Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Politics: नांदेडमध्ये मध्यरात्री राजकीय भूकंप! श्रीकांत शिंदे अन् प्रतापराव चिखलीकरांची ‘हॉटेल’मध्ये गुप्त भेट

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सध्या नांदेड दौऱ्यावर असून, त्याच संधीचा फायदा घेत आमदार चिखलीकर यांनी त्यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. महायुतीतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 29, 2026 | 03:43 PM
Nanded Politics, Shrikant Shinde, Prataprao Chikhlikar,

Nanded Politics, Shrikant Shinde, Prataprao Chikhlikar,

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रताप पाटील चिखलीकर आणि श्रीकांत शिंदे यांची मध्यरात्री एका खासगी हॉटेलमध्ये गुप्त भेट
  • महायुतीचे घटक पक्ष म्हणून नांदेडमध्ये आलेल्या नेत्याचे स्वागत करणे हीच या भेटीमागची भूमिका होती
  • प्रताप पाटील चिखलीकर यांनी यापूर्वीच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, यासाठी आग्रही भूमिका घेतल्याचे संकेत
Nanded Politics: राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकांच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. इच्छुकांकडून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे रांगा लागल्याचे दिसत आहे. अशातच नांदेडच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक ऐन रंगात आली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मध्यरात्री एका खासगी हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास बंद दाराआड चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका तसेच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विषारी दारूमुळे १८ मृत्यू, राजकीय वातावरण पेटले; काँग्रेसकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी!

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सध्या नांदेड दौऱ्यावर असून, त्याच संधीचा फायदा घेत आमदार चिखलीकर यांनी त्यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. महायुतीतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. अशा परिस्थितीत चिखलीकर आणि शिंदे यांच्यात झालेल्या या दीर्घ चर्चेमुळे आगामी निवडणुकीची राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील पूर्वीच्या भेटीत दिले होते निमंत्रण

या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना चिखलीकर यांनी सांगितले की, मुंबईतील पूर्वीच्या भेटीत त्यांनी डॉ. शिंदे यांना नांदेड भेटीचे निमंत्रण दिले होते. मात्र, दिवसभराचे कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू असल्याने सकाळी भेट घेण्याचे ठरले होते. स्वतःचा घरगुती कार्यक्रम असल्याने सकाळी बाहेरगावी जावे लागणार असल्यामुळे त्यांनी रात्रीच हटिलवर जाऊन भेट घेतल्याचे स्पष्ट केले.

आम्ही दोघे लोकसभेचे सहकारी

आम्ही दोघेही लोकसभेत सहकारी म्हणून काम केले आहे.

महायुतीचे घटक पक्ष म्हणून नांदेडमध्ये आलेल्या नेत्याचे स्वागत करणे हीच या भेटीमागची भूमिका होती,’ असे त्यांनी सांगितले.

तसेच आगामी निवडणुकांबाबत काही राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, या भेटीतून महायुतीतील स्थानिक राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळणार का, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या राजकीय भेटीचे वेगवेगळे तर्कविर्तक लढविले जात आहेत.

मुंबई महापालिकेचा चा ग्रीन मास्टरस्ट्रोक! मुंबईतील पालिका कार्यालयांत उभारले जाणार EV चार्जिंग स्टेशन

विशेष म्हणजे, यापूर्वी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत युतीचा यशस्वी प्रयोग केला होता. त्याच धर्तीवर आता विधान परिषद निवडणुकीतही नवे राजकीय समीकरण आकार घेणार का, याबाबत नांदेडच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. या भेटीचा नेमका तपशील अद्याप गुलदस्त्यात असला, तरी महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि आगामी राजकीय शह-काटशहाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

 

 

 

Web Title: Midnight political buzz in nanded mp shrikant shinde and mla prataprao chikhlikar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.