Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भीमनगरवासियांची फसवणूक होऊ देऊ नका’; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एसआरए अधिकाऱ्यांना सूचना

भीम नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत,  मूळ जागेपासून नऊ किलोमीटर लांब सक्तीचे स्थलांतर अमान्य करत झोपडपट्टीधारकांनी याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारलेले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 28, 2025 | 02:38 PM
भीमनगरवासियांची फसवणूक होऊ देऊ नका; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एसआरए अधिकाऱ्यांना आदेश

भीमनगरवासियांची फसवणूक होऊ देऊ नका; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एसआरए अधिकाऱ्यांना आदेश

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : एरंडवणे येथील भीमनगर झोपडपट्टीचे एसआरएअंतर्गत पुनर्वसन योजनेत झोपडपट्टीधारकांची कोणतीही फसवणूक होऊ देऊ नका. गरज पडल्यास नागरिकांना अधिकच्या सुविधा द्याव्यात किंवा संपूर्ण स्कीम रद्द करावी, अशा सूचना उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना दिल्या आहेत.

भीम नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत,  मूळ जागेपासून नऊ किलोमीटर लांब सक्तीचे स्थलांतर अमान्य करत झोपडपट्टीधारकांनी याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारलेले आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतेच मंत्री  चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा नेला होता. या बिऱ्हाड मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील व झोपडपट्टीधारकांचे प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन कोणत्याही परिस्थितीत झोपडपट्टी धारकांची फसवणूक होणार नाही. याबाबत आपण सर्व ती काळजी घेऊ, असे आश्वासन त्यांनी झोपडपट्टीधारकांना दिले.

हेदेखील वाचा : फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 1.36 कोटींचा दंड वसूल; 23 हजार 480 जणांना ‘इथं’ बसला दणका

तसेच झोपडपट्टीधारकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सदर पुनर्वसन प्रक्रियेमध्ये झोपडपट्टी धारकांना अधिक लाभ देण्यात यावा. अथवा फसवणूक झाली असल्यास संपूर्ण योजना रद्द करावी, अशा सूचना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टीधारकांच्या हिताचा विचार मांडल्याने आंदोलनात बळकटी प्राप्त झाली असून, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडपट्टीधारकांना फसवणूक करण्याचा इरादा ठेवणाऱ्या बिल्डरांना यामुळे चाप लागणार असल्याची भावना यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, स्थानिक रहिवासी देविदास ओव्हाळ, प्रभु सूनगर, जावेद शेख दादू गायकवाड व सुनील डमरे यांनी व्यक्त केली.

Web Title: Minister chandrakant patil talked about bhimnagar residents issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • maharashtra news

संबंधित बातम्या

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार
1

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

Devendra Fadnavis: “बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
2

Devendra Fadnavis: “बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव
3

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार; 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना
4

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार; 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.