
शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष २०२२ साजरे करण्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय शिक्षक, शिक्षकेत्तर सर्व संघटना यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस अध्यक्ष व उपाध्यक्ष व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचे आयोजन करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. या पर्वामध्ये शाळा व महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच माध्यमिक शिक्षण विभागामार्फत चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्ररथाकरीता आर्थिक सहाय्य करण्यासाठी विविध संस्थाकडून वर्गणी जमा करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यासाठी बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे विविध संस्थाचे अध्यक्ष व सचिव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वर्गणीबाबत आवाहन करण्यासाठी सदर बैठकीमध्ये खालील समिती गठीत करण्यात आली आहे.
अध्यक्ष एकनाथ आंबोकर, उपाध्यक्ष एस. डी.लाड, सचिव आर. व्ही. कांबळे, सदस्य दादा लाड, दत्ता पाटील, इरफान अन्सारी, एस. एन. माळकर, बाबा पाटील, राजेश वरक,उदय पाटील, व्ही. जी. पोवार,आर वाय पाटील,बाळ डेळेकर, खंडेराव जगदाळे, संदिप पाटील आदींची निवड करून याप्रमाणे समिती गठीत करण्यात आली. याप्रसंगी काकासाहेब भोकरे, सुधाकर निर्मळेसह विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.