Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News :स्कॅनर स्कॅन करण्याचे चार दिवस नाटक; कोल्हापुरात पुन्हा कचऱ्याचे ढीग

Kolhapur शहरात घंटागाडीमार्फत दारोदार कचरा संकलन होत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. स्कॅनर प्रणाली लागू करूनही काही कर्मचाऱ्यांनी केवळ चार दिवस स्कॅन केल्याचे नाटक केल्याची तक्रार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 25, 2026 | 07:57 PM
kolhapur

kolhapur

Follow Us
Follow Us:
  • कोल्हापुरात स्वच्छ भारत योजना कागदावरच ?
  • स्कॅनर स्कॅन करण्याचे चार दिवस नाटक
  • बेजबाबदारपणे कचरा रस्त्यावर फेकून देतात
Kolhapur News : कोल्हापूर शहर कोंडाळामुक्त करण्यासाठी घंटागाडीच्या माध्यमातून दारोदार कचरा उठाव केला जातो. तरीही रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. यातून पुन्हा कोंढाळ्याचे स्वरूप येऊन दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोल्हापुरात स्वच्छ भारत योजना कागदावरच राहिली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्वच्छ भारत योजनेसाठी दर हजार घरांमागे एक घंटा गाडी या प्रमाणात शहरात याची विभागणी करण्यात आली. शहरातील काही भागांमध्ये दररोज कचरा गाडी येते. कचरा उठाव कर्मचाऱ्यांना स्कॅन केल्याशिवाय पगार देणार नाही, असाही दम महापालिकेने भरला होता. परंतू काही दिवसच कचरा उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्कॅनर स्कॅन करण्याचे नाटक केले. कचरा उठाव करण्यासाठी यंत्रणा मिळत नसल्यामुळे, अनेक प्रभागात वेळेवर कचरा उठाव होत नाही. परिणामी, नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

‘माझी वसुंधरा’ अभियानात कागलचा डंका! नगर परिषदेला ३ कोटींचा पुरस्कार; कामगिरीची राज्यभर चर्चा

पुन्हा कोंडाळे होण्याला जबाबदार कोण?

शहरात सध्या २० प्रभाग आहेत, यातील काही प्रभागात पहाटे साडेपाचलाच तर काही प्रभागात दुपारच्या वेळेत कचरा उठाव करणारी वाहने येतात. एक तर पहाटे उठलेले नसतात किंवा दुपारी कामाला गेलेले असतात. परिणामी त्यांचा कचरा तसाच साचत जातो आणि नागरिक बेजबाबदारपणे हा कचरा रस्त्यावर फेकून देतात. अनेक लोकांनी कचरा टाकल्याने ठिकठिकाणी पुन्हा कोंडाळे निर्माण होऊ लागले आहेत. याला जबाबदार नागरिक की कचरा उठाव करणारे, याचे उत्तर महापालिकेनेच द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

लवकरच वेळेत कचरा उठाव होणार !

कोल्हापुरात सर्वप्रथम स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य रस्ते व दुसऱ्या टप्प्यात शहरातील सर्व रस्त्यांची स्वच्छता केली जाईल. तसेच ओला कचरा, सुका कचरा आणि प्लास्टिकच्या बाटल्या याचे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळे ड्रम दिले जातील, तसेच ज्या भागात कोडाळे निर्माण झालेले आहेत ते त्वरित उचलण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देणार आहे. असं कोल्हापुरचे महापौर रुपाराणी निकम यांनी सांगितलं आहे.

वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट

Web Title: Kolhapur swachh bharat yojana garbage collection issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • Government
  • kolhapur
  • Kolhapur Municipal Corporation Elections 2026

संबंधित बातम्या

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, ‘महायुती’ सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात
1

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, ‘महायुती’ सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ
2

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण

Maharashtra News : राज्यात आरोग्यसेवेचा दर्जा सुधारणार! देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘लिव्हिंग लॅब’ ची सुरुवात
4

Maharashtra News : राज्यात आरोग्यसेवेचा दर्जा सुधारणार! देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘लिव्हिंग लॅब’ ची सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.