॉडेलच्या रुपात केलेले हे लाँचिंग देशात टिकाऊ आणि हरित गतिशीलतेकडे मार्गक्रमण करण्यासाठी कंपनीची एक दृढ प्रतिबद्धता दर्शवते. भारताच्या ईव्ही वाहनांच्या भविष्याला आकार देण्यासाठी विनफास्ट एक प्रमुख घटक म्हणून या निमित्ताने पुढे आले आहे.

  • 08 Sep 2025 01:40 PM (IST)

    08 Sep 2025 01:40 PM (IST)

    सरसकट ओबीसींची मागणी स्वीकारलेली नाही…; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

    मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले होते. पण अवघ्या पाच दिवसांत राज्य सरकारने त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींनुसार मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा जीआर काढण्यात आला. पण या जीआरवरून ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ओबीसी नेत्यांनी या जीआरला विरोध दर्शवत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केलं आहे.

  • 08 Sep 2025 01:35 PM (IST)

    08 Sep 2025 01:35 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचा आक्रमक पवित्रा; कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत नवा अल्टीमेटम

    राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण केले. ओबीसी आरक्षणाअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला नव्या तारखेचा अल्टिमेटम दिला आहे.

  • 08 Sep 2025 01:25 PM (IST)

    08 Sep 2025 01:25 PM (IST)

    ३४ लाख कर्मचारी स्मार्टफोनवरून करणार माहिती संकलन

    पुढील वर्षी सुरू होणारी जनगणना ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना ठरणार आहे. यासाठी तब्बल ३४ लाख जनगणना कर्मचारी पहिल्यांदाच त्यांच्या स्वतःच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून माहिती संकलनाचे काम करतील.मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी नियुक्त केलेले पर्यवेक्षक आणि कर्मचारी हे जनगणनेचे सर्व काम अँड्रॉइड किंवा आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनवरून करतील. विशेष अॅपच्या मदतीने संकलित माहिती थेट केंद्रीय सर्व्हरवर हस्तांतरित केली जाणार आहे. ही प्रक्रिया पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्यामुळे, जनगणना अधिक वेगवान, अचूक आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • 08 Sep 2025 01:15 PM (IST)

    08 Sep 2025 01:15 PM (IST)

    आयुष्यात पाहिले अनेक चढ-उतार; आता आशा भोसले यांच्या आवाजाने मिळवले वर्चस्व

    ५० च्या दशकात सुरू झालेली आशा भोसले यांची गायन कारकीर्द अजूनही सुरू आहे. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी जन्मलेल्या आशा भोसले आज संगीताच्या जगात असे नाव बनले आहेत की ज्याला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. त्यांच्या मोठ्या बहिणी लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी संगीताच्या जगात प्रवेश केला, परंतु नंतर त्यांच्या मोठ्या बहिणीशी असलेले त्यांचे संबंध बिघडले. एकीकडे आशा भोसले यांनी बॉलीवूडमध्ये उत्तम गाणी गायली, स्वतःचे नाव कमावले, तर दुसरीकडे त्यांचे वैयक्तिक जीवन चढ-उतारांनी भरलेले होते. आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

  • 08 Sep 2025 01:05 PM (IST)

    08 Sep 2025 01:05 PM (IST)

    अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल

    हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करा. १७ सप्टेंबरच्या आत ही प्रोसेस सुरु झाली पाहीजे. अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. अमंलबजावणी न झाल्यास दसऱ्या मेळाव्यात आम्हाला भूमिका जाहीर करावी लागेल असं जरांगे पाटील म्हणाले.

  • 08 Sep 2025 12:55 PM (IST)

    08 Sep 2025 12:55 PM (IST)

    नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

    नाशिकमध्ये गंगापूर धरणातून ३ हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

  • 08 Sep 2025 12:45 PM (IST)

    08 Sep 2025 12:45 PM (IST)

    सरकार ओबीसींच्या मुळावर उठलं : विजय वडेट्टीवार

    सरकारकडून मराठा व ओबीसी दोन्ही समाजाला खेळवण्याचा प्रकार सुरु आहे.कारण पात्र शब्द काढल्यानंतर तो जीआर सरसकट झाला आहे. सरकार ओबीसींच्या मुळावर उठलं आहे असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

  • 08 Sep 2025 12:35 PM (IST)

    08 Sep 2025 12:35 PM (IST)

    मुंबईत बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक

    विजय वडेट्टीवारांनी आज मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडेल.

  • 08 Sep 2025 12:25 PM (IST)

    08 Sep 2025 12:25 PM (IST)

    ओबीसींचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय नाही – चंद्रशेखर बावनकुळे

    ओबीसींचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय फडणवीसांनी घेतलेला नाही. तायवाडे काय बोलतात ते विजय वडेट्टीवारांनी समजून घ्यावं असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

  • 08 Sep 2025 12:15 PM (IST)

    08 Sep 2025 12:15 PM (IST)

    उद्धव ठाकरे बोलावली मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक

    उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू.

  • 08 Sep 2025 12:15 PM (IST)

    08 Sep 2025 12:15 PM (IST)

    पुण्यातील महिला पत्रकार विनयभंग प्रकरणी रोहित पवार आक्रमक

    पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला पत्रकारासोबत विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याविरोधात आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस आणि ढोल पथकातील कार्यकर्त्यांकडून पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा आणि गैरवर्तणुकीचा तीव्र निषेध. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हा हल्ला कदापि समर्थनीय नाही. पत्रकारांच्या बाबतीत पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी घडलेल्या तिन्ही घटनांची दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे. मा. मुख्यमंत्री महोदय या सर्व घटनांकडं गांभीर्याने लक्ष देऊन कारवाईचे आदेश देतील, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

  • 08 Sep 2025 12:10 PM (IST)

    08 Sep 2025 12:10 PM (IST)

    कर्जतमधील बँक ऑफ इंडिया ब्रान्चला आग

    कर्जतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कर्जमधील बँक ऑफ इंडिया या बॅंकेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ए बॅंकेचे मोठं नुकसान झाला आहे पण लॉकर सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 08 Sep 2025 12:00 PM (IST)

    08 Sep 2025 12:00 PM (IST)

    दुर्मिळ खग्रास चंद्रग्रहण! लालबुंद दिसला चंद्र

    खग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्तामे भारतात लाल चंद्र दिसून आला. हे चंद्रग्रहण 1997 नंतर सप्टेंबर महिन्यातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होते. या चंद्रग्रहणाची खास छायाचित्रे समोर आली आहे.

    दुर्मिळ खग्रास चंद्रग्रहण! भारतात दिसला लाल चंद्र. हे चंद्रग्रहण 1997 नंतर सप्टेंबर महिन्यातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होते. पाहा या चंद्रग्रहणाची छायाचित्रे#BloodMoon #LunarEclipse #Chandragrahan pic.twitter.com/ri7emUTnrr

    — Navarashtra (@navarashtra) September 8, 2025

  • 08 Sep 2025 11:50 AM (IST)

    08 Sep 2025 11:50 AM (IST)

    उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात घेतली म्हणून भाजपचे अभिनंदन - राऊत

    येत्या 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. यावरुन टोला लगावताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक अत्यंत रंजक आहे. एरवी भाजप मुहूर्त काढून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत निवडणुका घेतो, हिंदुत्वादी पक्ष म्हणून. यावेळी मुहूर्त न काढता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात घेतली. भाजप सेक्युलर झाला. मुहूर्त, पंचाग पाहत नाही हे त्यांनी दाखवून दिलं, या बद्दल त्यांचं अभिनंदन. नाहीतर मुहूर्त पाहणार, पंचाग पाहणार, तिथी पाहणार म्हणून भाजपने दहा वर्षात पहिल्यांदाच स्वत:ला सेक्युलर घोषित केल्यासारखं वाटतय, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.

  • 08 Sep 2025 11:40 AM (IST)

    08 Sep 2025 11:40 AM (IST)

    मराठा आरक्षणाच्या GR विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार

    राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ हे नाराज आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आज किंवा उद्या मराठा आरक्षण संदर्भातील निर्णयाला हायकोर्टात छगन भुजबळ हे आव्हान देणार आहेत. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर भुजबळ नाराज आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याला भुजबळांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता. राज्य सरकारने विश्वासात न घेता निर्णय घेतल्याची भावना छगन भुजबळांची आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात छगन भुजबळ पुन्हा मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहेत.

  • 08 Sep 2025 11:30 AM (IST)

    08 Sep 2025 11:30 AM (IST)

    लालबागच्या विसर्जन मिरवणूकीत चोरट्यांनी केले हात साफ

    यंदा भरतीच्या वेळेमुळे लालबागच्या राजाला विसर्जनासाठी मोठा विलंब झाला. हा राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला असला तरी देखील मिरवणूक सोहळ्यामधील चोऱ्या देखील चिंतेचा विषय ठरला आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान 100 पेक्षा अधिक मोबाईल फोन आणि अनेक सोन्याच्या साखळ्या चोरीला गेल्या. दरम्यान मोबाईल चोरी प्रकरणात 4 तर सोनसाखळी चोरी संदर्भात 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • 08 Sep 2025 11:21 AM (IST)

    08 Sep 2025 11:21 AM (IST)

    गणेशोत्सवात महामेट्रोची विक्रमी कमाई; प्रवासीसंख्या ३७ लाखांच्या पुढे

    यंदाचा गणेशोत्सव महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) साठी विक्रमी ठरला आहे. या काळात प्रवाशांची संख्या आणि उत्पन्न या दोन्ही बाबतीत ऐतिहासिक वाढ झाली. गणेशोत्सवात एकूण ३७ लाख १६ हजार ५१२ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा महामेट्रोच्या उत्पन्नात तब्बल २ कोटी ६१ लाख रुपयांची वाढ झाली. यंदा एकूण ५.६७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षी याच काळात केवळ ३.०५ कोटी रुपये मिळाले होते.

    विशेष म्हणजे, अनंत चतुर्दशीच्या दिवशी (६ सप्टेंबर) प्रवासीसंख्या आणि उत्पन्नाचा उच्चांक नोंदवला गेला. त्या दिवशीच तब्बल ५.९० लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करताना नोंदवले गेले आणि ६८.९५ लाख रुपयांचे उत्पन्न झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न १४ लाखांनी अधिक होते.

  • 08 Sep 2025 11:15 AM (IST)

    08 Sep 2025 11:15 AM (IST)

    जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिली आरक्षणाची नवी डेडलाईन

    मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच उपसमितीला सांगतो की, 17 सप्टेंबरच्या आता गॅझेटनुसार मराठवाडामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र द्या. मंगळावर किंवा बुधवारी कॅबिनेट घ्या. सरकारने कुठलाही बदल करू नये. गावागावातील समिती कामाला लावा. 17 सप्टेंबरच्या आत निर्णय घ्यावा नसता मला मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा अल्टिमेट जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे..

  • 08 Sep 2025 11:11 AM (IST)

    08 Sep 2025 11:11 AM (IST)

    आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

    बॉलीवुडच्या संगीत विश्वातील एक बेधडक आवाज म्हणजे आशा भोसले. दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या असलेल्या आशा भोसले यांनी आपल्या जादूयी आवाजाने सर्वांना थिरकायला भाग पाडले. त्यांची कारकीर्द सुमारे १९४३ मध्ये सुरू झाली आणि सात दशकांहून अधिक काळ ती विस्तारली. त्यांनी एक हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. त्यांचा आज वाढदिवस साजरा केला जातो आहे.

  • 08 Sep 2025 10:45 AM (IST)

    08 Sep 2025 10:45 AM (IST)

    जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू

    महाराष्ट्रात गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान अनेक जिल्ह्यांमधून अपघात झाल्याचे वृत्त आहे. ठाणे, पुणे, नांदेड, नाशिक, जळगाव, वाशिम, पालघर आणि अमरावती येथे नऊ जण बुडाले, तर १२ जण अजूनही बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, ६ आणि ७ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुकीदरम्यान या घटना घडल्या, ज्यामुळे संपूर्ण राज्यात वातावरण उदास झाले. गणपतीच्या विसर्जनाला एकप्रकारे गालबोटच लागले आहे.  बातमी सविस्तर वाचा...

  • 08 Sep 2025 10:40 AM (IST)

    08 Sep 2025 10:40 AM (IST)

    हैदराबाद गॅझेट त्वरित लागू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात

    मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. “हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात तातडीने करा. सरकारने याबाबत विलंब केला, तर येणाऱ्या दसरा मेळाव्यात आम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागेल, “सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केले नाही, तर दसरा मेळाव्यात आम्ही आमची भूमिका जाहीर करावी लागेल.” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

  • 08 Sep 2025 10:38 AM (IST)

    08 Sep 2025 10:38 AM (IST)

    डायमंड्स-गोल्ड कोइनसह या गेमिंग वस्तू मिळणार मोफत

    फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी फायदेशीर असणारे रिडीम कोड्स घेऊन आम्ही पुन्हा आलो आहोत. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आणि गेममध्ये जिंकण्यासाठी फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण प्लेअर्सना गेममधील वस्तू मिळवण्यासाठी डायमंडची गरज असते. हे डायमंड मिळवण्यासाठी प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करावे लागतात. पण जर प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करायचे नसतील तर त्यांच्या रिडीम कोड्स फायद्याचे ठरतात. रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स गेममधील वस्तू मोफत मिळवू शकतात.

    बातमी सविस्तर वाचा...

Marathi Breaking news live updates: गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात झालेल्या गँगवॉरच्या घटनेने शहरात खळबळ उडवली. वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने ५ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे आयुष कोमकर याची हत्या केली. आयुष कोमकर हा वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच त्याचा भाचा होता.

या प्रकरणाचा अंदाज आधीच पोलिसांना आला होता. आंदेकर टोळी कोमकर कुटुंबावर हल्ला करू शकते, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वी त्यांचा एक प्रयत्न हाणून पाडला होता. मात्र, अखेरीस ५ सप्टेंबरला आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा खून केला. या हत्येनंतर पुण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून पोलिसांनी तत्काळ आयुष कोमकर यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वतःकडे घेतली.

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political crime sports national international business entertainment lifestyle breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update

संबंधित बातम्या

Top Marathi News Today : “… तर उद्धव ठाकरे नगण्य”; खासदार नारायण राणेंची सडकून टीका
1

Top Marathi News Today : “… तर उद्धव ठाकरे नगण्य”; खासदार नारायण राणेंची सडकून टीका

Top Marathi News Today: हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे! राज ठाकरेंनी खोचक टोला अन्…
2

Top Marathi News Today: हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे! राज ठाकरेंनी खोचक टोला अन्…

Top Marathi News today Live: ठाकरे बंधुंच्या युतीला पक्षांतर्गत विरोध
3

Top Marathi News today Live: ठाकरे बंधुंच्या युतीला पक्षांतर्गत विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.