पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील (Dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Phule, Karmaveer Bhaurao Patil) यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यावर शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर लगेच काही पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आलं आहे. तसेच यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावर दस्तुरखुद्द मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
[read_also content=”कर्नाटकचे मुख्यमंत्री दम देताहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शांत बसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसची टिका https://www.navarashtra.com/maharashtra/karnataka-cm-is-giving-up-and-maharashtra-cm-is-sitting-quietly-ncp-criticizes-352723.html”]
दरम्यान, माझ्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळ्याच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले होते. त्यावर शाई टाकली गेली. त्यामुळं डोळ्यांना आणखी त्रास होत आहे. माझ्यावर शाईफेकीचा कट हा पूर्व नियोजित होता, आणि याचे सर्व पुरावे मिळाले आहेत. मला जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. मला मारण्याचा हा कट होता, असा सशंय पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. तसेच पोलीस पुढील तपास करताहेत.