पोलीस कोठडीत रवानगी होताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, ऑक्सिजनवर मास्क लावण्याची वेळ
पुणे : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याने आज सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. सीआयडीने आतापर्यंतच्या केलेल्या तपासातून वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती होती. त्यानुसार, आता कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे. दरम्यान, कराड याची 100 हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट; वाल्मिक कराडच्या पत्नीची पुन्हा चौकशी, दिवसभरातच दोनवेळा बोलवले
वाल्मिक कराड महाराष्ट्रात असल्याचे तपासातून समोर आले होते. वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीचे विशेष पथकही रवाना करण्यात आले होते. आजपासून सीआयडीच्या आणखी चार टीमही कराडच्या शोधासाठी पाठवण्यात येणार होत्या. तत्पूर्वी त्याने स्वत:हून आत्मसमर्पण केले आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा संशयित वाल्मिक कराड हा फरार होता. विशेष म्हणजे तो मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा माणूस असल्याचा आरोपही देशमुख यांच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. एकीकडे सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना दुसरीकडे बीड पोलीसदेखील या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याने आत्मसमर्पण केले आहे.
सीआयडीकडून तपास सुरु
याशिवाय आतापर्यंत सीआयडीने या प्रकरणात जप्तीही सुरू केली आहे. सीआयडीकडून या प्रकरणात खंडणी, हत्या, अॅट्रॉसिटी प्रकऱणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली. यात वाल्मिक कराडची 100 हून अधिक बँक खाती सील करण्यात आली आहे. म्हणजेच आता या खात्यांमधून वाल्मिक कराडला पैशांचे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. यासोबत त्याची आणखी कोणकोणत्या बँकांमध्ये खाती आहेत. त्याचाही शोध सुरू आहे. तसेच या जप्तीसंदर्भात उच्च न्यायालयाकडे पत्र सादर करण्यात आले आहे.
सीआयडी पथक बीडमध्ये ठाण मांडून
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे. याप्रकरणी वाल्मिक कराड याचे नाव पुढे आहे. गेल्या काही दिवसांपासून सीआयडी पथक बीडमध्ये ठाण मांडून बसले असून, रविवारी वाल्मिक कराड याची पत्नी मंजिली कराड यांची सीआयडी पथकाने केज पोलिस ठाण्यात एक तास चौकशी केली. आतापर्यंत त्यांची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Prajakta Mali News: ‘त्या’ सर्वांवर कारवाई होणार…; प्राजक्ता माळीच्या भेटीनंतर फडणवीसांचे आश्वासन