Photo Credit- Social Media 'हे भाजप चे केवळ दबावतंत्र आहे का?' नारायण राणेंच्या दाव्यावर दमानियांचा थेट सवाल
मुंबई: डिबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे मिळणार होते. पण तत्तकालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नॅनो युरिया आणि नॅनो डिएपीम खरेदीत 275 कोटींचा घोटाळा केला. मुंडेंच्या काळात नॅनो युरियाची बॉटल 220 रुपयांना खरेदी करण्यात आली. गोगलगायी निर्मुलनाचं औषधही अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केले. एकेका बॅटरी स्प्रेअरमध्ये त्यांनी पैसे लाटले. 50 कोटींचे डिलरशीपचे नियम बदलण्यात आले. कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदीक 42 कोटींचा घोटाळा केला. धनंजय मुंडेनी एका वर्षात अफाट पैसे खाल्ले,असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांंनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुरव्यानिशी आज राज्याच्या कृषी खात्यातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. महायुती सरकारमध्ये तत्त्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोटाळ्यांची मालिकाच सुरू होती, असा आरोप करत दमानिया यांनी थेट कागदपत्रेच माध्यमांसमोर सादर केली. एकामागून एक घोटाळ्यांची मालिका वाचून दाखवत त्यांनी कृषी खात्यातील घोटाळे समोर आणले. तसेच आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही, असा सवालही उपस्थित केला.
नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्प्रेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठी लागणाऱ्या बॅगा खरेदीमध्ये गेल्या दोन-अडीच वर्षात कोटींचे घोटाळे झाल्याच आरोप अंजली दमानिया केला. त्यामुळे आतातरी भगवानगडाने त्यांचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
अंजली दमानिया म्हणाल्या, “कापूस गोळा करण्यासाठी लागणाऱ्या बॅगा खरेदीपासून नॅनो डीएपी,बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड पर्यंत भ्रष्टाचार झाला आहे. पण तो किती पट झालाय, हे पाहिलं तर धक्का बसणार आहे. या सर्वांचे दर एकदा पाहा, नॅनो युरिआ आणि नॅनो डिएपी या इफको कंपनीच्या आहे. नॅनो युरियाचा एक लीटरचा दर 184 रुपये इतका आहे. म्हणजे 500 मिलीलीटर बॉटलला 500 रुपये मिळतात. पण धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक टेंडर काढण्यात आलं आणि ती बॉटल 220 रुपयात खरेदी करण्यात आली. बाजारात याची सिंगल बॉटल 92 रूपयांना मिळते. पण धनंजय मुंडे यांनी 19 लाख 68 हजार 408 बॉटल 220 रुपये दराने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने या बॉटल्स खरेदी करण्यात आल्या.
Mumbai Crime News : आधी अपहरण करून रिसॉर्टवर नेलं नंतर…, मुंबईत 17 वर्षीय मुलीवर
“आता नॅनो डीएपीची एक लीटरच्या बॉटलची किंमत 522 रुपये इतकी आहे. म्हणजे अर्धा लीटरच्या बॉटलची किंमत 269 रूपये इतकीच असेल.कृषी विभागाकडून 19 लाख 57 हजार 438 बॉटल्स खरेदी करण्यात आल्या. बाजारभावानुसार अर्धा लीटर बॉटलची किंमत 269 रूपये असताना कृषी विभागाकडून अर्धा लीटरची ही बॉटल 590 रूपयांना खरेदी करण्यात आली. हे दोन्ही घोटाळे 88 कोटींचे असल्याचा दावाही दमानिया यांनी केला.
“बॅटरी स्पेअर टु इन वन वापरासाठी असून तो एमएआयडीच्या वेबसाईटवर उपलब्ध होतो. स्प्रेअरची किंमत 2450 रूपये इतकी आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर 2946 रुपयांना हा स्प्रेअर विकला जात असताना कृषी मंत्र्यांनी टेंडर काढून 3426 रूपयांना बॅटरी विकत घेतली गेली. अशा पद्धतीने एक हजाराच्या वर एक एक बॅटरी स्पेअरमधून पैसे लाटले गेले. बॅटरी स्पेअरचे पाच लाखांहून अधिक लाभार्थी होते. बजेट फिक्स असल्याने लाभार्थी कमी करण्यात आले. असे 2 लाख 36 हजार 427 बॅटरी स्पेअर 3425 रुपयांना खरेदी करण्यात आले.”
अंजली दमानिया यांनी कृषी मंत्री मुंडे यांच्या कापूस आणि सोयाबीनसाठी घेतलेल्या बोगस किमतीविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानुसार, गोगलगायीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घेतलेल्या मेटाल्डे हाइड या पीआयए कंपनीच्या पेटेंटेड उत्पादनाची खरी किंमत रिटेलमध्ये ८१७ रुपये आहे, परंतु मुंडे यांनी ती १२७५ रुपयांना विकत घेतली आहे. याशिवाय, त्यांनी १ लाख ९६ हजार ४४१ किलो मेटाल्डे हाइड खरेदी केली, तसेच ६ लाख १८ हजार कॉटन स्टोरेज बॅगा घेतल्या. अंजली दमानिया यांनी यावरून सूचित केलं की, या किमतीतील फरक आणि टेंडर प्रक्रियेतील घोटाळ्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी हेही म्हटलं की, “या अफाट पैशाचं गळत असताना या व्यक्तीला मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का?” असे तीव्र सवालही उपस्थित केले.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ अडकला कायद्याच्या कचाट्यात; समय रैनाच्या प्रसिद्ध शोमधील