Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीराजेंचा पुढाकार; महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची नांदी

आता राज्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे.  अशातच राज्याच्या राजकारणात अजून एका नव्या प्रयोगाची नांदी पाहायला मिळू शकते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 28, 2024 | 11:54 AM
संभाजीराजेंचा पुढाकार; महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची नांदी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो.गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारणात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला आणि ठाकरे सरकार कोसळले. एकनाथ शिंदेंनी आपल्या ४० आमदारांसह भाजपसोबत घरोबा करत राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर गेल्या वर्षी अजित पवार यांनीदेखील आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सामील झाले. या सर्व घटनामुळे राज्यात राजकारण ढवळून निघाले होते.

आता राज्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे.  अशातच राज्याच्या राजकारणात अजून एका नव्या प्रयोगाची नांदी पाहायला मिळू शकते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर राज्यात तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

 हेदेखील वाचा: हत्तीदेखील एकमेकांना नावाने बोलावतात; एका नवीन संशोधनातून आले समोर 

या तिसऱ्या आघाडीसाठी खुद्द संभाजीराजे छत्रपतींनी पुढाकार घेतल्याचेही सांगितले जात आहे. या आघाडीसाठी मुंबईत आज महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज दुपारी वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक होणार आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडून आणि भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर आणि इतर काही छोट्या पक्षांची मिळून ही तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून  वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर  हेदेखील तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी  ‘वंचित बहुजन आघाडी’ च्या माध्यमातून त्यांनी स्वत:चं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामाध्यमातून त्यांनी दलित, बहुजन समाजासह अठरापगड जातींना वंचितच्या छताखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर 2024 च्य  लोकसभा निवडणुकीपूर्वीही राज्यात तिसऱ्या आघाडीच्या चर्चा सुरू होत्या. पण यावेळीही त्यांच्या तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नाला फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले नाही. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती स्वत: तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. त्यासाठी आज काही पक्षांची बैठकही बोलवण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत आज काय होणार, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

हेदेखील वाचा: श्रावणात बनवा थंडगार केसर पियुष, काही मिनिटांतच तयार होते रेसिपी

Web Title: Meeting today for the third alliance under the leadership of sambhaji raje nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 11:54 AM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • Sambhajiraje Chhatrapati

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.