Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर नगरमध्ये अहिल्यादेवींचे होणार स्मारक; मंत्री विखेंचा पुढाकार

स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर अहमदनगरमध्ये  पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारकाच्या उभारणी साठी राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. अहील्यादेवींचे  स्मारक आणि नेवासा येथील ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टीने माइलस्टोन ठरणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 17, 2024 | 07:41 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगरमध्ये  स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक होणार आहे. यासाठी महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.  मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की,  ” स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या  धर्तीवर उभारण्यात येणारे अहील्यादेवींचे  स्मारक आणि नेवासा येथील ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टीने माइलस्टोन ठरणार असून, दोन्ही प्रकल्पाच्या आराखड्यात सुधारणा करून लवकराच याचे सादरीकरण केंद्र व राज्य सरकार समोर करण्यात येणार आहे.

पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकरांचे  जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून अहील्यानगर  येथे स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला. याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून प्रकल्पाचा आराखडा तसेच स्मारकासाठी शहरात जागा निश्चित करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर अंतिम टप्प्यात आले आहे. महीला सक्षमीकरणाची  संकल्पना स्मारक उभारण्याची आहे. यासाठी स्मारक उभारणीतील सर्व बारकावे तपासून पाहीले जात आहेत. आराखडा अंतिम झाल्यानंतर याचे सादरीकरण राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर केले जाणार असून स्मारकासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध व्हावा असा प्रयत्न असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

अहिल्यादेवी होळकर आणि संत ज्ञानेश्वर परिसराचा विकास

पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर आणि नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदीर परीसराच्या विकासाच्या आराखड्याचे सादरीकरण पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

स्मारकाच्या माध्यमातून होणार अहिल्यादेवींच्या कार्याचा प्रसार

तयार करण्यात आलेल्या सादरीकरणात आवश्यक बदल करण्याच्या सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. अहील्यादेवीचे कार्य खूप मोठे होते. स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा संदेश मिळावा आशा संकल्पनेतून स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सुचित केले. स्मारकासाठीची जागा निश्चित करण्यासाठी प्रशसानाने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

संत ज्ञानेश्वर परिसर विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु

नेवासा येथील मंदीर परीसर विकास आरखड्याच्या संदर्भात राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा निर्णय घेतल्याने निधी उपलब्ध होणार आहे. या तिर्थस्थानाचे अध्यात्मिक महत्व लक्षात घेवून अकरा एकर जागेत स्मारकाचा आराखडा त्या तिर्थस्थानाचे असलेले महत्व लक्षात घेवून त्या अनुभूतीने व्हावा अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली. ज्ञानेश्वर सृष्टी उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असून त्याला लवकर मंजूरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने दोन्ही प्रकल्पाचे काम माइल स्टोन ठरणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचा तिर्थक्षेत्र पर्यटन  आराखड्याच्या माध्यमातून स्मारकाचे होणारे काम पर्यटनाच्या जोडीने रोजगार निर्मितीला पूरक ठरणार असल्याचा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: Memorial of ahilya devi to be built in ahmednagar on the lines of statue of unity initiative of minister vikhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 07:39 PM

Topics:  

  • ahmednagar
  • radhakrushna vikhe patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.