Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझी वसुंधरा’ अभियानात कागलचा डंका! नगर परिषदेला ३ कोटींचा पुरस्कार; कामगिरीची राज्यभर चर्चा

कागल नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व्यवस्थापन आणि शाश्वत विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय सन्मान मिळवला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 24, 2026 | 08:11 PM
कागलीच ओळख राज्यभर,

कागलीच ओळख राज्यभर,

Follow Us
Follow Us:
  • ‘माझी वसुंधरा’ अभियानात कागलचा डंका
  • नगर परिषदेच्या कामगिरीने कागलीच ओळख राज्यभर
  • स्वच्छता व्यवस्थापन व शाश्वत विकास ठरले प्रभावी
Kolhapur News : पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कागल नगरपरिषदेचा ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात आला. हा भव्य समारंभ मुंबई येथील एनएससीआय डोम, वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात कागल नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, आरोग्य सभापती प्रवीण काळभर, मुख्याधिकारी अजय पाटणकर, नगरसेविका सारिका बारड व पूनम मोरे, आरोग्य अधिकारी नितीन कांबळे, शहर समन्वयक आशिष शिंगण, स्वच्छता मुकादम बादल कांबळे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व सुमारे तीन कोटी रुपयांचा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारला.

वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट

स्वच्छता व्यवस्थापन व शाश्वत विकास ठरले प्रभावी

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाच्या सचिव जयश्री भोज, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल नगरपरिषदेने पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने प्रभावी उपक्रम राबविले. या सर्वांगीण कार्याची दखल घेत राज्यस्तरावर कागल नगरपरिषदेचा गौरव करण्यात आला.

जनसहभाग वाढविण्यावर देण्यात आला भर

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जैविक व नैसर्गिक शेतीचा अवलंब, कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन, हरित अर्थव्यवस्था आणि जनसहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यावेळी अभियानावरील माहितीपट सादर करण्यात आला तसेच पर्यावरण विषयक प्रकाशनांचे अनावरण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने अधिक प्रभावी, नावीन्यपूर्ण आणि जनसहभागावर आधारित उपक्रम राबविण्याचा निर्धार कागल नगरपरिषदेच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी”; इचलकरंजीत मराठी दिन महोत्सव, मायमातीतल्या कलागुणांना मिळणार वाव

Web Title: Kagal municipal council majhi vasundhara award 3 crore marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra news
  • Municipal Corporation

संबंधित बातम्या

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू
1

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण
2

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; साऊथ आफ्रिकेत चमकणार
3

Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; साऊथ आफ्रिकेत चमकणार

Beed Marethon Viral Video:  लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम
4

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.