Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHADA News: वाढीव शुल्क आकारणाऱ्या विकासकाला दणका! म्हाडाच्या लोकशाही दिनात नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण

MHADA News: म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या २३ व्या लोकशाही दिनात पुणे आणि मुंबईतील एकूण ७ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली असून, नागरिकांच्या सदनिका ताबा, वाढीव शुल्क आणि पुनर्विकासाच्या तक्रारींवर तात्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 16, 2026 | 07:22 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • वाढीव शुल्क आकारणाऱ्या विकासकाला दणका
  • म्हाडाच्या लोकशाही दिनात नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण
  • नको असलेल्या प्रकल्पातील सुविधांचे शुल्क न आकारण्याचे निर्देश
MHADA News: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज २३ वा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या २३ व्या लोकशाही दिनात सात अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या आजच्या लोकशाही दिनात श्री. दिनेश देवरे यांनी अर्ज केला होता. श्री. देवरे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत सोडतीमध्ये यशस्वी अर्जदार ठरले आहेत. सदर सदनिकेची संपूर्ण विक्री किंमत भरून देखील संबंधित विकासकाकडून वाढीव शुल्क आकारणी केली जात असून सदनिकेचा ताबा दिला नसल्याबाबत श्री. देवरे यांनी अर्ज सदर केला.

नको असलेल्या प्रकल्पातील सुविधांचे शुल्क न आकारण्याचे निर्देश

सदर अर्जावर सुनावणी करताना ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी संबंधित विकासकाला अर्जदार श्री. देवरे यांना नको असलेल्या प्रकल्पातील सुविधांचे शुल्क न आकारण्याचे निर्देश देत रु. ४,८३,११२/- या वाढीव शुल्कातून केवळ सुमारे रु. ८४,९६०/- शुल्क अर्जदाराकडून घेण्याचे निर्देश दिले. तसेच सदर शुल्क अर्जदाराने भरल्यानंतर विकासकाने तात्काळ सदनिकेचा ताबा देण्याचे निर्देश श्री. जयस्वाल यांनी संबंधित विकासकाला दिले.

श्री. यतीन बोरकर वास्तव्यास असलेल्या वरळी येथील आदर्शनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत व्यवस्थापकीय समितीने अनियमितता केल्याची तक्रार संबंधित सहकार उपनिबंधक यांच्याकडे केली होती. याच तक्रारीच्या आधारे सदर सहकारी गृहनिर्माण संस्थेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून लवकरात लवकर नवीन व्यवस्थापकीय समिती नेमण्याकरिता निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी श्री. यतीन बोरकर यांनी अर्ज केला होता.

सदर अर्जावर सुनावणी करताना श्री. जयस्वाल यांनी संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेची नवीन व्यवस्थापकीय समिती नेमण्याकरिता तात्काळ निवडणुक घेण्याचे निर्देश संबंधित सहकार उपनिबंधक यांना दिले. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम ८३ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

एका GPU च्या शोधाने रचला इतिहास! जगातील सर्वात मोठया टेक कंपनीचे CEO Jensen Huang नेमकं किती शिकलेत?

श्रीमती सोनल काळे यांनी आजच्या लोकशाही दिनात अर्ज केला होता. दादर पश्चिम येथील इमारत क्रमांक ६५ जी, स्वतंत्र भारत भवन या इमारतीत श्रीमती काळे या भाडेकरू/ रहिवासी असलेल्या म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीचा पुनर्विकास होऊन देखील संबंधित विकासकाने पुनर्वसन सदनिकेचा ताबा आजतागायत दिलेला नसून संक्रमण भाडेही दिलेले नाही. याबाबत आजच्या लोकशाही दिनामध्ये त्यांनी अर्ज केला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर स्वतंत्र सुनावणी ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सदर सुनावणीसाठी संबंधित विकासकाला बोलवण्याची निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.

न्यू टिळक नगर चेंबूर येथील इमारत क्रमांक २०, कावेरी सहकारी गृहनिर्माण संस्था पुनर्विकास प्रकल्पात संबंधित विकासकाने इमारतीचे पाडकाम सुरू केले असून आजतागायत कायमस्वरूपी पर्यायी निवास करारनामा केले नसल्याबाबत श्री. सतीश गझिनकर यांनी आजच्या लोकशाही दिनात अर्ज केला. सदर अर्जावर सुनावणी करताना श्री. संजीव जयस्वाल यांनी संबंधित विकासकाने कायमस्वरूपी पर्यायी निवास करारनामा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

CTET exam 2026: सरकारी शिक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ स्मार्ट नियोजनाने करा परीक्षा उत्तीर्ण

श्री बन्सीलाल किसनानी यांनी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारितील येरवडा, पुणे येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनीमध्ये सन १९८६ मध्ये म्हाडाची मध्यम उत्पन्न गटातील सदनिका खरेदी केली. सदर सदनिका त्यांच्या पत्नी श्रीमती गीताबेन बन्सीलाल किसनानी यांच्या नावे हस्तांतरण करण्यासाठी अर्ज करण्यात आला. मात्र, अर्जदाराकडे हप्त्याची रक्कम विहित मुदतीत न भरणा केल्यामुळे येणे असलेले विलंबशुल्क, शिल्लक राहिलेली वाढीव किंमत, वाढीव किंमत विहित मुदतीत न भरल्यामुळे त्यावरील विलंब शुल्क, शिल्लक भुई भाडे, भुई भाडे विहित मुदतीत न भरल्यामुळे विलंब शुल्क अशी एकूण रु. ४१,३४९/- भरण्याबाबत सदनिकाधारक यांना कळवण्यात आले.

व्याज माफ करण्याचे निर्देश

सदर शुल्काबाबत पुनर्विचार करण्यासाठी अर्जदार श्री विनय किसनानी यांनी आजच्या लोकशाही दिनात अर्ज केला. सदर प्रकरणी सुनावणी करताना सदर सदनिकेच्या सुधारित वाढीव विक्री किंमतीचा भरणा अर्जदाराने करणे आवश्यक असून त्यावरील व्याज माफ करण्याचे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सदनिकेच्या सुधारित वाढीव विक्री किंमतीचा भरणा अर्जदाराने केल्यानंतर सदर सदनिका अर्जदार यांच्या आजीच्या नावे हस्तांतरित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: म्हाडाचा २३ वा लोकशाही दिन कुठे आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडला?

    Ans: म्हाडाचा २३ वा लोकशाही दिन वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

  • Que: पुणे म्हाडाच्या २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील अर्जदार श्री. दिनेश देवरे यांच्या अर्जावर काय निर्णय झाला?

    Ans: उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी संबंधित विकासकाला नको असलेल्या प्रकल्पातील सुविधांचे शुल्क न आकारण्याचे निर्देश देत, ४,८३,११२ रुपयांच्या वाढीव शुल्कातून केवळ सुमारे ८४,९६० रुपये घेण्यास सांगितले आणि त्यानंतर तात्काळ ताबा देण्याचे आदेश दिले.

  • Que: येरवडा, पुणे येथील म्हाडा कॉलनीच्या हस्तांतरणाबाबत काय निर्देश देण्यात आले?

    Ans: श्री. किसनानी यांच्या प्रकरणात, सदनिकेच्या सुधारित वाढीव विक्री किंमतीचा भरणा केल्यानंतर त्यावरील व्याज माफ करण्याचे आणि सदनिका हस्तांतरित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Web Title: Mhada 23rd lokshahi din sanjeev jaiswal hearings and decisions sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • mhada
  • MHADA Homes

संबंधित बातम्या

Kirit Somaiya: ‘MHADA च्या 110 फ्लॅट्सवर घुसखोर बांग्लादेशींचा कब्जा…’, किरीट सोमैयांचा ‘लँड जिहाद’ आरोप, काय आहे प्रकरण
1

Kirit Somaiya: ‘MHADA च्या 110 फ्लॅट्सवर घुसखोर बांग्लादेशींचा कब्जा…’, किरीट सोमैयांचा ‘लँड जिहाद’ आरोप, काय आहे प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.