Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाळूज येथील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; खिडक्या-दरवाजे क्षणात उडाले

उत्पादित झालेला माल मराठवाड्‌यासह खान्देश व आसपासच्या विभागात पाठवला जातो. कंपनीत जवळपास 20 कामगार एकाच शिफ्टमध्ये काम करतात. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक स्फोट झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 28, 2025 | 11:19 AM
वाळूज येथील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; खिडक्या-दरवाजे क्षणात उडाले

वाळूज येथील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; खिडक्या-दरवाजे क्षणात उडाले

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथील एका फार्मा कंपनीत भीषण आग लागून दुर्घटना घडली होती. त्यानंतर आता वाळूज औद्योगिक वसाहतीतील सुप्रीम सिलिकॉन्स या केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी झालेल्या स्फोटानंतर कंपनीत असलेल्या केमिकलमुळे मोठी आग लागली. स्फोट इतका मोठा होता की, कंपनीतील सर्व खिडक्या आणि दरवाजे तुटून उडाले. या आगीत दोन कामगार गंभीररित्या भाजले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे चार बंब आणि १५ टँकरने पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. या आगीत कच्चा, तयार झालेला माल व मशिनरीसह कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील अभिजित सुर्यवशी व अभिजित गोस्वामी यांची वाळूज औद्योगिक वसाहतीत सेक्टर एच -55 पेथे सुप्रीम सिलिकॉन्स नावाची कंपनी आहे.

या कंपनीत मोठ्या वाहनांच्या टायर मोल्डिंगसाठी लागणारे पॉलिमर तयार करण्याचे काम केले जाते. उत्पादित झालेला माल मराठवाड्‌यासह खान्देश व आसपासच्या विभागात पाठवला जातो. कंपनीत जवळपास 20 कामगार एकाच शिफ्ट मध्ये काम करतात. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास केमिकलसाठी लागणारे पाणी गरम करत असताना अचानक एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे बाजूला असलेल्या केमिकलच्या इमारतीला आग लागल्याने आगीचा मोठा भडका उडला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन विभागाचे जवान दोन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने बजाज व गरवारे कंपनीचे दोन बंब व खाजगी पाण्याचे १२ ते १५ टँकर मागवण्यात आले. त्यानंतर तब्बल दोन ते तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.

कंपनीसमोर बघ्यांची गर्दी

ही आग लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच कंपनीसमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीच्या घटनेत जीवितहानी नाही झाली नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी दोन कामगार भाजले असल्याची चर्चा सुरु होती. या आगीत कंपनीतील तयार झालेला माल, कच्चामाल, मिक्सर, मशिनरी, केमिकल आणि इतर साहित्य जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

हेदेखील वाचा : चंद्रपुरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट; 12 झोपड्या आगीत जळून खाक, आधी आग लागली अन् नंतर…

Web Title: Massive explosion at chemical company in waluj windows and doors blown away in an instant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • Chemical Company
  • Fire News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

पुण्यातील जैन बोर्डिंगप्रकरणी स्टे कायम! अहिल्यानगरमधील जैन समाज झाला आक्रमक
1

पुण्यातील जैन बोर्डिंगप्रकरणी स्टे कायम! अहिल्यानगरमधील जैन समाज झाला आक्रमक

Ghatkopar Fire: 200 पेक्षा जास्त नागरिकांना आगीने घेरले; घाटकोपरच्या १३ मजली इमारतीमध्ये भीषण तांडव
2

Ghatkopar Fire: 200 पेक्षा जास्त नागरिकांना आगीने घेरले; घाटकोपरच्या १३ मजली इमारतीमध्ये भीषण तांडव

दिवाळीच्या सुट्टीत चाकरमान्यांनी साधला पर्यटनाचा योग; अनेक सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट
3

दिवाळीच्या सुट्टीत चाकरमान्यांनी साधला पर्यटनाचा योग; अनेक सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट

चंद्रपुरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट; 12 झोपड्या आगीत जळून खाक, आधी आग लागली अन् नंतर…
4

चंद्रपुरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट; 12 झोपड्या आगीत जळून खाक, आधी आग लागली अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.