Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shambhuraj Desai: “पाल देवस्थानाला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात…”; शंभुराज देसाईंचे प्रशासनाला निर्देश

मंत्रालयात पाल (ता.कराड) येथील 'ब' वर्ग देवस्थान येथे भाविक व पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एकात्मिक धार्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत व ‘पर्यटन पोलीस’ या विषयासंदर्भात आढावा बैठक झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 29, 2025 | 09:34 PM
Shambhuraj Desai: “पाल देवस्थानाला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात…”; शंभुराज देसाईंचे प्रशासनाला निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: कराड तालुक्यातील पाल देवस्थान ‘ब’ वर्गाचे देवस्थान आहे. या देवस्थानाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘पाल’ देवस्थानाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पाल देवस्थानाला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात पाल (ता.कराड) येथील ‘ब’ वर्ग देवस्थान येथे भाविक व पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एकात्मिक धार्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत व ‘पर्यटन पोलीस’ या विषयासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी उत्तर कराडचे आमदार मनोज घोरपडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी, पर्यटन विभागाचे उपसचिव पवार, पर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे राहुल श्रीरामे, मेस्कोच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लढ्ढा उपस्थित होते.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, ‘पाल’ ला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचा विचार करुन परिपूर्ण प्रस्ताव एक महिन्‍याच्या आत सादर करावा. तसेच पर्यटनासाठी शासकीय जागेस प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

पर्यटकांच्या सेवेसाठी ‘पर्यटन पोलीस’

राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलीसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे, असे पर्यटन मंत्री देसाई यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, सेवानिवृत्त पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल व इतर संस्थेमार्फत पर्यटन पोलीसांची नेमणूक करण्यात येणार आहे. महाबळेश्वर येथे होणाऱ्या ‘महाराष्ट्र पर्यटन महोत्सवात’ प्रायोगिक तत्वावर 50 पर्यटन पोलीस यांना विशेष प्रशिक्षण देऊन नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करावी. पर्यटन पोलीस या संकल्पनेमुळे पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत पर्यटनच्या सवंर्धनासाठी प्रयत्न करतील, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

Web Title: Minister shambhuraj desao give instructed to satara collector proposal made to declare pal devasthanam as a tourist destination karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 09:17 PM

Topics:  

  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश
1

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश

‘संजय राऊत हेच खरे गद्दार, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली’; राज्यातील ‘या’ कॅबिनेटमंत्र्याचा गंभीर आरोप
2

‘संजय राऊत हेच खरे गद्दार, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली’; राज्यातील ‘या’ कॅबिनेटमंत्र्याचा गंभीर आरोप

Navratri 2025 : तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला मिळणार महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा
3

Navratri 2025 : तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला मिळणार महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

Shambhuraj Desai News: आईच्या वाढदिवशी शासकीय बंगल्यात गृहप्रवेश; शंभूराज देसाईचं ‘मेघदुत’शी आहे खास नातं?
4

Shambhuraj Desai News: आईच्या वाढदिवशी शासकीय बंगल्यात गृहप्रवेश; शंभूराज देसाईचं ‘मेघदुत’शी आहे खास नातं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.