सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रात, भारताततच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठा जल्लोषाला सुरूवात झाली आहे. या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आज पुणे शहरातील काही रस्त्यांवर दुपारनंतर वाहनांना बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्ता, लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता आज सायंकाळी पाचनंतर बंद करण्यात येणार आहे. लष्कर छावनी परिसर आणि डेक्कन जिमखाना भागातील वाहतुकीतही बदल कऱण्यात आला असून आज सायंकाळी पाच वाजल्यापासून उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत या रस्त्यांवर वाहनांना बंदी राहणार आहे. पुण्याात 3000 हजार पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
31 Dec 2024 09:32 PM (IST)
नवीन वर्षाच्या स्वागताला आता काही तासच उरले आहेत. 12 वाजताच जग 2024 ला निरोप देईल आणि 2025 या नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जाईल. वर्षाच्या शेवटच्या दिवशी जुनी नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता स्वीकारण्यासाठी काही खास उपाय केले जातात. अशा उपायांमुळे नववर्षात आनंद, समाधान आणि समृद्धी लाभेल, अशी श्रद्धा आहे.
31 Dec 2024 08:14 PM (IST)
आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी एफआयआर नंबर ६३८/२०२४ मधील आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडीच्या मुख्यालयात हजर झाला. त्याला पुणे सीआयडीने ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करुन त्याला बीडकडे रवाना करण्यात आलं आहे. आरोपी वाल्मिक कराडसोबत आमच्या टीमसह बीडचे तपास अधिकारीही आहेत. बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता बंदोबस्तात बीडकडे त्याला रवाना करण्यात आलं आहे, पुढची तपासणी गुजर हेच करतील. सीआयडीचे डीवायएसपी आहेत त्यांच्या ताब्यात फरार आरोपीला देण्यात आलं आलं आहे, अशी माहिती सारंग आव्हाड यांनी दिली आहे.
31 Dec 2024 08:00 PM (IST)
रॉयल एनफिल्ड मोटरसायकल सेगमेंटमध्ये मोठ्या धमाक्यासाठी तयारी करत आहे. या सीरिजमध्ये रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 चे काही फोटो या बाईकच्या टेस्टिंग दरम्यान काढण्यात आले आहेत. आगामी रॉयल एनफील्ड हिमालयन 750 बाइकने येताच इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. Royal Enfield Himalayan 750 Spy Shots द्वारे या बाईकबद्दलची अनेक महत्वाची माहिती समोर आली आहे.
31 Dec 2024 06:49 PM (IST)
वाल्मीक कराडने समर्पण केल्यानंतर सीआयडी त्याला घेऊन बीडच्या दिशेने रवाना झाली आहे. दरम्यान सीआयडीकडून आजच वाल्मीक कराडच्या कोठडीबाबत सुनावणी घ्यावी अशी केज कोर्टाला विनंती करण्यात आली होती. केज कोर्ट सीआयडीची विनंती मान्य करते का याची उत्सुकता लागली होती. अखेर कोर्टाने सीआयडीची विनंती मान्य केली आहे.
31 Dec 2024 06:05 PM (IST)
भाजपा आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सिनेमा इंडस्ट्रीमधील अभिनेत्री रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांची नावे घेतली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन तिची भूमिका स्पष्ट केली. राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर करणे चुकीचे आहे त्यामुळे सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी अभिनेत्रीने या पत्रकार परिषदमध्ये केली. याप्रकरणी अभिनेत्रीने मुख्यमंत्र्यांची भेट घेत निवेदन सादर केले होते. अखेर सोमवारी, माझ्या वक्तव्याचा गैर अर्थ काढला गेला असं सांगत सुरेश धस यांनी या घडल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली. आणि अभिनेत्रीची माफी मागितली.
31 Dec 2024 03:52 PM (IST)
सध्याच्या घडीला अनेक महिला या उद्योग व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या शेतीमध्ये नर्सरी सुरु करून, आपल्या कुंटूंबाला आर्थिकरित्या समृद्ध केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या आसपासच्या महिलांना देखील रोजगार उपलब्ध करुन दिला असून, त्या आपल्या परिसरातील शेतकरी महिलांसाठी आदर्श ठरत आहे.
मनरेगा अंतर्गत नूतन यांच्या रोपवाटिकेतून रोपे देखील खरेदी केली जातात. रोपवाटिकेतील रोपांची काळजी घेण्यापासून ते त्यांच्या विक्रीपर्यंतची सर्व कामे नूतन स्वतः हाताळतात. यंदा त्यांना रोपवाटिकेतून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचा नफा झाला आहे. नूतन इतर महिलांनाही पाळणाघरे उभारण्यासाठी प्रेरित करतात. बेरोजगार किंवा आर्थिक विवंचनेशी झगडणाऱ्या महिलांसाठी रोपवाटिकेचे काम हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
31 Dec 2024 12:40 PM (IST)
गेल्या काही महिन्यांपासून गृहयुद्धाच्या विळख्यात अडकलेल्या येमेनमध्ये एका भारतीय नर्सला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केरळस्थित भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला येमेनी नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या प्रकरणी आपले निवेदन जारी केले आहे
31 Dec 2024 12:26 PM (IST)
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याने आज सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं आहे. आतापर्यंतच्या सीआयडीने केलेल्या तपासातून वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती होती. त्यानुसार, आता कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे.
मोठी बातमी ! वाल्मिक कराड याचं पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण
31 Dec 2024 11:01 AM (IST)
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर करणार असल्याची माहिती समोल आली आहे. पुण्यातील सीआयडी कार्यालयात आज सकाळी 11 वाजता वाल्मीक कराड सरेंडर करू शकतो, असे सांगितले जात आहे.
31 Dec 2024 10:01 AM (IST)
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराडचा शोध सुरू असून तो महाराष्ट्रातच असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याशिवाय सीआयडीने वाल्मिक कराडची तब्बल 100 हून अधिक बँक खाती गोठवली आहेत. तसेच, आणखी कोणकोणत्या बँकांमध्ये त्याची खाती आहेत. याचाही शोध सुरू सुरू आहे. सीआयडीकडून या जप्ती संदर्भातील पत्र उच्च न्यायालयातही सादर कऱण्यात आले आहे.