Anjali Damania again criticizes Dhananjay Munde over Lives in government residence in Mumbai
Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वातावरण तापले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधक सातत्याने आरोप केले जात आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. मात्र आता मंत्री धनंजय मुंडे देखील अंजली दमानिया यांच्याविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दमानिया यांचे आरोप फेटाळले. मात्र आता धनंजय मुंड हे अंजली दमानिया यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार आहेत. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
मंत्री धनंजय मुंडे हे अंजली दमानिया यांच्याविरुद्ध हायकोर्टात खटला दाखल करणार आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी नेमके काय ट्वीट केले आहे, ते जाणून घेऊयात.
अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 4, 2025
”अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.”
धनंजय मुंडेंचा जवळपास 275 कोटींचा भ्रष्टाचार केला
डिबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे मिळणार होते. पण तत्तकालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नॅनो युरिया आणि नॅनो डिएपीम खरेदीत 275 कोटींचा घोटाळा केला. मुंडेंच्या काळात नॅनो युरियाची बॉटल 220 रुपयांना खरेदी करण्यात आली. गोगलगायी निर्मुलनाचं औषधही अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केले. एकेका बॅटरी स्प्रेअरमध्ये त्यांनी पैसे लाटले. 50 कोटींचे डिलरशीपचे नियम बदलण्यात आले. कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदीक 42 कोटींचा घोटाळा केला. धनंजय मुंडेनी एका वर्षात अफाट पैसे खाल्ले,असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांंनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुरव्यानिशी आज राज्याच्या कृषी खात्यातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. महायुती सरकारमध्ये तत्त्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोटाळ्यांची मालिकाच सुरू होती, असा आरोप करत दमानिया यांनी थेट कागदपत्रेच माध्यमांसमोर सादर केली. एकामागून एक घोटाळ्यांची मालिका वाचून दाखवत त्यांनी कृषी खात्यातील घोटाळे समोर आणले. तसेच आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही, असा सवालही उपस्थित केला.
हेही वाचा: Dhananjay Munde Alligations: ‘माझं राजकीय करीयर संपवण्याचा प्रयत्न…’; धनंजय मुंडेंचा आरोप कुणावर
नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्प्रेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठी लागणाऱ्या बॅगा खरेदीमध्ये गेल्या दोन-अडीच वर्षात कोटींचे घोटाळे झाल्याच आरोप अंजली दमानिया केला. त्यामुळे आतातरी भगवानगडाने त्यांचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
अंजली दमानिया म्हणाल्या, “कापूस गोळा करण्यासाठी लागणाऱ्या बॅगा खरेदीपासून नॅनो डीएपी,बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड पर्यंत भ्रष्टाचार झाला आहे. पण तो किती पट झालाय, हे पाहिलं तर धक्का बसणार आहे. या सर्वांचे दर एकदा पाहा, नॅनो युरिआ आणि नॅनो डिएपी या इफको कंपनीच्या आहे. नॅनो युरियाचा एक लीटरचा दर 184 रुपये इतका आहे. म्हणजे 500 मिलीलीटर बॉटलला 500 रुपये मिळतात. पण धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक टेंडर काढण्यात आलं आणि ती बॉटल 220 रुपयात खरेदी करण्यात आली. बाजारात याची सिंगल बॉटल 92 रूपयांना मिळते. पण धनंजय मुंडे यांनी 19 लाख 68 हजार 408 बॉटल 220 रुपये दराने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने या बॉटल्स खरेदी करण्यात आल्या.